तळमावले : तहानलेल्या झाडांना धरणीमाता फाउंडेशनचे पाणी
झाडांना पाणी देताना : अमृता चोरगे,जितेंद्र चोरगे, अंकुश कापसे,अक्षय मोरे, सतिष वाघ,अजिंक्य माने.
तळमावले दि. 25 (वार्ताहर) -ता.पाटण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा संत तुकारामांचा अभंग लताबाईंच्या सुमधुर आवाजात ऐकताना आपल्या सभोवताली अरण्यच साकारल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. इतके सामर्थ्य या अभंगात आहे.एका रात्रीत एखादा माणूस निसर्गाची विस्कटलेली घडी ठीक करू शकत नाही. पण प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा ओळखून कार्यास सुरुवात केली की काही काळाने त्याचा एकत्रित परिणाम निश्चितपणे दिसून येतो. असाच एक प्रयत्न उन्हाळ्यात डोंगरावरच्या झाडांना पाणी घालण्याचे काम कुंभारगाव येथील धरणीमाता फाउंडेशन करत आहे गलमेवाडी - येवती रस्त्याच्या दुतर्फा असलेली वनराई तीव्र उन्हाने करपून जाते असे असताना डोंगराचे माळ पून्हा वनराईने हिरवे करण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत झाडांना उन्हाची झळ बसू नये यासाठी धरणीमाता फाउंडेशन या संस्थेने पुढाकार घेऊन भर उन्हाळ्यात पाणी घालून झाडांचे सवंर्धन सुरू केले आहे.
गलमेवााडी - येवती घाट रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता असते पण तेथे पाण्याची सोय नाही अशावेळी तीव्र उन्हात झाडे सुकून जातात त्यामुळे परिसरातील सर्व डोंगर उजाड दिसतात अशावेळी असलेली येथे झाडी भर उन्हाळ्यात जगविण्यासाठी टँकरने झाडांना पाणी घालून निसर्गाचे जतन करण्याचा प्रयत्न कुंभारगाव येथील धरणीमाता फाउंडेशन ही संस्था करत आहे.
वृक्षरोपणाचे दोन भाग असतात.एक म्हणजे वृक्ष लावणे व दुसरा म्हणजे लावलेला वृक्ष जगवणे. केवळ वृक्षारोपण करून आपले कर्तव्य संपत नाही तर लावलेले झाड व्यवस्थितरीत्या वाढणेदेखील महत्त्वाचे आहे : - अजिंक्य माने (सचिव धरणीमाता फाउंडेशन )
खूपच छान काम,कोरोनाच्या काळात झाडांकडे दुर्लक्ष होत चालले आहे,त्यामुळे हे कार्य उत्तम आहे.
उत्तर द्याहटवा