मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी धामणी येथील भराडीदेवीची यात्रा रद्द

कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी धामणी येथील भराडीदेवीची यात्रा रद्द

तळमावले / मनोज सावंत
या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शासन स्तरावरून यात्रा, उरूस आदी उत्सवांना बंदी घालण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर धामणी येथील ग्रामदैवत श्री भराडीदेवीची दि.28 व 29 एप्रिलदरम्यान
होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. 

धामणी : कोरोना संकटामुळे पाटण तालुक्यातील धामणी येथील श्री भराडीदेवी यात्रा रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. यात्रेच्या निमित्ताने दोन दिवसांत मुंबई पुण्यातील बहुसंख्य नागरिक गावी येतात. अनेक विवाहीत महिला देवीच्या दर्शनासाठी माहेरी येतात. पण यंदा यात्रा होणार नसल्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले.

दि.26 एप्रिल रोजी झालेल्या ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतिने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सरपंच सौ.आशाताई  नेर्लेकर उपसरपंच श्री.रमेश अण्णा सवादेकर यांनी सांगितले.यात्रेनिमित्त होणारे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत याची सर्व भाविकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन सरपंच/उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,श्री भराडीदेवी यात्रा कमिटी, तंटामुक्ती समिती,व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.याविषयानुरूप दवंडी गावात देण्यात आली.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,अत्यावश्यक गरज असल्यासच घराबाहेर पडावे,मास्क,सॅनिटायजरचा वापर करावा,हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवावेत,सुरक्षित अंतराचे पालन करावे,सध्या कोरोनाचा भयावह प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आपण,आपले कुटुंब,मित्र परिवार सुरक्षित राहावा म्हणून शासन वेळोवेळी देत असलेल्या कोरोना प्रतिबंध सूचनांचे तंतोतंत पालन करावे,' असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...