गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

मलकापुर येथील लोटस फर्निचरला भीषण आग

मलकापुर येथील लोटस फर्निचरला भीषण आग

कराड मलकापुर ता. कराड येथील लोटस फर्निचरला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. गुरुवारी 29 रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून यामध्ये फर्निचर दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत मलकापुर ते नांदलापूर ता. कराड दरम्यान लोटस फर्निचरचे मोठे दुकान आहे. या दुकानाला गुरुवारी भीषण आग लागली. या आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गालगतच दुकानाला भीषण आग लागल्याने स्थानिक नागरिक, प्रवाशांसह बघ्यांची मोठी गर्दी केली होती.दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत फर्निचर दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...