मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

धामणीत बिबटयाची दहशत

धामणीत बिबटयाची दहशत
तळमावले / मनोज सावंत 
धामणी मध्ये बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. गावामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून आज दि. 27 रोजी पहाटेच्या सुमारास गावामधील भावके आळी येथिल मिलिंद अरुण जाधव यांच्या घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली आणि कुत्र्याला घेऊन जंगलात पसार झाला. पहाटे घरातील लोकांनी कुत्रा दिसत नाही म्हणून शोधाशोध केली असता घराजवळच्या काही अंतरावर बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेले असल्याचे आणि बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले. 
धामणी काळगाव भागात बिबट्याचा व इतर प्राण्यांचा वावर वाढला असतानाही वनविभागाचे या घटनेनंतर दुर्लक्ष होत आहे ,असे निदर्शनास येत असून गेल्या काही महिन्यात बिबट्याने अनेक कुत्री व शेळी फस्त केली आहेत.  यामुळे गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीदायक वातावरण झाले असून ,बिबट्याचा योग्य प्रकारे बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

: गेल्या सहामहिन्यांपासून गावात व शेजारील भागात बिट्याचा वावर असून प्रशासनाने योग्य ती कारवाही करावी,गावातील शेतकरी वर्ग रात्रीच्या वेळी शेतामध्ये पिकाची अन्य जनावरांच्या कडून नुकसान होऊ नये म्हणून पहारा देत आहेत पण या घटने नंतर  गावातील शेतकरी वर्ग हा भीतीच्या दडपणाखाली गेला असून वनविभागाने ठोस पर्याय काढून बिबट्यांचा व अन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा.   - मुरलीधर सावंत
 (अध्यक्ष-वेंदात चॅरिटेबल ट्रस्ट )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...