सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -2020 ; प्रवेशिका पाठवण्याकरिता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -2020 ; प्रवेशिका पाठवण्याकरिता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ  

मुंबई /प्रतिनिधी ; शरद माने

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि. ३१ जानेवारी २०२१ होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता दि. १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.

अर्जाचे नमुने  dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...