सातारा दि. 4 : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.5 डिसेंबर रोजी सकाळी सातारा येथून निसरे ता. पाटणकडे प्रयाण., सकाळी 11 वा. निसरे फाटा ता. पाटण येथे हॉटेलच्या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती. सकाळी 11.30 वा. शिदेवाडी येथील महिला बचत गटाच्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी शिंदेवाडी ता. पाटण येथून दौलतनगरकडे प्रयाण. दुपारी 4.30 वा. दौलतनगर ता. पाटण येथून म्हावशी फाटा ता. पाटणकडे प्रयाण. सायं 5वा. पाटण तालुका मंडप, लाईट, डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिऐशन सातारा पाटण तालुका यांच्या स्नेह मेळाव्यास उपस्थिती. स्थळ सुस्वाद हॉटेल म्हावशी फाटा, म्हावशी, सायंकाळी 6 वा. मरळी येथे भरत साळुंखे तात्या यांचे अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी उपस्थिती. सोईनुसार दौलतनगर येथे राखीव व मुक्काम.
रविवार दि. 6 डिसेंबर रोजी दौलतनगर ता. पाटण येथून खाजगी वाहनाने सरकोली ता. पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी 4 वा. पंढरपूर येथून साताराकडे प्रयाण , आगमन व मुक्काम.
सोमवार दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी सातारा येथे वाशिम जिल्ह्यातील कोरोना संदर्भात व विविध योजनांच्या कामाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा. सोईनुसार कोयना दौलत साताराकडे प्रयाण, राखीव व मुक्कम.
मंगळवार दि.8 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वा. सातारा येथून पुण्याकडे खाजगी वाहनाने प्रयाण. सायंकाळी 7.30 वा. पुणे येथून कोयना दौलत निवासस्थान साताराकडे प्रयाण, राखीव व मुक्काम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा