मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

अभिनेत्री अश्विनी महांगडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार वेगळ्या भूमिकेत

अभिनेत्री अश्विनी महांगडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार वेगळ्या भूमिकेत

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत 'राणू आक्का साहेब' यांची भूमिका जिवंत केलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे.


 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. या मालिकेत राणू बाईच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.


आता ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी ती एका वेगळ्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. अश्विनी स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेत दिसणार आहे. नुकतेच या मालिकेत प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट पहायला मिळाला होता. अरुंधतीला अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याबद्दल समजले होते. आता या मालिकेत अश्विनी कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र तिचे चाहते तिच्या या भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.  
 


स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या आधी अश्विनी महांगडे अस्मिता मालिकेत मनालीच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. याशिवाय तिने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केले आहे.

याशिवाय अश्विनी हिने महिलांविषयी असलेल्या अडचणी त्यांनी "महावारी" या  वेबसिरीज मध्ये मांडल्या होत्या त्यामुळे ज्या गोष्टी महिलांना बोलताना लाज वाटत असे त्या गोष्टी धाडसाने व्यक्त कशा कराव्या हे स्पष्ट केले होते. त्यामुळे ही वेबसिरीज देखील चांगली गाजली होती. त्याचबरोबर सध्या ती महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारापासून रक्षण करणाऱ्या कायद्याविषयी जनजागृती करत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...