शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

कराड ; वस्ती साकुर्डी मध्ये कोविड योध्यांचा सत्कार व ऑक्सिजन मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न

कराड ; *वस्ती साकुर्डी मध्ये कोविड योध्यांचा सत्कार व ऑक्सिजन मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न*  

कराड / प्रतिनिधी दि.12 लोकवर्गणी मधून खरेदी केलेल्या ऑक्सिजन मशीनचा लोकार्पण सोहळा रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, जि. प. सदस्य मा. उदयसिंह पाटील, जि. प.सदस्य मा. प्रदीप पाटील व कराड पंचायत समितीचे उपसभापती मा. रमेश देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. खरेदी केलेल्या ऑक्सिजन मशीन मान्यवरांच्या शुभहस्ते आशा स्वयंसेविका यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या गावकर्यांनी पूर्णपणे प्रशासनावर अवलंबून न राहता आपली जबाबदारी ओळखून मशीन खरेदी केलेल्या कामाबद्दल उदयसिंह दादा यांनी ग्रामस्थाचं कौतुक केलं कोरोना महामारी बद्दल चिंता व्यक्त करताना दादांनी या मशीनचा कमीत कमीत वापर व्हावा अशी सदिच्छादेखील  यानिमित्ताने व्यक्त केली 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गावचे मा. उपसरपंच श्री. विश्वासराव कणसे यांनी गावातील विविध प्रलंबित कामाचा आढावा घेतला आणि त्या कामासंदर्भात पाठपुरावा करण्याची विनंती मान्यवरांना केली. प्रलंबित कामामधील जलसंजीवनी योजना,स्मशान भूमीची संरक्षण भिंत तसेच जि. प. शाळेच्या खोल्यासंदर्भातील प्रलंबित कामाचा पाठपुरावा करून काम लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जि. प. सदस्य मा. उदयसिंह पाटील व जि. प. सदस्य मा. प्रदीप पाटील यांनी यावेळी दिले.  यावेळी कोयना बँकेचे संचालक मा. श्रीकांत बादल, मा.अविनाश पाटील, सरपंच सौ. सुजाता निकम, सचिन पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते, कार्यक्रमाच्या शेवटी श्री.प्रशांत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...