बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

कराड : पदवीच्या हुंबरट्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी नमुना प्रश्नोत्तरे संच_ पुरवावेत.- विद्यार्थी नेते श्री.अनिकेत मोरे.

कराड : पदवीच्या हुंबरट्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी नमुना प्रश्नोत्तरे संच_  पुरवावेत.
- विद्यार्थी नेते श्री.अनिकेत मोरे.

कराड, दि. १६ ; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र शासनाने अंतिम वर्षाच्या शेवटच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठे आपापल्या परीने तयारी करीत आहेत. राज्य शासनाने देखील विद्यार्थ्यांच्या जीवाला कोरोना मुळे धोका होऊ नये म्हणून बहुपर्यायी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने व ज्यांना ऑनलाईन शक्य नाही त्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
    अंतिम वर्षाची परीक्षा व्हावी ही आमची पहिल्या पासूनच मागणी होती. जर परीक्षा घेतली नसती तर पदवी मिळवली नसती आणि त्यानंतर पदवी विना कोण नोकरी ही देणार नाही- येवढ्या वर्षाच्या शिक्षणाला अर्थच राहणार नाही. बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, परंतु गेले सहा महिने शिक्षणापासून लांब असलेला विद्यार्थी, तसेच आज पर्यंत सविस्तर लेखी उत्तरे लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्यांदाच बहुपर्यायी प्रश्नांना सामोरे गेल्या नंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यासाठी नमुना म्हणून 'बहुपर्यायी प्रश्नोत्तर संच' विविध शाखेतील विद्यार्थ्यांना लवकर पुरवावेत. अशी मागणी चे निवेदन मेल करून पदवीधर नवक्रांती संघटनेचे संस्थापक, विद्यार्थी नेते अनिकेत मोरे यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या कडे केली आहे. विद्यापिठाने आज पर्यंत बर्याच विद्यार्थी हिताच्या आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आज बहुपर्यायी नमुना प्रश्नोत्तरे संच पुरवतील हिच अपेक्षा केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...