मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

जागतिक अभियंता दिन... !!मराठी मुलखाचा पहिला अभियंता ....!! मानाचा मुजरा ..........!!

जागतिक अभियंता दिन... !!

मराठी मुलखाचा पहिला अभियंता ....!! 
मानाचा मुजरा ..........!! 

साल सहा एप्रिल 1656 रोजी छत्रपती शिवरायांनी रायगड ताब्यात घेतला ....सह्याद्रीच्या तटावरली उत्तम जागा .....सागरी दळणवळणास अतिशय जवळ ( महाराजांचे आरमारावर विशेष लक्ष होते ....ज्याच्या हाती सागरी सत्ता आहे तो खरा मुलखाचा राजा ही गोष्ट हेरुन राजानी आग्रा जाण्यापूर्वीच आरमार बांधणीत महत्वाची भूमिका बजावण्यासाठी सिंधुदुर्ग जलदुर्गाची पाया भरणी केली होती.) 
म्हणून हा किल्ला राजधानीचे ठिकाण म्हणून बांधायला घेतला. हिरोजी इटाळकर (इंदुलकर) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगड चे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले. आत्ताच्या कोणत्याही सिव्हिल  इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. ते वडार समाजाचे होते. जेव्हा सिधुदुर्ग बांधावयाचा होता तेव्हा वडार समाजातीलच सुमारे ५०० पाथरवट लोकांनी सिधुदुर्गाचे बांधकाम केले असे सभासद बखर म्हणते  . अगदी पुरातन काळापासून वडार समाज बांधकामध्ये, दगड फोडण्यामध्ये, दगडावरील नक्षिकामामध्ये कारागीर म्हणून प्रसिद्ध होता आणि सध्याही आहे. हिरोजी इटाळकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले.

शिवराज्याभिषेकावेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादी बांधकामे हाती दिले होते आणि त्याची जबाबदारी सोपविली होती. गड बांधण्याचे काम याने आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले.त्यात त्यांनी वापी-कूप-तडाग,प्रासाद,उद्याने,राजपथ. ,स्तंभ,गजशाला,नरेंद्रसदन,बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजीनी रायगडावर उभ्या केल्या. गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजी राजे बेहद्द खुश झाले आणि त्यांनी हिरोजीला सांगितले की या गडावर कोणत्याही एका ठिकाणी तू तुझे नाव लिहावे आणि तुमच्या स्मृती जतन कराव्यात. म्हणूनच त्यांनी पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले कि हिरोजी इटाळकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल.
या आपल्या शिलालेखात त्यांनी "सेवेठायी तत्पर हिरोजी इंदुलकर…. … " असे म्हणून आपण महाराजांचे निस्सीम भक्त आणि सेवक आहोत हेच दाखवून दिले. अशा स्वराज्यातील पहिल्या स्थापत्य अभियंत्यास ....आज स्थापत्य अभियंता दिनी मानाचा मुजरा ....!! 

@युवराज पाटील.( सातारा जिल्हा माहिती कार्यालय)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...