मुंबई : दि.17.करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात नसल्याने मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा जमावबंदीचं १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. आज मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईत १४४ कलम लागू राहणार आहे. या नियमांमध्ये दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभे राहता येणार नाही. आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही किंवा रस्त्यावर फिरता येणार नाही कुठल्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणेही सक्तीचं करण्यात येणार आहे.
आधीच्या आदेशात सूट देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहणार आहेत. ही ऑर्डर दर १५ दिवसांनी होणाऱ्या मुंबई पोलिसांच्या नित्यक्रमाचा भाग असून कोणताही नवा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला नाही.
👍
उत्तर द्याहटवा