तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील धामणी ग्रामपंचायत व त्रिमुर्ती स्पोर्टस क्लब यांच्यावतीने अर्सेनिक अल्बम 30 या गोळयांचे नुकतेच वाटप करण्यात आले. सध्या कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याच पाश्र्वभूमीवर या गोळयांचे वाटप केले गेले.
त्रिमुर्ती स्पोर्टस क्लब च्या वतीने नेहमी विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले जातात. यापूर्वी कोरोना काळात शासनाच्या नियमांचे पालन करुन रक्तदान शिबीर ही आयोजित केले होते.
अर्सेनिक अल्बम 30 या गोळयांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. या गोळया लहान मुलांपासून वृध्द व्यक्तींपर्यंत, आजारी, गरोदर महिला यांना दिल्या तरी चालतात. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या गोळयांची सर्व राज्यांना शिफारस देखील केली आहे.
ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत धामणी व त्रिमुर्ती स्पोर्टस क्लब यांचे आभार मानण्यात आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा