सोमवार, ११ मे, २०२०

दिलासादायक ; सातारा 99 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल


सातारा दि. 11 (जि.मा.का) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 3 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 96 असे एकूण 99 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.
13 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
10 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 13 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबद्दल संदीप डाकवे यांचा माने परिवाराकडून सन्मान*

तळमावले/प्रतिनिधी : माणसाच्या आयुष्यातील ७५ वे वर्ष म्हणजेच अमृतमहोत्सव हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. या आनंदाला सामाजिक कृतज्...