शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

सातारा ; जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या "'सातारा माझा " पुस्तिकेचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

सातारा ; जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या "'सातारा माझा " पुस्तिकेचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

सातारा दि.11 : जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या सातारा माझा या पुस्तिकेचे प्रकाशन आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात करण्यात आले.
या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे आदी उपस्थित होते.
सातारा जिल्हा म्हटले की, निसर्ग सौंदर्याची लयलूट. महाबळेश्वर, पाचगणी येथील विहंगम सह्याद्रीच्या कड्याकपारीतील सौंदर्य, कासचा सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये येणारा फुलांचा महोत्सव. पण साताऱ्यात याबरोबरच शौर्याच्या अनेक पाऊलखुणा, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी रण गाजवलेल्या अनेक घटना आजही या जिल्ह्याच्या हृदयात आहेत. उभ्या महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या अनेक घटनाही याच जिल्ह्यात घडलेल्या आहेत. निसर्ग सौंदर्यासाठी सातारा जिल्हा दक्षिणेचा काश्मीर म्हणून जसा ओळखला जातो, तसेच भारताच्या इतिहासातील वैभवी पान म्हणूनही या जिल्ह्याचे महत्व अपार आहे. 
आजही हा जिल्हा देशातला सैनिकी जिल्हा म्हणून ओळखला जातो. हजारो भूमीपुत्र आजही देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. ही आहे या जिल्ह्याची खासियत. 
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाण्याबरोबर प्रकाशही देत आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राच्या कपाळावरची ललाट रेषाच असावी जणू, एवढं या कोयना धरणाचे महत्व आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणांचा दिशादर्शक म्हणूनही कोयनेकडे पाहिले जाते. पर्यटन, इतिहास, याबरोबर धार्मिक अधिष्ठान असलेली अनेक ठिकाणं या जिल्ह्यात आहेत. या सर्व श्रीमंतीबरोबर या जिल्ह्याने विकासात्मक कार्यातही राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या समोर अनेक मैलाचे दगड निर्माण केले आहेत. हे सगळे शाश्वत विकासाचे प्रारुप अनेक जिल्ह्यासाठी दिशादर्शक आहेत. या सर्व गोष्टी पर्यटकांसाठी एकत्र मिळाव्यात म्हणून  माझा सातारा पुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली आहे.

राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर : जानेवारीत मतदान ; आचारसहिंता लागू

राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर : जानेवारीत मतदान ; आचारसहिंता लागू 

मुंबई, 11 डिसेंबर : महाराष्ट्रात गावा-खेड्यापासून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे.

23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील

23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी

31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी

4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी

15 जानेवारी मतदान

18 जानेवारी मतमोजणी

एकतीस डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल चार जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असेल.

निवडणूक चिन्ह तसंच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 4 जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल आणि 15 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

सातारा ; जिल्ह्यातील 122 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 122 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.11: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 122 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  4  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 5, सदर बझार 1, शनिवार पेठ 1, शाहुपूरी 1, सैदापूर 3, भक्ताली 1, जाखणगाव 1, कारंडवाडी 1, मल्हार पेठ 2, पाठखळ माथा 1, करंजे 1, रविवार पेठ 1, संभाजीनगर 1. 
कराड तालुक्यातील विद्यानगर 1, मलकापूर 1, हजारमाची 1, विंग 5, सुपणे 4.

 फलटण तालुक्यातील फलटण 3, कुंभार गल्ली 2,  शुक्रवार पेठ 1, सुरवडी 1, विढणी 6, जाधववाडी 1,  राजाळे 2, हिंगणे 1, बुधवार पेठ 1, फरांदवाडी 3, मठाचीवाडी 4, धुळदेव 2, पिंप्रद 1, खामगाव 1, मुरुम 1, खुंटे 1, टाकुबाईचीवाडी 1.

  खटाव तालुक्यातील सिंहगडवाडी 1, वडूज 2, सिध्देश्वरकुरोली 2,  पुसेगाव 1.

  माण  तालुक्यातील म्हसवड 4, मलवडी 4, रांजणी 1, बनगरवाडी 2, ढाकणी 1, वडजल 2, खडकी 1. 

 कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, रहिमतपूर 2, जायगाव 1,  न्हावी बु 2, पाडळी 1, सातारा रोड 1, देऊर 1, शिरढोण 1, एकसळ 1.

 पाटण तालुक्यातील पाटण 1, , पापद्रे 2.

  जावली तालुक्यातील म्हसवे 4,  कुडाळ 1, बामणोली 3.  

वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, धोम कॉलनी 2, बावधन 1, करंजे 1.

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, 

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, बावडा 2, अहिेर 1, म्हावशी 1. 

बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 1. 

  * 4 बाधितांचा मृत्यु*

 जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दिवड ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, भाडळे ता. कोरेगाव येथील 86 वर्षीय पुरुष, दौलतनगर ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले कर्डी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 एकूण नमुने -263596
एकूण बाधित -53319  
घरी सोडण्यात आलेले -50174  
मृत्यू -1760 
उपचारार्थ रुग्ण-1385

गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

महाआवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत राज्यात येत्या 15 डिसेंबर हा दिवस ‘घरकुल मंजूरी दिवस’ म्हणून तर 20 डिसेंबर हा दिवस ‘प्रथम हप्ता वितरण दिवस’ - ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ

महाआवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत राज्यात येत्या 15 डिसेंबर हा दिवस ‘घरकुल मंजूरी दिवस’ म्हणून तर 20 डिसेंबर हा दिवस ‘प्रथम हप्ता वितरण दिवस’ - ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ 


मुंबई, दि.10 : ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत राज्यात येत्या 15 डिसेंबर हा दिवस ‘घरकुल मंजूरी दिवस’ म्हणून तर 20 डिसेंबर हा दिवस ‘प्रथम हप्ता वितरण दिवस’ म्हणून अंमलबजावणी करण्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी घोषित केले.

राज्यात 20 नोव्हेंबर, 2020 ते 28 फेब्रुवारी, 2021 या 100 दिवसांच्या कालावधीत ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यात येत आहे. याचा मंत्री मुश्रीफ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), गटविकास अधिकारी (पंचायत समिती)  सहभागी झाले होते.

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अभियानातील आतापर्यंतची प्रगती बघता अभियान काळात 8 लक्ष घरकुले पूर्ण करावयाची असल्याने प्रथम 100 टक्के मंजूरी व पहिला हप्ता वितरणावर लक्ष केंद्रीत करावयाच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या. अभियानातील सर्व 10 उपक्रमावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. विशेषत: त्यातील 100 टक्के घरकुल मंजूरी व मंजूर घरकुलांना पहिला हप्ता या उपक्रमांवर दि.15 डिसेंबर व दि.20 डिसेंबर पर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. अभियान 100 दिवसात यशस्वी करावे, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले.

 

ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाचे संचालक डॉ. राजाराम दिघे, कोल्हापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पुणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, राज्य व्यवस्थापन कक्षाचे उपसंचालक श्री. निलेश काळे, उपसंचालक श्रीमती मंजिरी टकले, सहाय्यक संचालक श्री.संतोष भांड व राज्य समन्वय श्री.राम आघाव उपस्थित होते.

मतदार नोंदणी कार्यात राजकीय पक्षांनी सहकार्य करावे - मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

मतदार नोंदणी कार्यात राजकीय पक्षांनी सहकार्य करावे - मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह 

मुंबई, दि. 10 : राज्यात छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे.  त्याअंतर्गत मतदार नोंदणी, नोंदीतील दुरुस्ती आदींसाठी शनिवार दि. 12 आणि रविवार दि. 13 डिसेंबर 2020 या सुटीच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून मतदार नोंदणीच्या कामास सर्व राजकीय पक्षांनी बूथ स्तरीय अभिकर्त्यांची (बीएलए) नेमणूक करुन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी केले.छायाचित्र मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे मंत्रालयात आयोजित करण्यात आली.यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी आदी उपस्थित होते.

 

श्री.बलदेव सिंह म्हणाले, राज्यात सर्व विधानसभा मतदार संघात दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीतील नोंदीच्या अनुषंगाने दि. 15 डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच नवीन मतदार नोंदणीचे कामही सुरू आहे. या सर्व बाबींसाठी येत्या शनिवार दि. 12 आणि रविवार दि. 13 डिसेंबर रोजी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरावर ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. या कामात प्रशासनाला बूथ स्तरीय अभिकर्त्यांची (बूथ लेव्हल एजन्ट्स- बीएलए) चांगली मदत होऊ शकेल. बहुतांश ठिकाणी राजकीय पक्षांनी बीएलए नेमले असले तरी उर्वरित भागांसाठीही बीएलएंची नेमणूक करुन मतदार याद्या अचूक व्हाव्यात यासाठी सहकार्य करावे.

जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी हा निवडणूक आयोगाचा हेतू आहे. तथापि, हे होत असताना त्यामध्ये कोणताही गैरप्रकार घडणार नाही याकडेही काळजीपूर्वक लक्ष देण्यात येत आहे. सध्याच्या कोविड कालावधीमध्ये मतदार नोंदणीचे अर्ज बऱ्याच प्रमाणात ऑनलाईन प्राप्त होत आहेत. प्राप्त ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जांची पडताळणी करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा आणि कार्यपद्धती तयार आहे. तसेच या मोहिमेदरम्यान आलेल्या दावे आणि हरकतींच्या अर्जांची यादी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर मतदार संघनिहाय उपलब्ध आहे, असेही श्री. सिंह म्हणाले.

 

यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार याद्या पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध करुन द्याव्यात, मोहिमेची स्थानिक केबल वाहिन्यांवरुन मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, आदी मागण्या केल्या.

 

यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी श्री. वळवी यांनी माहिती दिली की, या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेंतर्गत दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. 5 जानेवारी 2021 पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई आदी दि. 14 जानेवारी 2021 पर्यंत करुन दिनांक 15 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

 

पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, इतरत्र स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in या वेबपोर्टलवरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात शनिवापासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना रक्त मिळणार मोफत -आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात शनिवापासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना रक्त मिळणार मोफत -आरोग्यमंत्री राजेश टोपे 

मुंबई, दि. १० : राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री श्री. टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले.दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्यासह खासदार श्रीमती सुळे आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.यावेळी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरूण थोरात आदी  उपस्थित होते. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी रक्तदान करून त्याद्वारे नागरिकांना रक्तदान करण्याचा संदेश दिला.

 

यावेळी आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्याला मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 

एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्त हा घटक किती महत्त्वाचा आहे याची सर्वांना जाणीव आहे. राज्यात सुमारे ३४४ ब्लड बँक कार्यरत आहेत. त्यामध्ये  काही दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. खासगी कंपन्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे आणि सोशल डिस्टंसिंगच्या मर्यादेमुळे रक्तदान शिबीरे आयोजित करण्यावर मर्यादा येत आहेत. या साऱ्यांमुळे रक्तदान कमी होत आहे. एरवी महाराष्ट्र देशात रक्त संकलानात अग्रेसर आहे. मात्र आता कोरोनामुळे रक्तटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रक्तदान करणे हाच एक पर्याय असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 

रक्त तयार करता येत नाही आणि संकलन केलेले रक्त दीर्घकाळ साठवता येत नाही त्यामुळे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ते २० डिसेंबर दरम्यान स्वाभिमान सप्ताह साजरा केला जाणार असून त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या वाढदिवशी, लग्नाच्या वाढदिवशी अशा विविध प्रसंगाचे औचित्य साधून वर्षातून दोन वेळेस रक्तदान करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदीचे आदेश जारी : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदीचे आदेश जारी : जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा दि. 10  :  कोरोना  या संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव प्रतिबंधीत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाकडुन विविध उपाय योजना अंमलात आणल्या जात आहेत. या संबंधाने अंमलात असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांची अंमल बजावणी करण्यात येणारी प्रतिबंधक कारवाई अशा वेळी तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सातारा जिल्हयातील विविध ठिकाणी कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या संबंधाने बंदोबस्त कर्तव्य पार पाडीत असलेल्या पोलीस तसेच गृहरक्षक यांच्यावर हल्ला झाल्याच्या आत्तापर्यंत 09 घटना घडलेल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती झाल्यारात्यातुन देखील कायदा व सुव्यवस्था प्रश्न अथवा तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारतायेत नाही. 
सातारा जिल्हयात म्हसवड पोलीस स्टेशन हददीत मौजे म्हसवड ता. माण याठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री. सिध्दनाथ व आई जोगेश्वरी माता वार्षिक यात्रा 13 ते 18 डिसेंबर 2020 कालावधीत साजरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच 21 डिसेंबर 2020 रोजी शासनाच्या वतीने कोविड 19 च्या अनुषंगाने योग्य त्या सूचनांचे पालन करुन महाबळेश्वर पोलीस ठाणे हददीत किल्ले प्रतापगड येथे शिवप्रतापदिन साजरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर दिवशी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने वाई पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाई व मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुडाळ येथे शिवप्रतापदिन उत्सवाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर सण वउत्सव कालवधीत कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याचीशक्यता नाकारता येत नाही.
मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भावना तिव्र झालेल्या असून यासंदर्भात राज्यात विविध ठिकाणी तिव्र स्वरुपाची आंदोलने झालेली आहेत. याच्या प्रतिक्रिया सातारा जिल्ह्यात उमटल्यास अथवा अशा प्रकारची आंदोलने सातारा जिल्ह्यात झाल्यास कायदा वसुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्र शासनाने मंजूर केलेली 3 कृषि विषयक विधेयकांना विविध शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्ष/संघटना यांच्याकडून विरोध होत असून सदरची विधयेके रद्द होणे संबंधाने आक्रमक पवित्रा घेण्यात आलेले असून ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तसेच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांचे नेतृत्त्वात ऊस एफआरपी व शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावी या मागण्यांसंदर्भात देखील कोणत्याही वेळी आंदोलनात्मक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर कालावधीत एखाद्या घटनेवरुन अथवा प्रकारावरुन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण शक्यता नाकारता येत नाही.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील झालेले नुकसान पाहता त्यांच्या भावना तिव्र झाल्या असून शासनाकडून त्वरीत मदत मिळावी म्हणून शेतकऱ्यांची आग्रही भूमिका घेतलेली असून त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांच्याकडून देखील कोणत्याही वेळी आदोलनात्मक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
अद्यापी देखील राज्यात विविध ठिकाणी वाढीव विज बिलाच्या संदर्भात महावितरण कार्यालयाचे अथवा अन्य ठिकाणी मोठया प्रमाणात आंदोलने होत असून त्यास विविध वृत्तमाध्यमातून मोठया प्रमाणात प्रसिध्दी मिळत आहे. तसेच भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आम आदमी पक्ष व बहुजन वंचित आघाडी यांचे वतीने उग्र स्वरुपाचे विविध प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे समजून येत आहे. अशा प्रकारची आंदोलने सातार जिल्ह्यात झाल्यास त्यावरुन देखील कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लहुजी शक्ती सेना संस्थापक विष्णू कसबे यांच्या वतीने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरीता 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर रोजी पर्यंत महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार यांचे निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करणार असलेबाबत इशारा दिलेला आहे. कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
सातारा जिल्हयातील एकूण 15 विविध परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांचे मार्फत 10 वी व 12 वी परीक्षा 20 नाव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसेच धनंजय गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सातारा या कॉलेजवर 21 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत चार्टर्ड अकाउंटन्स परीक्षा घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षाकालावधीत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 सातारा जिल्ह्यात नागरिक विविध मागण्यासाठी विकास कामांसाठी तसेच इतर कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा व इतर शासकीय कार्यालय या ठिकाणी उपोषण, आत्मदहन, धरणे आंदोलन करणार असलेबाबत इशारा देत असतात त्यांना पोलीस व प्रशासनाच्या वतीने वारंवार परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. तरी उपोषण व आत्मदहन कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्था प्रश्न जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) अन्वयेचे शस्त्रबंदी आदेश व कलम 37 (3) अन्वये 11 डिसेंबर राजी 00.00 वा पासून ते 24 डिसेंबर रोजी 24.00 वा. पर्यत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहे. या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदूका, सुऱ्या, काठया किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापराता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्र, फेकावयाची हत्यार किंवा साधणे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, व्यक्तीची अगर प्रेते किंवा त्यांचे प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रीतीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवणे, सभ्यता अगर निती या विरुध्द असतील अशी किंवा राज्याची असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल असे प्राधिकाऱ्यास वाटेल अशी भाषणे करणे हावभाव करणे सोंग आणाणे अशी मनाईचे उल्लंघन करुन जर कोणताही इसम अशी कोणतीही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणत्याही जिन्नस किंवा वस्तु तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे. अशा मनाईचे उल्लंघन करुन जर कोणताही इसम अशी कोणतीही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणताही जिन्नस दाहक पदार्थ किंवा अस्त्र जवळ बाळगतील तर तो कोणत्याही पोलीस अधिका-याकडून निशस्त्र केले जाणेस किंवा दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ क्षेपणास्त्र त्यांच्याकडून जप्त केले जाण्यास पात्र असेल आणि अशा त-हेने जप्त केलेली वस्तु दाहकपदार्थ, स्फोटक पदार्थ किंवा क्षेपणास्त्र हे सरकार जमा होईल. पोटकलम (3) अन्वये असलेल्याअधिकारान्वये सार्वजनिक सुव्यवस्था राखणेसाठी कोणत्याही जमवास किंवा मिरवणूकीस वरील कालावधीत व कार्यक्षेत्रात या आदेशान्वये मनाई करीत आहे.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3) मधील या हुकुमाच्या तरतुदी खालील नमुद केलेल्या इसमाना लागू होणार नाही.  शासनाची सेवा करणारे किंवा नोकरी करणेच्या कामी ज्यांच्या वरीष्ठांनी निर्दीष्ट केलेवरून अगर त्यांना कर्तव्याच्या स्वरुपामुळे अशी खंड 1 मध्ये उल्लेखलेल्या पैकी वस्तु धारण करणे किंवा देणे आवश्यक आहे, ज्यांना ज्यांना शारिरीक दुर्बलतेच्या कारणावरुन जिल्हादंडाधिकारी अगर त्यांना प्राधिकृत केलेले अधिकाऱ्यांना, लाठी किंवा काठी वापरणेस परवानगी दिली असेल अशी व्यक्ती, सदरचा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य तसेच अत्यविधी कार्यास लागू होणार नाही, ज्या लोकांना शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधिक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...