संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
बुधवार, ३ जुलै, २०२४
*स्वर्गीय पी.डी. पाटील कर्मयोगी विकास पुरुष - प्रा. सुरेश यादव*
मंगळवार, २ जुलै, २०२४
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पाटण मध्ये प्रचंड प्रतिसाद..
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ४२ लाख रु. इतका संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ४२ लाख रु. इतका संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर.
कराड : वारुंजी हे नदीकाठी वसलेले गाव असून येथे पुरामुळे लोकवस्तीला धोका निर्माण होत असतो. यामुळे याठिकाणी संरक्षक भिंतीची गरज लक्षात घेऊन तसेच स्थानिकांची मागणी लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ४२ लाख इतका निधी राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे.
वारुंजी गावाला व परिसराला पुरापासून संरक्षण मिळणार आहे. या आमच्या गावकऱ्यांच्या मागणीची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गांभीर्याने दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून संरक्षण भिंतीसाठी ४ कोटी ४२ लाख इतका भरघोस निधी मिळवून दिला आहे याबद्दल आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे वारुंजी ग्रामस्थांकडून मन:पूर्वक आभार मानतो. अशी प्रतिक्रिया माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील यांनी दिली आहे. तसेच ते पुढे म्हणाले कि, वारुंजी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची कायमच साथ मिळाली आहे. त्यांनी गावाला आतापर्यंत भरघोस तसेच कोट्याबधी रुपयांचा निधी दिल्याने गावातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावता आले आहेत.
वारुंजी हे गाव कृष्णा व कोयना च्या प्रीतिसंगमापासून अत्यंत जवळ असल्याने व नदीस वारंवार येणाऱ्या पुरामुळे नदीकाठची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. नदीकाठच्या जमिनीची धूप होऊन वस्ती लगतचा नदीकाठ व भूभाग अस्थिर होत असल्यामुळे पुराच्या पाण्यापासून कोयना नदी काठी वसलेल्या गावठाणच्या भागाचे रक्षण करण्याकरिता पूर संरक्षक भिंतीचे काम करून मिळणेबाबत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती तसेच विधानसभेत सुद्धा प्रश्न मांडला होता. त्यानुसार वारुंजी येथील कोयना नदीकाठी पूर संरक्षक भिंत बांधकामाच्या प्रस्तावास राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी ४ कोटी ४२ लाख ९८ हजार ७०० रुपये एवढ्या खर्चासाठी मान्यता देण्यात आली आहे.
पी एम जनमन योजने अंतर्गत पाटण मधील तारळे परिसरातील धनगरवाडी येथील कातकरी कुटुंबांना जातीच्या दाखल्याचे घरपोहच वितरण...
पी एम जनमन योजने अंतर्गत पाटण मधील तारळे परिसरातील धनगरवाडी येथील कातकरी कुटुंबांना जातीच्या दाखल्याचे घरपोहच वितरण...
तारळे - तारळे ग्रामपंचायत अंतर्गत धनगर वाडी येथे 45 कुटंबाची वस्ती आहे. सदर 45 कुटुंब हे समजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असले तरी पी एम जन मन योजने मूळे त्यांचे जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
पाटण तालुक्यातील महसूल प्रशासनाने पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यातील तारळे मुरुड अडूल पेठ, पाटण शहर, बिबी,येथील कुटुंबांना यापूर्वीच आधार कार्ड रेशन कार्ड ,मतदान ओळखपत्र, रहिवासी दाखला इत्यादीचे वितरण केले आहे. कातकरी समाजातील कुटुंबातील मतदारांनी यावेळी प्रथमच मतदार यादीत नाव आल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मतदान यंत्रावर प्रथमच आपला मतदानाचा हकक बजावता आला आहे.
मूळ कातकरी समाज हा उदर निर्वाहासाठी एका ठिकाणी राहत नसतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते नेहमी भटकंती करत असतात. मात्र या कुटुंबातील नवीन पिढी शिक्षण घेताना दिसत असल्याने ही कुटुंबे आता एका ठिकाणी स्थिरावत असल्याचे दिसून येत आहे.
या मुलांना शैक्षणिक कारणासाठी जातीच्या दाखल्याची गरज असते तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते. त्यामुळे या कामी कागदपत्राची जुळवा जुळव करणे हे आव्हानात्मक काम असते.
पाटण तालुक्यात अशा कातकरी कुटुंबांना जातीचा दाखला मिळवून देण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाने पुढाकार घेऊन तारळे येथील 19 कुटुंबातील विद्यार्थ्यांना व पालकांना जातीच्या दाखल्याचे थेट त्यांचे वस्तीवर व ग्राम पंचायत कार्यालयात जाऊन वितरण केले आहे. याप्रसंगी , तहसीलदार पाटण श्री अनंत गुरव , मंडळ अधिकारी किशोर वाडकर , तसेच परिसरातील बबन शिंदे,अभिजित पाटील,रामभाऊ पाटील,तसेच कातकरी कुटंबाचे प्रतिनिधी रामदास वाघमारे आदी हजर होते.
मुलांना घरपोहच जातीचे दाखले मिळाल्याने कातकरी कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.
"पी एम जन मन योजने अंतर्गत पाटण तालुक्यात बहुतांश कातकरी कुटुंबांतील व्यक्तींना यापूर्वीचआधार कार्ड रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र,जातीचे दाखले इत्यादी शासकीय कागदपत्रे देण्यात आली असून कातकरी समाजातील एकही व्यक्ती यापासून वंचित राहणार नाही यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील राहील "
सुनील गाढे प्रांताधिकारी पाटण.
तारळे तील कातकरी वस्ती मध्ये नोंदणी करण्यात आलेले 149 मतदार असून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 120 मतदारांनी मतदानाचा हकक बजावून लोकशाही मजबुतीकरण साठी हातभार लावला आहे."
"माझी लाडकी बहीण" योजनेला नोंदणीची मुदत काढावी - आ. पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत मागणी
"माझी लाडकी बहीण" योजनेला नोंदणीची मुदत काढावी - आ. पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत मागणी
निवडणुकीपुरती या योजेनची घोषणा नसावी यासाठी कायदा करण्याची गरज असल्याची आग्रही मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.
कराड : यावर्षीच्या अंदाजपत्रकात शासनाने "माझी लाडकी बहीण" हि योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ केलेली आहे, अशी नोंदणीला कोणतीही मुदत न देता ती काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. यासोबतच या योजनेमध्ये सुधारणा आणणेसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी चार मागण्या केल्या आहेत. ज्यामध्ये या योजनेची नोंदणी मुदत काढून टाकावी, या योजनेतील महिलांची वयोमर्यादा ६० वर्षावरील महिलांना सुद्धा लाभ मिळावा, तसेच अविवाहित महिलांना सुद्धा या योजेनचा लाभ मिळावा यासाठी २१ वर्षावरील अविवाहित महिलांना योजनेचा लाभ व्हावा तसेच हि योजना निवडणुकीची घोषणा न राहता याचा कायदा केला जावा अशा प्रमुख मागण्या योजना दुरुस्तीबाबत केल्या आहेत.
यावेळी पुढे बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की , या योजनेच्या १५ जुलै अंतिम नोंदणीच्या तारखेमुळे राज्यात नोंदणी केंद्राबाहेर मोठी गर्दी होत आहे. तसेच राज्यात काही भागात उन्हाची तीव्रता अजून असल्याने काही महिलांना भोवळ आल्याची घटना घडल्या आहेत. तसेच काही भागात पावसात सुद्धा रांगा लागल्या आहेत. आज महाराष्ट्रात पंढरपूरची वारी सुरु आहे. आषाढी एकादशी १७ जुलै ला आहे. या वारीत जवळपास १० लाख वारकरी सहभागी होत असतात, या वारीत निम्याहुन अधिक महिला भाविक असतात. अशावेळी या योजेनच्या नोंदणीसाठी भाविक महिलांनी वारी सोडून यायचे का ? त्यामुळे या योजनेला तारखेचे बंधन नसले पाहिजे. प्रत्येक महिलेला तिचा अधिकार मिळालाच पाहिजे. केंद्रातील युपीए सरकारने ज्याप्रमाणे अधिकारावर आधारित कायदे केले गेले होते. त्याप्रमाणे या योजनेचा सुद्धा कायदा केला गेला पाहिजे. हि योजना फक्त निवडणुकीपुरती सुरु करायची व त्यानंतर बंद करायची हे योग्य होणार नाही. यासाठी या योजनेबाबतचा कायदा करण्याची गरज असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आग्रहाने मांडले आहे. त्याचबरोबर या योजनेत २१ वर्षावरील अविवाहित महिलांना वगळले आहे, त्यांचा काय दोष आहे ? त्यांना या योजनेचा फायदा मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर ६० वर्षावरील सर्व महिलांना ज्यांना कोणी सांभाळणारे नसतील तर अशा वयोवृद्ध महिलांना या योजेतून वगळणे योग्य नाही.
तसेच यासोबतच आणखी महत्वाची टिपणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे कि, या योजनेमुळे नोंदणी केंद्राबाहेर एजेंटचा सुळसुळाट झाला आहे. महिलांना उत्पानांचा दाखल काढण्यासाठी ७००-८०० रुपये मागितले जात आहेत, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे. अशा अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी शासनाने लवकरात लवकर दूर केल्या पाहिजेत.
सोमवार, १ जुलै, २०२४
*गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक -.मा.श्री.रविराज देसाई दादा*
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणी साठी पाटण महसूल प्रशासनाची युद्ध पातळीवर तयारी सुरू...
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
.jpeg)

