बुधवार, १ डिसेंबर, २०२१

म्हसवड : श्री. सिध्दनाथ देवाच्या यात्रा कालावधीत म्हसवड येथील वाहतुक मार्गात बदल

म्हसवड : श्री. सिध्दनाथ देवाच्या यात्रा कालावधीत म्हसवड येथील वाहतुक मार्गात बदल
 सातारा दि. 1 : म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत श्री सिध्दनाथ देवाची वार्षिक यात्रा दि. 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. यात्रेचा मुख्य दिवस दि. 5 डिसेंबर 2021 रोजी आहे. त्यामुळे म्हसवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होवू नये याकरिता   म्हसवड ता. माण येथील श्री. सिध्दनाथ यात्रा दरम्यान  यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजेच दि. 5 डिसेंबर 2021 रोजीचे सकाळी 6.00 वा. पासुन ते 22.00 वा. पर्यंत वाहतुक मार्गात पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली. 
 दोनचाकी करीता व लहान वाहनाकरीता पर्यायी मार्ग म्हणून, शिंगणापुर चौक ते युवराज सुर्यवंशी यांचे निवासस्थान समोरुन शिक्षक कॉलनी-भाटकी रोड-भाटकी गांव ते माळशिरस रस्ता-माळशिरस चौक असा मार्ग तयार करण्याता आला आहे. 
 मोठ्या व अवजड वाहनाकरीता पर्यायी मार्ग म्हणुन पोळ पंपाचे पाठीमागुन ते खांडेकर तालीम-शिक्षण कॉलनी-भाटकी रोड-भाटकी गांव ते माळशिरस रस्ता-माळशिरस चौक असा मार्ग तयार करण्याता आला आहे. 
 विरकरवाडी ते म्हसवड –रथगृह बायपास ते सरकारी दवाखाना हा रोड वाहतुकीसाठी बदं करुन पुणेवरुन आटपाडी जाणेकरिता म्हसवड-हिंगणी-राजेवाडी-आटपाडी असा पर्यायी मार्ग येण्या-जाण्यासाठी तसेच विरकरवाडी-मेगासिटी-नागोबा मंदीर-कुकूडवाड मुख्य रस्ता असा तयार करण्यात आला आहे. 
 यात्रेकरिता  संपूर्ण महाराष्ट्रातुन तसेच कर्नाटकातुन, आंधप्रदेश राज्यातुन सुमारे 4 ते 5 लाख भाविक, व्यपारी, दुकानदार येत असतात. यात्रा कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचाप्रश्न निर्माण होवू नये व यात्रा शांततेत पार पडणे महत्वाचे आहे. याकरिता वातुकीचे नियोजन योग्यरितीने करणे आवश्यक आहे. तसेच यावर्षी सिध्दनाथ देवाच्या मिरवणुकीच्या मार्गावर माणगंगा नदीमध्ये पाणी असल्याने वरील मार्ग बदलण्यात आला आहे. 
 तरी वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अनव्ये कारवाई पात्र राहतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. 
 00000

*सातारा : भविष्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन मिशन मोडवर.* *ओमायक्रॉनचा धोका पाहता जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करा- जिल्हाधिकारी शेखर सिंह*

सातारा : भविष्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन मिशन मोडवर..
ओमायक्रॉनचा धोका पाहता जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करा
- जिल्हाधिकारी शेखर सिंह
 सातारा दि. 1 : कोविड विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा   धोका पाहता जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करा. यासाठी गावनिहाय यादी तयार करुन प्रत्येक घराचे सर्व्हेक्षण करा. यामध्ये लोकप्रतिनिधींचाही सहभाग घ्या. तसेच ज्या नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस झाला आहे, परंतु दुसरा डोस घेतला नाही अशा नागरिकांना डोस घेण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या.

 कोविड विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा भविष्यात प्रार्दुभावासंदर्भात करावयाच्या उपाययोजनेबाबत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.

  नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोविड विषयी असलेल्या मार्गदर्शन आदेशाचे पालन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, कोविडसाठी उभारण्यात आलेल्या सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवाव्यात.   विविध शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लँट लावले आहेत. ते व्यवस्थीत आहेत का याची तपासणी करावी. तसेच  ऑक्सिजन प्लँटला जोडण्यात आलेल्या पाईपलाईनचीही तपासणी करा.  

  ओमायक्रॉन धोका पाहता गावपातळीवर   ग्राम दक्षता समित्या कार्यान्वीत करा. 29 नोव्हेंबर 2021 रोजी काढण्यात आलेल्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा. या आदेशाची माहिती देण्यासाठी विविध आस्थापनांची बैठक घ्या.  सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिल्या.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पाहून प्रवेश देण्यात येणार आहे
- जिल्हाधिकारी शेखर सिंह

 या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – राज्य निवडणूक आयुक्त

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 1 : भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या आधारावर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे; परंतु या आगामी निवडणुकांची मोठी संख्या लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार या कार्यक्रमास 5 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना 5 डिसेंबर 2021 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनेदेखील www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविणे, नावाची पडताळणी करणे किंवा नावांतील, पत्त्यांतील तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. त्यासाठी विधानसभा मतदरसंघांच्या 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे; तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तींची किंवा दुबार नावेदेखील वगळावित, असे आवाहनही श्री. मदान यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी चॅटबॉट

राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यांसदर्भातील संपूर्ण माहिती ‘महाव्होटर चॅटबॉट’या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक करून किंवा +917669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर hi करून माहिती मिळवू शकतो अथवा https://mahavoter.in या संकेत स्थळालाही भेट देऊ शकता.


ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत गरजूंना गुणवत्तापुर्ण घरे उपलब्ध करावीत – कृषि मंत्री दादाजी भुसे

ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत गरजूंना गुणवत्तापुर्ण घरे उपलब्ध करावीत – कृषि मंत्री दादाजी भुसे

मुंबई दि 1 – आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. गोरगरिब गरजूंचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ग्रामीण गृहनिर्माण योजने’ अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना आवास देण्याचे शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. पालघर जिल्ह्यात वाडा प्रमाणे ‘आशियाना घरकुल प्रकल्प’ स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने राबविल्यास राज्यातच नव्हे तर देशात पालघर जिल्हा मार्गदर्शक ठरेल असे कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत महा आवास अभियान ग्रामीण २०२१-२०२२ टप्पा- २ च्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषि मंत्री तथा पालघर जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, प्रकल्प अधिकारी तसेच इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री भुसे म्हणाले, सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेअंतर्गत महा आवास ग्रामीण अभियान राबविण्यात येत आहे. गरीब गरजूंची घरांची स्वप्ने पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी पालघर जिल्ह्यात महाआवास अभियान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी झाली असून, टप्पा २ अंतर्गतही उत्तम कामगिरी होणे अपेक्षित आहे. जेणेकरून राज्यातच नव्हे तर देशातही पालघर जिल्हा मार्गदर्शक ठरेल असेही पालकमंत्री श्री भुसे यांनी सांगितले.

वाडा तालुक्यात आशियाना प्रकल्पाअंतर्गत घरे बांधण्यात आली. त्याचप्रमाणे पालघर येथेही गरजूंना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. या गृहनिर्माण योजनेमध्ये स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, तंत्र शिक्षण संस्था यांचा सहभाग वाढवावा जेणेकरून घरांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास सहकार्य लाभेल असेही श्री भुसे यांनी सांगितले.

गावपातळीवर एकत्र येऊन स्थानिक प्रदेशातील साहित्य घरबांधणीसाठी वापरल्यास चांगले घर तयार होऊ शकेल.  ही घरे दीर्घकाळ टिकावी अशा गुणवत्तेची असावीत. ज्या गरजूंकडे जमिन नाही अशांना पंडीत दिनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत ५० हजारांचे अनुदान देण्यात येते. या अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भात शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. याचबरोबर बहुमजली गृहसंकुले, नवनवीन बांधकाम तंत्रज्ञान, सँड बँक वापरण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पहिल्या टप्प्यात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.  ग्रामीण अभियंत्यांचे मानधन वाढविण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. या राज्यव्यापी गृहनिर्माण मोहिमेअंतर्गत पालघर जिल्हा अव्वल ठरेल अशा प्रकारचे काम होईल असा विश्वास पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

सातारा : 20 शेळ्या व 2 बोकड असा शेळी गट वाटप योजनेसाठी पशुपालकांनी अर्ज करण्याचे आवाहन

20 शेळ्या व 2 बोकड असा शेळी गट वाटप योजनेसाठी पशुपालकांनी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा दि. 1 : राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सन 2021-22 या वर्षात सातारा जिल्ह्यामध्ये “20 शेळ्या व 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे” या योजनेसाठी निधी उपलब्ध झालाअसुन पशुपालकांनी योजनेचे परिपुर्ण अर्ज दि. 1 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीतच पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) संबंधित पंचायत समिती  यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.
या योजनेअंतर्गत शेळ्यांचा वाडा बांधकामासाठी व मोकळी जागा मिळून किमान 2000 चौ. फुट स्वत:ची जमीन, जागा लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे. एका शेळी गटाची किंमत रुपये 2 लाख 31 हजार 400  इतकी असून सर्व प्रवर्गांसाठी 50 टक्के अनुदान रुपये 1 लाख 15 हजार 700  देय असणार आहे.   गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के याप्रमाणे लाभार्थीच्या बॅंक खात्यात अनुदान  जमा करण्यात येणार आहे. 
योजनेच्या अर्जसोबत सादर करावयाची कागदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) संबंधित पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.
                                                               

शिवसमर्थ दिवाळी अंकावर गुणवत्तेची मोहोर

शिवसमर्थ दिवाळी अंकावर गुणवत्तेची मोहोर
तळमावले/वार्ताहर
अ‍ॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपादित झालेल्या शिवसमर्थ दिवाळी अंक 2021 ला ‘स्वदेशी सन्मान पुरस्कार’ मिळाला आहे. हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवसमर्थ दिवाळी अंकाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. याचा स्वीकार अंकाचे उपसंपादक डाॅ.संदीप डाकवे, इंद्रजित कणसे व सुभेदार जगन्नाथ शिद्रुक यांनी केला. या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा शिवसमर्थ दिवाळी अंकावर गुणवत्तेची मोहोर उमटली आहे.
जीवन इंगळे, ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, सुप्रसिद्ध कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे, प्रमोद झांबरे, प्रकाश सकुंडे, डाॅ. शिवाजी शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. पुरस्कार वितरणानंतर कवी हनुमंत चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या पुरस्काराचे संयोजन श्री.काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान तसेच स्वदेशी बचतगट सकुंडेमळा,यांनी केले होते.
यापूर्वी शिवसमर्थ च्या प्रथम दिवाळी अंकातील कथा इ.6 वी च्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात घेतली आहे. सन 2010 मध्ये दिवाळी अंकावर दै.नवाकाळ मध्ये प्रथम पानावर अग्रलेख छापून आला होता. सन 2011 रोजी अक्षररंग यांच्या वतीने दिवाळी अंकाला राज्यस्तरीय दिवाळी अंक पुरस्कार मिळाला आहे. सन 2012 ते 2015 या कालावधीत आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्यावतीने उत्कृष्ट मांडणी पुरस्कार मिळाला आहे. तर गतवर्षी मराठी वृत्तपत्रलेखक संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने शिवसमर्थ अंकाचा गौरव झाला आहे.
याशिवाय ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत भाऊंची भूमिका साकारणारे कलावंत प्रशांत चौडप्पा, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत विशाखाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पुनम चांदोरकर, अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे या सेलिब्रिटींसह अनेकांनी यंदाच्या दिवाळी अंकाचे कौतुक केले आहे. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अ‍ॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित केला जात आहे. या दिवाळी अंकांत नामवंत साहित्यिकांबरोबरच नवोदित लेखक कवी यांच्या साहित्याचाही समावेश केला जातो. आर्थिक सेवा देत असताना साहित्यिक चळवळीत शिवसमर्थ संस्था व परिवार योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.
या पुरस्काराबद्दल शिवसमर्थ चे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.

सातारा : वडाप /खाजगी बस : कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक केल्यास होणार दंड

सातारा : वडाप /खाजगी बस : कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक केल्यास होणार दंड  
सातारा दि. 01 :   सार्वजनिक,खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहन चालक-मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. तरी सातारा  जिल्ह्यातील सर्व खाजगी, सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा,टॅक्सी,बस,जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक-मालक यांनी  कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतूक करु  नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
 सार्वजनिक वाहनातून पुरविणाऱ्या वाहन मालकांनी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन न केल्यास कसूर करणाऱ्या व्यक्तींना 500/- रुपये इतका दंड व सेवापुरवठादार यांना 500/- रुपये इतका दंड आकारण्यात येईल. तसेच बसेसच्याबाबतीत कसूरीच्या प्रत्येक प्रसंगी 10 हजार  रुपये इतका दंड आकारण्यात येईल. वारंवार कर्तव्यात कसूर होत असेल तर कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक, एजन्सीचे  लायसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन किमान दोन दिवस बंद करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  विनोद चव्हाण यांनी  कळविले आहे.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...