सोमवार, ३ मे, २०२१

*सातारा जिल्ह्यातील :2502 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील :2502 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 3 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2502 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 126 (5240), कराड 233 (16378), खंडाळा  157 (6765), खटाव 173 (9350), कोरेगांव 192 (9252),माण 337 (6980), महाबळेश्वर 9 (3379), पाटण 136 (4463), फलटण 388 (13977), सातारा 585 (25211), वाई 151 (8289 ) व इतर 15 (594) असे आज अखेर  एकूण   109878  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (105), कराड 0 (449), खंडाळा 0 (85), खटाव 6 (268), कोरेगांव 5 (239), माण 4 (147), महाबळेश्वर 0 (32), पाटण 1 (120), फलटण 1 (194), सातारा 15 (770), वाई 3 (201) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2610 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

रविवार, २ मे, २०२१

*सातारा जिल्ह्यातील : 2217 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 44 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील : 2217 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 44 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 2 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2217 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 44 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 173 (5514), कराड 263 (16191), खंडाळा  134 (6608), खटाव 206 (9177), कोरेगांव 207 (9060),माण 144 (6643), महाबळेश्वर 76 (3370), पाटण 77 (4377), फलटण 278 (13589), सातारा 494 (24626), वाई 134 (8138 ) व इतर 31 (579) असे आज अखेर  एकूण   107472  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (104), कराड 10 (449), खंडाळा 3 (85), खटाव 6 (262), कोरेगांव 0 (234), माण 2 (143), महाबळेश्वर 0 (32), पाटण 0 (119), फलटण 6 (193), सातारा 13 (755), वाई 4 (198) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2574 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी हेल्पलाईन सेंटर ला भेट देऊन कामाच्या पद्धतीची माहिती घेतली व युवकच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

*कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन*

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी हेल्पलाईन सेंटर ला भेट देऊन कामाच्या पद्धतीची माहिती घेतली व युवकच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. 

 कराड: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बहुतांश नागरिकांना बसायला लागल्याने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्या परिस्थितीत युवक काँग्रेसने हेल्पलाईन ची मोहीम देशभर उघडली आहे.  कोरोना महामारीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केले आहेत. असेच हेल्पलाईन सेंटर कराड येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली उभारले आहे. हे हेल्पलाईन सेंटर सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना मदत तर करत आहेतच त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील रुग्णांना सुद्धा बेड मिळविण्यासाठी मदत करत आहेत. आज या हेल्पलाईन सेंटर ला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली तसेच हेल्पलाईन सेंटर मध्ये कश्याप्रकारे काम सुरु आहे याची माहिती घेतली व मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, युवानेते इंद्रजीत चव्हाण, युवकचे अमित जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 
 
 *याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. अनेक लोक कोरोनाने बाधित होत आहेत. अश्या परिस्थितीत बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी धावाधाव करीत आहेत. अश्या रुग्णांना मदत व्हावी त्यांना वेळेत उपचार सुरु व्हावेत यासाठी युवक काँग्रेसने देशभर हेल्पलाईन सेंटर सुरु केली आहेत. त्याच धरतीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुद्धा राज्यात प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सेंटर सुरु केलेली आहे. सातारा जिल्ह्यासाठी कराड येथून युवक काँग्रेसची हेल्पलाईन सेंटर झाली असून युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली या हेल्पलाईन सेंटर चे काम नियोजनपूर्वक चालले आहे. या हेल्पलाईन सेंटर मध्ये ज्यांचे मदतीसाठी फोन येत आहेत त्यांच्या रुग्णांची उपयुक्त पुरेशी माहिती घेतली जात आहे व त्यांना हवी असणारी योग्य ती मदत युवक काँग्रेसची टीम करत आहे. 

 *तसेच याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले कि,* कोरोना रुग्णांना मदत व्हावी या उद्देशाने प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केलेली आहे. या प्रत्येक हेल्पलाईन सेंटर मध्ये पूर्णवेळ स्वयंसेवक बसून कोरोना रूग्णांना मदत करीत आहेत. रेमडेसिव्हर इंजेक्शन, रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, दवाखान्यांनी दिलेली अतिरिक्त बिल कमी करणे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून देणे या कार्यात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व स्वयंसेवक राबत आहेत.या हेल्पलाईन सेंटर च्या माध्यमातून गेल्या पाच दिवसात १०० हुन अधिक रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध केले आहेत. तसेच रेमडेसिव्हर इंजेक्शन सुद्धा अनेकांना उपलब्ध केले आहेत. याचसोबत ज्यांना ज्यांना ऑक्सिजन मशीन ची गरज आहे अश्याना सुद्धा मशीन दिली जात आहे. युवक काँग्रेसच्या स्वंयसेवकांची नावे जाहिर केली असून हेल्पलाईन सेंटर ची टीम आरोग्य विभाग व डॉक्टर यांच्या संपर्कात असून प्रशासनाला अप्रत्यक्ष मदत करीत आहे.  
------------------------------------------------------

महाराष्ट्र देशात अग्रेसर पण आद्यप आव्हाने संपलेली नाहीत - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र देशात अग्रेसर पण आद्यप आव्हाने संपलेली नाहीत - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण

नवी दिल्ली, दि.१ :- भारताच्या उत्पन्नात महाराष्ट्राचे सर्वात जास्त म्हणजे पंधरा टक्के योगदान आहे. इथले सहकार प्रारूप देशाने स्वीकारले आहे. मराठी जनतेला इतिहासात संस्कृत, कला याचा प्रदीर्घ आणि समृद्ध वारसा लाभला आहे. परंतु, महाराष्ट्रासमोर आज अनेक आव्हाने उभी आहेत यावर मात केल्यास पुढील वाटचाल सुकर होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 39 वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘महाराष्ट्राची 60 वर्षातील जडणघडण  आणि आव्हाने’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की, सामाजिक प्रबोधनाची सुरुवात महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाली होती. ब्रिटिश राजवटीतसुद्धा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक सुधारणांना गती देणाऱ्या अनेक चळवळी सुरू झाल्या. सामाजिक प्रबोधनाची सुरवात संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या लेखणी आणि कीर्तनातून केली.

पुढे राजधर्म पाळणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जाणत्या राजाची त्याला जोड मिळाली. शाहू -फुले -आंबेडकर यांनी विषमतेविरुद्ध बंड पुकारून जागृती निर्माण केली.  

महाराष्ट्र देशात अग्रेसर

श्री. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचे सहकार प्रारूप देशातील अनेक राज्यांनी स्वीकारले. बँका, शिक्षण संस्था, शेतीमालावर प्रक्रिया करणारे सहकारी कारखाने, दूध डेअरीसारखे उद्योग, सूतगिरणी, कृषिमाल खरेदी-विक्री करणाऱ्या संस्था असा विविध क्षेत्रात राज्य अग्रेसर ठरले आहे. 1972 च्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्राने रोजगार हमी योजना सुरू केली. पुढे मनरेगाच्या स्वरूपात देशात कायदा झाला.

महाराष्ट्राची पुरोगामी धोरणे

महिलांना केंद्रस्थानी मानून अनेक योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. नोकरीत 30 टक्के आरक्षण तर स्थानिक निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण महाराष्ट्राने दिलेले आहे. वर्ष २०१३ मध्ये जादूटोणा व अघोरी प्रथा विरोधी कायदा तर 2016 मध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा करून महाराष्ट्राने आपली पुरोगामी विचारसरणी अधोरेखित केली आहे. दादासाहेब फाळके यांच्यासारखे चित्रपटसृष्टीचे जनक महाराष्ट्रात झाले. वैज्ञानिक संशोधनामध्ये होमी भाभा यांनी भारतात अणू विज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली. भाभा अनुसंधान केंद्र असेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च,  टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे सर्व महाराष्ट्रात आहे. पुण्यामध्ये अनेक शिक्षण संस्था व संशोधन केंद्रे आहेत. मागील काही दशकात महाराष्ट्रातील प्रमुख शहरात औद्योगिक वसाहती, सेवा क्षेत्र. महामार्ग, टोलेजंग इमारती, मल्टिप्लेक्स, पंचतारांकित हॉटेल, यामुळे राज्यात समृद्धी निर्माण झाल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रासमोरील आव्हाने

आज महाराष्ट्रासमोर अनेक आव्हाने आहेत. कोरोना महामारीमुळे सर्वच संदर्भ बदलले आहेत. येणाऱ्या काळात आर्थिक धोरण आखून राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत त्याचे लाभ कसे पोहोचतील हे ठरवण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे.

एका बाजूला समृद्धी दिसून येत असताना दुसऱ्या बाजूला पाणीटंचाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कमी प्रमाणात रोजगार निर्मिती, कुपोषण, बकाल शहरे, वाढत्या झोपडपट्ट्या आणि त्याच्या पुनर्विकासाचा प्रश्न, नागरी सुविधा, घनकचरा व्यवस्थापन ही नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. राज्याचे तीन चतुर्थांश उत्पन्न हे मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, रायगड या जिल्ह्यातून येतं. यामुळे मराठवाडा, विदर्भ, खान्देश कोकण, उत्तर महाराष्ट्र यामध्ये अन्यायाची भावना आहे. या असमतोल विकासामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री चव्हाण पुढे म्हणाले, आपल्या राज्यात युवा मनुष्य बळ, समाधानकारक पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा, गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था, जोडीला इंग्रजी भाषा आणि गणित यांच्या आधारे महाराष्ट्राने नॉलेज एकॉनोमीकडे वाटचाल करायला सुरुवात केली पाहिजे. त्यांनी सार्वजनिक शिक्षण व आरोग्य यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्यक असल्याचेही सांगितले.

तीन प्रमुख आव्हाने…

वाढते व अनियोजित नागरीकरण, शाश्वत शेती व युवकांची वाढती बेरोजगारी ही तीन सर्वात मोठी आव्हाने महाराष्ट्रासमोर असल्याचे श्री. चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी आणि कालव्याऐवजी जलवाहिनीद्वारे जल वितरण करावे असा सल्लाही त्यांनी दिला.

आयात-निर्यात करण्यावर भर देताना त्यांनी शेतकरी निर्मित कंपन्या जिल्ह्या- जिल्ह्यामध्ये सुरु होण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोजगार वाढविण्यासाठी महाराष्ट्रात नवीन उद्योग आकृष्ट करण्यामध्ये कमी पडतो आणि यात मूलभूत संशोधन व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आदिवासी भागातील कुपोषण या विषयावरही भाष्य केले. श्री. चव्हाण यांनी नव्या पिढीला आणि नव्या राजकर्त्यांना महाराष्ट्रात प्रचंड मोठी संधी असल्याचे सांगितले. त्यांनी कोरोनानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचे आव्हान नवे नेतृत्व नक्कीच पेलू शकेल, असा विश्वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.

शनिवार, १ मे, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 2383 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 2383 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 34 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 1: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 117 (4941), कराड 309 (15953), खंडाळा  209 (6474), खटाव 145 (8971), कोरेगांव 273 (8853),माण 123 (6499), महाबळेश्वर 25 (3294), पाटण 71 (4300), फलटण 406 (13361), सातारा 515 (24132), वाई 165 (8004 ) व इतर 25 (548) असे आज अखेर  एकूण   105350  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (104), कराड 7 (439), खंडाळा 0 (82), खटाव 3 (256), कोरेगांव 1 (234), माण 0  (141), महाबळेश्वर 1 (32), पाटण 1 (119), फलटण 3 (187), सातारा 9 (742), वाई 8 (194) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण  2530 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कंत्राटी वैद्यकीय अधिका ऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

कंत्राटी वैद्यकीय अधिका ऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

काळगांव/संदीप डाकवे
गेली दोन वर्षापासून कोरोना काळात ग्रामीण विभागात जीवापाड मेहनत घेतलेल्या कंत्राटी बी.ए.एम.एस.वैद्यकीय अधिकारी यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. जनतेच्या सेवेसाठी या अधिकारी लोकांनी कधीही हयगय केल्याचे दिसून येत नाही. या कठीण प्रसंगात जीवतोड काम करत असताना वेळेवर मानधन देखील मिळत नव्हते. अशी अवस्था विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी स्वरुपात नेमणूक दिलेल्या डाॅक्टरांची आहे. ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ ही म्हण कंत्राटी स्वरुपाच्या डाॅक्टरांनाच लागू होते की काय असे वाटल्यावाचून राहत नाही. 11 महिन्यांसाठी दिलेल्या नेमणूकीमुळे नोकरीवर टांगती तलवार आली आहे. त्यामुळे त्यांची प्रचंड घुसमट होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
महाराष्ट्र शासनाने 15 जुलै, 2019 रोजी कंत्राटी पध्दतीने बीएएमएस व एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांना नेमणूका दिल्या. सदर नेमणूकांचा कालावधी हा 11 महिन्यांचा आहे. तो कालावधी जून महिन्यात संपणार आहे. तो नुतनीकरण झाला नाही तर प्राथमिक आरोग्य कें्रदातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी अक्षरशः ‘सलाईन’ वर आहेत. त्यांच्या जीवाची घालमेल होत आहे. या कर्मचाÚयांना अचानक सेवेतून कमी केले तर ते जाणार कुठे? असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. पर्यायाने त्यांच्या कुटूंबालाही याचा मोठा फटका बसणार आहे.
तसेच जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस वेळ देणारे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेत मिळाला नाही. अगदीच काही दिवसापूर्वी त्यांना 8 महिन्यापैकी 4 महिन्याचा पगार मिळाला आहे. ही गोष्ट खूप खेदाची आहे. कोरोना आल्यापासून या लोकांचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. त्यांचे मानधन वेळेत मिळत नसले तरी या अधिकाÚयांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसून ठेवलेली नाही. त्यामुळे अशा अधिकाÚयांना सलाम करावा लागेल. 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये सदर वैद्यकीय अधिकाÚयांची नेमणूक होत असते ही नेमणूक तात्पुरत्या स्वरुपाचे असल्याने त्यांना रजा, पी एफ व शासनाच्या अन्य सुविधांचा लाभ मिळत नाही.
वास्तविक कोवीड-19 च्या काळात या डाॅक्टरांनी केलेले काम नाकारता येणार नाही. ग्रामीण भागात दिवसरात्र काम करुन लोकांना सतर्क आणि अलर्ट ठेवण्याचे काम या लोकांनी केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यात या वैद्यकीय अधिकाÚयांनी इतर सहकाÚयांबरोबर राहत मोठे योगदान दिले आहे. अशा अधिकाÚयांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे इतरांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे ‘देवदूत’ सध्या मात्र प्रचंड ताणाखाली आणि दबावाखाली आहेत. त्यामुळे सदर वैद्यकीय अधिकारी यांना पुन्हा सेवेत घेवून कायम करावे अशी मागणी या डाॅक्टरांनी निवेदनाव्दारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने 15 जुलै, 2019 रोजी मुलाखती घेवून बी.ए.एम.एस., एम.बी.बी.एस. अर्हता धारकांच्या नेमणूका झाल्या. जाहीरात प्रसिध्दी करून महाराष्ट्र वैद्यकिय व सार्वजनिक आरोग्य सेवा गट अ वैद्यकिय अधिकारी पदांची भरती प्रक्रिया वारंवार राबवून सुध्दा एम.बी.बी.एस.अर्हता धारकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे पदे रिक्त राहत होती. रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा डळमळीत झाली होती. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकिय व सार्वजनिक आरोग्य सेवा गट अ वैद्यकिय अधिकारी पदांची भरती प्रक्रिया नव्याने राबवून नवीन पदनिर्मिती करून कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ पद आस्थापनेवर बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना 11महिन्यांसाठी नेमणूक देण्यात आली व रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एकुण रिक्त पदांच्या फक्त 75 टक्के पदांची भरती प्रक्रिया नव्याने राबवून नवीन पद निर्मीती करून कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ म्हणून बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना नेमणूक देणे अपेक्षित होते. जेणेकरून एम.बी.बी.एस.अर्हता धारक बंधपत्रित वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती झालेस कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ यांना बदली नियुक्ती उर्वरित रिक्त 25 टक्के पदांवर करता येईल अशी प्रशासकीय सोय करण्यात आली होती.
     परंतु सातारा जिल्हयात 67 पदे रिक्त होती व सर्व 67 पदांची भरती प्रक्रिया नव्याने राबवून कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. बंधपत्रीत एम.बी.बी.एस.अर्हता धारकाची नियुक्ती झालेस कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ म्हणून बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना पद रिक्त नसल्याने कार्यमुक्त करण्यात येणार आहे.
    बंधपत्रीत एम.बी.बी.एस.अर्हता धारकाची नियुक्ती ही 1 वर्ष कालावधीसाठी करण्यात येते. बंधपत्रीत एम.बी.बी.एस. अर्हता धारक हे पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी शासकीय बंधपत्र शक्तीचे असलेनेच पदस्थापना स्वीकारत असतात. बरेच वेळा बंधपत्रीत एम.बी.बी.एस.अर्हता धारक प्रत्यक्ष आरोग्यसेवा देत नसल्याचे निदर्शनास आले आहे व कागदोपत्री हजेरी पत्रक देवून बंधपत्रातील कालावधी पूर्ण करतात. त्यामुळे शासनाचा ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचा मुलभूत उद्देश सफल होत नसल्याचे दिसते व शासनाचे आर्थिक नुकसान होते. एम.बी.बी.एस.अर्हता धारकांचा बंधपत्रातील कालावधी पूर्ण झालेनंतर लगेचच नवीन बंधपत्र एम.बी.बी.एस.अर्हता धारकाची नियुक्ती होणेची शक्यता फार कमी असते त्यामुळे पद रिक्त राहून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होते.
कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस. अर्हता धारक अतिशय चांगले कामकाज पाहत आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सेवा नियमितपणे देत आहेत. परंतु 11महिन्याचा कालावधी समाप्तीनंतर देण्यात आलेल्या दि.13/08/2020 रोजीच्या पुनर्नियुक्ती आदेशामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अट क्र.3 नुसार बंधपत्रीत एम.बी.बी.एस.अर्हता धारकाची नियुक्ती झालेस कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना देण्यात आलेली नेमणूक समाप्त करण्यात येईल असे नमूद केले आहे. शासन निर्णयानुसार 75 टक्के भरती प्रक्रिया न राबविल्याने कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना प्रशासकीय कारणास्तव अन्यायकारकरित्या कार्यमुक्त व्हावे लागणार आहे. यामुळे कार्यमुक्त होणारे कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस. अर्हता धारक यांचे कुटूंबावर आर्थिक संकट येणार आहे. महाराष्ट्र शासनाने वरील गोष्टींचा सहानभुतीपुर्वक विचार करावा. अषी मागणी वैद्यकीय अधिकारी यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
 तसेच एम.बी.बी.एस. अर्हता धारक बंधपत्रित वैद्यकिय अधिकारी यांना ग्रामीण रूग्णालयाचे ठिकाणी प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी व त्यानंतरच प्राथमिक आरोग्य केंद्राचे ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी. बंधपत्रीत ंएम.बी.बी.एस.अर्हता धारक यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे ठिकाणी नियुक्ति देण्यात आलेस कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना कार्यमुक्त न करता त्याच आरोग्य संस्थेमध्ये तृतीय वैद्यकीय अधिकारी गट ब पदस्थापनेवर नियुक्ति देण्यात यावी व त्यासाठी आवश्यक शासन निर्णय करावा अशी कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ म्हणून कार्यरत बी.ए.एम.एस. अर्हता धारक यांची नम्र विनंती आहे.
वास्तविक पाहता कोविड 19 साथीचा सामना करताना कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांनी अनियमित मानधन मिळत असताना सुध्दा सामाजिक जबाबदारी भान राखून व मानवतावादी दृष्टिकोन ठेवून, कोणतीही तक्रार न करता, कोरोना योध्दा म्हणुन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड साथ रोखण्यासाठी मोलाची कामगिरी पार पाडली आहे आणि अजुनही जबाबदारीने कार्यरत आहोत.
    तसेच महाराष्ट्र वैद्यकिय व सार्वजनिक आरोग्य सेवा गट अ वैद्यकिय अधिकार पदांची भरती प्रक्रिया नव्याने राबवून नवीन पदनिर्मीती करून कार्यरत कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस. अर्हता धारक व कंत्राटी वैद्यकिय  अधिकारी गट अ एम.बी.बी.एस. यांना सेवेत घ्यावे.
महाराष्ट्र शासनाच्या 26 मे 1981 च्या शासन निर्णयानुसार आयुर्वेद बीएएमएस चिकित्सक व एॅलोपॅथी एमबीबीएस चिकित्सक यांना समकक्ष दर्जा आहे. वेतन आणि इतर समान धोरण लागू करण्यात आले आहे. तरीदखेील एमबीबीएस व बीएएमएस यांच्या मानधनात तफावत आहे. म्हणून कार्यरत बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांचे मानधनातील तफावत दुर करणेसाठी सुधारित शासन निर्णय करण्यात यावा अशी मागणी कंत्राटी स्वरुपात काम करत असलेल्या बी.ए.एम.एस आर्हताधारक वैद्यकीय अधिकारी यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

चैकटीत:
आम्हाला समजलेल्या माहितीनुसार कोवीड काळासाठी तात्पुरते तीन महिन्याकरता तसेच बंधपत्रित बोंडेड वैद्यकीय अधिकारी यांची आरोग्य विभागात नियुक्ती होत आहे. त्यामुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची सेेवेत राहण्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
कोरानाकाळात आम्ही सर्व लोकांनी स्वतःची कुटूंबाची आणि जीवाची पर्वा न करता शासनाच्या आदेशानुसार यशस्वी काम केले. आणि आताही त्याच उमेदीने अनुभवाच्या बळावर अधिक सक्षमतेने काम करण्यास सज्ज आहोत. तरी आम्हा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना सेेवेतून काढून टाकण्यात येवू नये. शिवाय ज्यांचा 11 महिन्याचा कालावधी संपला आहे त्यांना पुन्हा सेवेत ठेवून काम करण्याची संधी द्यावी.
- एक कंत्राटी वैद्यकीय अधिकारी

थोडक्यात:
बी.ए.एम.एस.डाॅक्टरांच्या अशा आहेत मागण्या:
नियमित सेवेत सामावून घ्यावे
दरमहा वेळेवर मानधन मिळावे
नवीन पदनिर्मिती करुन सेवेत समावेश करुन घ्यावे
समान काम समान वेतन असावे

नवी दिल्ली : महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत आज माजी श्री.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे व्याख्यान

नवी दिल्ली : महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत आज माजी श्री.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे व्याख्यान

नवी दिल्ली दि ०१ : माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण हे आज १ मे या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत “महाराष्ट्राची ६० वर्षातील जडणघडण आणि आव्हाने” या विषयावर ३९ वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला १ मे रोजी ६१ वर्ष पूर्ण होत आहेत आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने परिचय केंद्राने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु केली आहे. या व्याख्यानमालेत महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण हे आपले विचार मांडणार आहेत.

समाज माध्यमांद्वारे व्याख्यानाचे प्रसारण

आज शनिवार दि १ मे २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राच्या खालील लिंक वर थेट प्रसारित होईल.

थेट प्रसारण येथे पाहा

ट्विटर

https://twitter.com/MahaGovtMic

https://twitter.com/micnewdelhi

https://twitter.com/MahaMicHindi

यू ट्यूब

https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhi

फेसबुक

https://facebook.com/micnewdelhi

कू(Koo)

https://www.kooapp.com/profile/micdelhi

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...