शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था पुढाकारबीड व संभाजीनगर जिल्ह्यात 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था पुढाकार
बीड व संभाजीनगर जिल्ह्यात 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


बीड व संभाजीनगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून शिक्षणाची साधनेही बाधित झाली आहेत. अशा कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुन्हा शालेय जीवनाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्यात शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था पुढे सरसावली आहे. समाजाशी असलेली आपली बांधिलकी जपत संस्था गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, यंदा दहाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष मदत उपक्रम आयोजित केला.

शनिवार, दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी बीड जिल्ह्यातील शिवणी आणि संभाजीनगर जिल्ह्यातील ता. पैठण या पूरग्रस्त भागांतील शाळांमध्ये संस्थेच्या वतीने मदत वितरण कार्यक्रम पार पडला. पूरपरिस्थितीत शालेय साहित्याचे मोठे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी एकूण 150 विद्यार्थ्यांना नवीन “स्कूल किट”चे वाटप करण्यात आले. या स्कूल किटमध्ये वह्या, पेन, पेन्सिल, रबर, पट्टी, रंगीत साहित्य आदी शैक्षणिक वस्तूंचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद व उत्साह पाहून संस्थेच्या कार्यकर्त्यांना समाधानाची जाणीव झाली.

पूरामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती डळमळीत झाली असून, शालेय खर्च भागविणे कठीण झाले होते. अशा स्थितीत मिळालेली ही मदत विद्यार्थ्यांसाठी “लाखमोलाची” ठरली. अनेक पालकांनी संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

या कार्यक्रमाला प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद कदम, कार्यकर्ते प्रशांत खरात, विजय कदम, श्याम खेडेकर, प्रताप कदम, महादेव खरात यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शिवणी गावचे सरपंच अजय सुपेकर, उपसरपंच कॉ. सुधाकर डोळस, समाजसेवक ज्योतीराम हुरकुडे यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. तसेच पैठण येथील आमदार अशोक पाठक, समाजसेवक विष्णू अण्णा बोडके आणि गावातील इतर मान्यवरांनीही उपस्थित राहून संस्थेच्या उपक्रमाचे स्वागत केले.

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असे उपक्रम शिक्षणाची गती वाढविण्यास महत्त्वपूर्ण ठरतात, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेच्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून, समाजातील विविध घटक एकत्र येऊन शिक्षणासाठी काम करत असल्याचा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून पसरला आहे.

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

मानखुर्द - २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना मनसे प्रभाग १४३ कडून अभिवादन.


२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना मनसे प्रभाग १४३ कडून अभिवादन

मानखुर्द प्रतिनिधी विजय साबळे मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या वीर पुत्रांना तसेच हल्ल्यात प्राण गमावलेल्या निरपराध नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना – अणुशक्ती नगर विधानसभा, प्रभाग क्रमांक १४३ यांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम दिनांक २६ नोव्हेंबर २०२५, बुधवार रोजी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, श्री नवीनभाऊ आचार्य, श्री रविंद्रदादा शेलार, श्री सचिनदादा ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे संयोजन श्री सुरेशभावजी शेट्टी, श्री राजेशदादा पूर्भे, श्री कैलासदादा चौधरी, श्री संदीपदादा बनसोडे, श्री योगेश घनदाट, श्री पवन पवार यांच्या सहकार्याने करण्यात आले.

श्रद्धांजली कार्यक्रमाला ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक,तसेच श्री किसन टिकेकर, श्री राजाराम मांगले, श्री लक्ष्मण जानकर, श्री अमोल मुळे तसेच शिवसेना शाखाप्रमुख श्री.कि‍रण सावंत, श्री कृष्णा शिंदे (मामा)  यांसह शिवसेना व महाराष्ट्र सैनिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शहीद जवानांना पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमात २६/११ च्या स्मृती उजाळ्या देत हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याची आठवण करून देण्यात आली. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी भारताच्या सुरक्षेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.


आयोजक

  • मनसे सर्व मित्र परिवार – प्रभाग १४३
  • सौ. अस्मिताताई कोयंडे – महाराष्ट्र सैनिक
  • श्री. अविनाश नटे – शाखा सचिव


बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५

मानखुर्द - ट्रॉम्बे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!सत्र न्यायालयातून पळालेल्या न्यायालयीन कैद्याला 24 तासांत ताब्यात



मानखुर्द - ट्रॉम्बे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!

सत्र न्यायालयातून पळालेल्या न्यायालयीन कैद्याला 24 तासांत ताब्यात

साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी मानखुर्द

मुंबई, दि. 26 नोव्हेंबर 2025 :
ट्रॉम्बे पोलीस ठाणे आणि कुलाबा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अवघ्या 24 तासांत सत्र न्यायालयातून पसार झालेल्या न्यायालयीन कैद्याला गुन्हेगारी पद्धतीने शोध घेत अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने व काटेकोर तपासातून आरोपीला महाराष्ट्रनगर, मानखुर्द येथून ताब्यात घेतले.


घटनेचा सारांश

कुलाबा पोलीस ठाण्यात फिर्यादी पो. शि. क्र. 062074 सचिन लाटवडे यांच्या तक्रारीवरून दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी गु.र.क्र. 0281/2025, कलम 262 (बी.एन.एस. 2023) अनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. सत्र न्यायालय, मुंबई येथून आरोपी रामकुमार गयाप्रसाद निषाद उर्फ कुमार हिंदू (वय 45) हा पळून गेला होता.

आरोपी हा मूळ उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्याचा रहिवासी असून त्याचे नातेवाईक मानखुर्द परिसरात असल्याची माहिती समोर आली होती. त्या आधारे पथकाने शोधमोहीम सुरू केली.


ट्रॉम्बे पोलिसांची बारकाईने तपास मोहीम

पोलीस उपायुक्त परिमंडळ-06 यांच्या मार्गदर्शनानुसार, ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला तत्काळ कुलाबा पोलिसांना मदत करण्यासाठी रवाना करण्यात आले.

तपासादरम्यान—

  • लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथील CCTV फुटेजची तपासणी
  • आरोपीच्या नातेवाईकांचा मागोवा
  • गुप्त बातमीदारांद्वारे माहिती संकलन
  • मानखुर्द परिसरात सखोल शोध अभियान

ही सर्व पावले उचलून पथकाने अवघ्या 24 तासांत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला.

शेवटी, आरोपी महाराष्ट्रनगर, मानखुर्द, मुंबई येथून अटक करण्यात आला व पुढील तपासासाठी तो कुलाबा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला.


अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी

संपूर्ण तपास पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला—

  • मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग –
  •   श्री. महेश पाटील
  • मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-06 –
  •   श्री. समीर शेख
  • सहायक पोलीस आयुक्त, ट्रॉम्बे विभाग –
  •   श्री. कलीम शेख
  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्रॉम्बे – 
  • श्रीमती ऋता नेमळेकर
  • पोलीस निरीक्षक (गुन्हे), ट्रॉम्बे – 
  • श्री. तुकाराम कोयंडे

तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी :

  • API रोहिदास जाधव
  • पोहक्र 960298 / सावंत
  • पो.ह.क्र. 070084 / शिंदे
  • पो.शि.क्र. 093514 / सुरवसे
  • पो.शि.क्र. 130289 / पाटील
  • पो.शि.क्र. 141332 / बावीस्कर
  • पो.शि.क्र. 09796 / पाटील
  • पो.शि.क्र. 140134 / घूटूगडे
  • पो.शि.क्र. 150694 / आटपाडकर

या सर्वांच्या टीमवर्कमुळेच आरोपीच्या तात्काळ अटकेत यश मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.


न्यायालयीन कैद्याच्या अटकेनंतरचा पुढील तपास

कुलाबा पोलिसांकडे आरोपीला सुपूर्द केल्यानंतर त्याच्या पलायनाची कारणे, त्याला कोणी मदत केली का, तसेच त्याचा पूर्वेतिहास याचा तपास सुरू आहे.


मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

धक्कादायक प्रकार ! 'पारनेरमधील आजीच्या खून प्रकरणी नातू, नातसूनेस अटक'; दाेघांनी रचला बनाव, नेमकं काय घडलं?

धक्कादायक प्रकार ! 'पारनेरमधील आजीच्या खून प्रकरणी नातू, नातसूनेस अटक'; दाेघांनी रचला बनाव, नेमकं काय घडलं?


पारनेर दि.17 नोव्हेंबर 2025 प्रतिनिधी - वसंत भिकाजी पुंडे

आजीचा खून करून तिच्या अंगावरील सुमारे ३ लाख ८ हजारांचा ऐवज घेऊन पळून गेलेल्या नातवास व त्याच्या पत्नीस पोलिसांनी आज (ता. १७) ताब्यात घेतले. गुन्हा घडल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी (ता. १६) गारगुंडी येथील चंद्रभागा फापाळे यांचा खून झाला होता. घरी कोणीच नसताना त्यांचा गळ्यातील व कानातील दागिने चोरीच्या हेतूने खून झाला होता.

या बाबत चंद्रभागा फापाळे यांचा मुलगा पंढरीनाथ फापाळे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून तेजस शांताराम फापाळे व त्याची पत्नी वैष्णवी तेजस फापाळे यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती.

त्यातील एका पथकाने टाकळी ढोकेश्वर ते आळे फाटा रस्त्यावर पाठलाग करून तेजस व वैष्णवी यांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे करत आहेत.

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

*धामणी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भव्य कार्यक्रम*

📰 धामणी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भव्य कार्यक्रम 📰


कुमजाई पर्व प्रतिनिधी मनोज सावंत -

पाटण तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत दिनांक 3 नोहेबर रोजी भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास माननीय गटविकास अधिकारी सौ. सरिता पवार मॅडम, गटशिक्षणाधिकारी बोरकर मॅडम, विस्तार अधिकारी श्री. दवंडे साहेब, तसेच धामणी ग्रामपंचायत सरपंच सौ. शितल पाटील मॅडम, उपसरपंच श्री. अविनाश गुरव, ग्रामपंचायत सदस्य श्री. रमेश सवादेकर, सौ. आशाताई नेर्लेकर, सौ. लक्ष्मी चव्हाण, सौ. सुजाता पवार, ग्रामपंचायत अधिकारी श्री. किसन रोंगटे अण्णासाहेब, शाखा अभियंता श्री. संदीप पाटील, तालुका संगणक समन्वयक श्री. महेश आमले, घरकुल विभागाचे श्री. प्रतीक पाटील, अंगणवाडी सुपरवायझर सौ. गरुड मॅडम, आरोग्य सेवक श्री. युवराज शेवाळे, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापक सौ. राधा पाटील मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मनोज सावंत, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कृषी सखी सौ. कविता कुराडे मॅडम, बचत गट अध्यक्ष, सचिव व इतर महिला सदस्य, तसेच कुंभारगाव ग्रामपंचायत अधिकारी श्री. घोडे अण्णासाहेब, श्री. शामराव पुजारी सर, संगणक परिचालक सौ. सविता दिंडे मॅडम, सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन करून करण्यात आली. त्यानंतर माननीय पवार मॅडम यांनी ग्रामस्थांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच ग्रामपंचायत दप्तर तपासणी, मॉडर्न शाळेची पाहणी करून शैक्षणिक सुविधा तपासल्या.

त्यानंतर घरकुल योजनेअंतर्गत भूमिपूजन व गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी विविध विषयांवर ग्रामपंचायतीत चर्चा करण्यात आली.

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला असून ग्रामस्थांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

गणितात मुलांची गती वाढविणारी खास “पाढ्यांची कार्यशाळा”!



गणितात मुलांची गती वाढविणारी खास “पाढ्यांची कार्यशाळा”!

सिंधुदुर्ग :
मुलांच्या गणितावरील भीती दूर करून त्यांना गणितात पारंगत बनविण्यासाठी सदाशिव पांचाळ ट्रेनिंग अकादमी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने एक आगळीवेगळी “पाढ्यांची कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत मुलांना दोन, तीन आणि चार अंकी पाढे कॅल्क्युलेटरपेक्षाही जलद कसे मांडायचे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांची कॅल्क्युलेशन स्पीड, अचूकता आणि एकाग्रता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

कार्यशाळेची वैशिष्ट्ये:

  • दोन, तीन आणि चार अंकी पाढे झटक्यात म्हणण्याचे प्रशिक्षण
  • अनुभवी प्रशिक्षकांकडून थेट मार्गदर्शन
  • गणितातील गती आणि अचूकता वाढविण्याचे तंत्र
  • मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास आणि आत्मविश्वास वृद्धी

कार्यशाळेचे फायदे:

  • गणितातील कौशल्यात लक्षणीय सुधारणा
  • आत्मविश्वास आणि एकाग्रतेत वाढ
  • अभ्यासात गोडी निर्माण होऊन शालेय यशाची नवी वाट

आजवर लाखो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून, पालकांमध्ये या कार्यशाळेची चांगली उत्सुकता पाहायला मिळत आहे.

📅 तारीख: शनिवार, ८ नोव्हेंबर २०२५
वेळ: सायंकाळी ७.०० (कालावधी : सुमारे २ तास)
📍 ठिकाण: Zoom Workplace वर Online Live Practical सत्र

आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच नोंदणी करा!
👉 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा


🎯 खालील काही प्रतिक्रिया, जरूर ऐका! 👇👇👇 🎙️ 1. आम्ही नव्हे, आमचे प्रशिक्षणार्थी बोलतात! त्यांच्याच शब्दांत ऐका — आमची “पाढ्यांची कार्यशाळा” किती महत्त्वाची आहे ते स्वतः ठरवा! 👉 व्हिडिओ पाहा

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

कुंभारगाव - धक्कादायक घटना! मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग.



धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग

मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) — मलकापुरातील रिलॅक्स बारसमोर शनिवारी मध्यरात्री धक्कादायक प्रकार घडला. दारू पिताना जुन्या वादावरून झालेल्या भांडणात मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना समोर आली आहे.

खून झालेल्याचे नाव सुदर्शन ऊर्फ राजू हणमंत चोरगे (वय २६, सध्या रा. पोळवस्ती, आगाशिवनगर, मूळ रा. गलमेवाडी,(कुंभारगाव ) ता. पाटण) असे असून, आदित्य पांडुरंग देसाई (वय २१, रा. कोल्हापूर नाका) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रियदर्शनी चोरगे यांनी कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित देसाईला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बाराच्या सुमारास रिलॅक्स बारसमोर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर जुन्या भांडणाचा राग मनात धरून आदित्यने कमरेला असलेल्या गुप्तीने सुदर्शनच्या पोटात व छातीवर सपासप वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच आज (रविवार) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

शवविच्छेदनानंतर दुपारी सुदर्शनचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार, तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत रात्रभर संशयिताचा शोध घेतला आणि अखेर सकाळी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश तारू पुढील तपास करीत आहेत.



साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...