शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक :नूतन तालुका कार्यकारणी, जिल्हा कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी निवडी व तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात होणार विचारविनिमय

पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक :नूतन तालुका कार्यकारणी, जिल्हा कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी निवडी व  तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात होणार विचारविनिमय 
पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन तालुका कार्यकारणी, जिल्हा कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणी निवडी संदर्भात व पाटण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करणे करता सोमवार दि.११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पाटण स्पोर्टस् क्लब (स्टेडियम) येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सरचिटणीस सुभाषराव पवार यांनी प्रसिद्धी दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात सध्या कार्यरत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेलची कार्यकारणी बरखास्त करण्यात आलेली आहे, तसेच या बैठकीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकींसंदर्भात विचार विनिमय करण्यात येणार आहे.

बैठकीस विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी/माजी सदस्य सदस्य, सर्व संस्थांचे आजी/माजी संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुभाषराव पवार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...