गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच धार्मिक स्थळांना भेट द्यावीगृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे जनतेला आवाहन

शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच धार्मिक स्थळांना भेट द्यावी
गृह  राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे जनतेला आवाहन 
सातारा दि. 7  राज्य शासनाने आजपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी खुली केली आहेत. नागरिकांनी धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेट देत असताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुनच भेट द्यावी, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
श्री. देसाई यांनी दत्त मंदिर, पंचमुखी गणेश मंदिर व साईबाबा मंदिरात भेट देवून तेथील व्यवस्थेची पहाणी केली. यावेळी ते बोलत होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभमीवर शासनाने राज्यातील धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती. आज घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे उघण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक व प्रार्थनास्थळांना भेटी देत असताना नागरिकांनी  मास्कचा वापर, सामाजिक अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता ठेवावी व शासनाने दिलेल्या नियमांचे   काटेकोरपणे पालन करावे असेही आवाहनही श्री. देसाई यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...