बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

रब्बीचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार : कुंभारगावात शेतीशाळेचे आयोजन

रब्बीचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार : कुंभारगावात शेतीशाळेचे आयोजन 
कुंभारगाव : खरिप हंगामाचे पावसामुळे नुकसान झालेले आहे. मात्र, रब्बीत तरी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या हेतूने राज्यातील सर्व जिल्ह्यात शेतीशाळा घेण्यात येत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जात असून याची जबाबदारी ही कृषी सहायकावर आहे.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न हे केले जात आहेत. त्याचअनुशंगाने कुंभारगाव ता.पाटण येथील सांस्कृतिक भवनात मंगळवार दि.5 आक्टोबर रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियनांतर्गत रब्बी ज्वारी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी कृषि पर्यवेक्षक एस. टी. नेवसे, कृषी सहायक ए. बी. पवार ( कुंभारगाव विभाग), एन. एस. मुळीक(घोटील विभाग) , पी. एम. 
 गाढवे (उधवणे विभाग).उपस्थित होते.

यावेळी कृषी सहायक ए. बी. पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ज्वारी पीक संदर्भात मार्गदर्शन केले.यामध्ये बीजप्रक्रिया,पेरणी,खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन,याबद्दल सविस्तर माहिती दिली.शेतकऱ्यांना कोणत्या पिकाला हवामाह अनुकूल आहे. त्याचा उत्पादनावर काय परिणाम होणार  तर पेरणापासून बाजारपेठपर्यंतची माहिती ही शेतकऱ्यांना दिली. यामध्ये हरभऱ्यावरील घाटी आळीचा प्रादुर्भाव कसा आटोक्यात आणावा, मका आणि ज्वारीवरील लष्करी आळी आणि ऊसावरील हुमनी नियंत्रणाच आणण्यासाठी मार्गदर्शन केले.
- पिकाची पेरणी होताच हे धडे दिल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
यावेळी शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेसाठी लागणारे औषधे मोफत देण्यात आली 
या कार्यक्रमात कुंभारगावचे प्रगतशील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व गट शेतीचे फायदे समजावून सांगितले. त्यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्याचे स्वागत केले व आभार मानले यावेळी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...