रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 175 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; दोन बाधितांचा मृत्यू**52 जणांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 175 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; दोन बाधितांचा मृत्यू*
*52 जणांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.3: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 175 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
जावली 7, कराड 19 , खंडाळा 14, खटाव 9, कोरेगांव 22 , माण 27, महाबळेश्वर 1, पाटण 3 , फलटण 27, सातारा 36, वाई 9  व इतर 1 असे  आज अखेर एकूण 248921 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 52 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...