सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

ढेबेवाडी : भोसगावात बिबट्याची दहशत 2 शेळ्या ठार व 1 बोकडाला घेऊन बिबट्या पसार

ढेबेवाडी : भोसगावात बिबट्याची दहशत 2 शेळ्या ठार व 1 बोकडाला घेऊन बिबट्या पसार
ढेबेवाडी प्रतिनिधी / दीपक सुर्वे
ढेबेवाडी : दि.4 भोसगाव ता.पाटण घरालगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून 2 शेळया ठार केल्याची व 1 बोकड घेऊन गेल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात भोसगाव येथे शनिवारी 3 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून,छाया वसंत थोरात असे  पशुपालकाचे नाव आहे.ह्या पशुपालक शेतकरी असून, शेतीला जोड व्यवसाय म्हणून काही वर्षांपासून पशुपालनाचा व्यवसाय करीत आहेत. त्याच्याकडे 2 शेळ्या व 1 बोकड असून, दिवसा शेळ्यांना चारा आणून संध्याकाळच्या सुमारास घरालगत असलेल्या गोठ्यात बांधले जाते. पशुपालकाने शेळ्या चारून आणून रात्रीच्या सुमारास घरालगत असलेल्या गोठ्यात बांधून ठेवल्या.मात्र, रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून 2 शेळी ठार केल्या व 1 बोकडाला।बिबट्या घेऊन गेला असल्याचे समजते. सदर दुर्घटनेत  पशुमालकाचे जवळपास 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी गावकऱ्यांनी केली जात आहे. घटनेची माहिती वनविभागाला होताच, येथील वनपरिक्षेत्राधिकारी सुभाष राऊत यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...