तळमावले/वार्ताहर
शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र दुसरे कोणतेही नाही. त्यातील पवित्रता जपण्याचे काम जोतिराम कुंभार सर यांनी केले आहे असे गौरवोद्गार कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सचिव अमरसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले. जोतिराम कुंभार यांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त आयोजित कर्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजीव चव्हाण, सहयागिरी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव एन.आय. डांगे, पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव देसाई, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे डाॅ.संदीप डाकवे, उमरकांचन शाळेच्या मुख्याध्यापिका सावंत मॅडम, ढेबेवाडी शाळेचे मुख्याध्यापक सपकाळ सर, उमरकांचनचे सरपंच आत्माराम सकपाळ, उपसरपंच सुनंदा मोहिते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. जोतिराम कुंभार हे सहयगिरी शिक्षण संस्था ढेबेवाडीच्या न्यू इंग्लिश स्कूल उमरकांचन येथे 18वर्षे व कोयना शिक्षण संस्था पाटणच्या छ.शाहू महाराज शाळा ढेबवेाडी येथे 15 वर्षे सेवा करुन नियम वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले. त्याचबरोबर त्यांचे मराठी हिंदी विषयावर प्रभुत्व होते. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिसरात परिचित होते.
यावेळी श्री.जोतिराम कुंभार, चव्हाण सर, राजेंद्र कुंभार, अमीर डांगेसर,माजी विद्यार्थी व इतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. तसेच सह्यागिरी संस्थेचे सचिव श्री. प्रल्हाद साळुंखे सर यांनी आपल्या भाषणातून दोन संस्था एकाच व्यासपीठावर आणून कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्याचा योग कुंभार सरांनी घडवून आणला याबद्दल गौरवोद्गार काढले. दरम्यान शिल्पकार राजेंद्र कुंभार यांनी स्वतः केलेले सरस्वतीचे शिल्प शाळेला व उपस्थित गुरुजनांना भेट दिले.
कोरोनाचे नियम पाळून पार पडलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, माजी सरपंच मनोज मोहिते, मराठवाडीचे सरपंच काशिनाथ शिंदे, श्री.जानुगडे सर, समाधान जानुगडे, काळे सर, कारंडे सर सरगर सर, लोहार सर कोतुलकर सर, छ.शाहू विद्यालयाचा संपूर्ण सेवक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पंकज कुंभार, राजेंद्र कुंभार, छ.शाहू विद्यालयाचा संपूर्ण सेवक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, कुंभार परिवार यांनी विशेष प्रयत्न केले.
Thanks, कुमजाई पर्व न्यूज
उत्तर द्याहटवा