बनपुरी : कोरोनाची साखळी तोडण्यात यश गावाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
बनपुरी : संपूर्ण राज्यात कोरोनाचा हाहा:कार सुरु आहे. महाराष्ट्र राज्य कोरोनामुळे हादरुन गेले आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा कहर अद्याप सुरु आहे. मात्र यात सकारात्मक बाजू समोर आली आहे ती म्हणजे पाटण तालुक्यातील एक गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. हे गाव कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट गाव होते. मात्र आता या गावाने कोरोनावर यशस्वीपणे मात करत आहे कोरोनाची साखळी तोडण्यात यश आले आहे.पाटण तालुक्यातील येथील बनपुरी असे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या या गावाचे नाव आहे. या गावात काही दिवसांपूर्वी कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला होता.एप्रिल महिन्यात 96 रुग्ण सापडले होते. त्यामुळे हे गाव हॉटस्पॉट गाव ठरले होते. सुरुवातील गावातील लोक भितीमुळे कोरोना चाचणी करण्यासाठी पुढे येत नव्हते मात्र ग्रामपंचायत कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावातील घरोघरी जाऊन लोकांची तपासणी केली. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आले. त्याचप्रमाणे गावात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले. वेळोवेळी गावात औषध व सॅनिटायझर फवारणी करण्यात येत होती. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावातील नागरिक पोलीस प्रशासन स्पीकरवरुन मार्गदर्शन करत होते.
आरोग्य सेवक.एस एम भांडे,आरोग्य सेविका .एस व्ही पाडवी,पोलीस पाटील,गावकरी आणि ग्रामपंचायत कर्मचारी व वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या वेळीच मदतीने आणि उपचारांमुळे बनपुरी आज कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.गावातील वाढत्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली.गेल्या महिन्या भरात एकुण 96 लोक कोरोनाबाधित झाले होते.पैकी 42 लोक चांगल्या प्रकारचे उपचार घेवुन बरे झाले,त्यापैकी 15 लोक जुजबी उपचाराने घरातच बरे झाले,7 लोक मयत झाले.21 लोक आजअखेर पॉजिटिव्ह असुन पैकी 3 लोक कराड मुंबई येथे उपचार घेत असुन गावची परिस्थिती पुर्वपदावर येत आहे.ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये,तिसऱ्या लाटे चा परिणाम आपल्या गावावर येवू नये यासाठी कडक निर्बंध व खबरदारी घेण्याचे निश्चित करण्यात आले.याप्रसंगी मार्गदर्शक सदस्य शिवाजीराव पवार,ग्रामसेवक जाधव पोलिस पाटिल दत्तात्रय कुंभार बनपुरी प्राथमिक.उपकेंद्र च्या डॉ. पूनम शिंदे,आरोग्य सेवक भांडे,शिक्षक जगताप सर,मोकाशी मैडम,महाडिक मॅडम व आशासेविका उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा