शनिवार, १५ मे, २०२१

तळमावले : साईकड्यात बिबटयाचा धुमाकूळ

तळमावले : साईकड्यात बिबटयाचा धुमाकूळ
कुमजाई पर्व वृत्तसेवा -- साईकडे ता. पाटण येथे घरासमोरील पाळीव कुत्र्यावर सलग पाच दिवस बिबट्याने हल्ला करुन चार कुत्र्यांचा फडशा पाडला तर सहाव्या दिवशी विक्रम यादव यांच्या कुत्र्यावर हल्ला करायला आलेल्या बिबट्याला मोठ्या धाडसाने कुटुंबातील व्यक्तींंनी हूसकावल्याने त्यांच्या कुत्र्याचा जिव वाचला  असून बिबट्याच्या सततच्या हल्ल्याने गावात साईकडे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाल्मिक पठारावर सतत लावल्या जाणार्या वनव्यामुळे जंगलातील हिंस्र प्राणी भक्षाच्या शोधात गावात घुसखोरी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची दूभती जणावरे , शेळी आणि पाळीव कुत्री बिबट्याच्या रडारवर आहेत. गेल्या पाच दिवसात साईकडे गावातील संजय शंकर यादव,महादेव सकट, पंकज यादव, दत्ता सकट यांची चार कुत्री बिबट्याने हल्ला करून ठार केली तर येथील विक्रम यादव यांच्या घरासमोरील कुत्र्यावर दिवसा ढवळ्या हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्याला घरातील लोकांनी परतावून लावले. बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामुळे साईकडे गावासह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
   वनविभागामार्फत वनसंपत्ती बचावासाठी वारंवार जनजागृती केली जाते. अनेकदा वनवे लावणार्या विकृतीवर कारवाई देखील केली आहे. परंतु लोकांच्या माणसिकतेत बदल होताना दिसत नाही परिणामी गवे, बिबट्या, आणि इतर हिंस्र प्राणी लोकवस्तीत घुसून हल्ले करू लागले आहेत. यापुढील काळात जर हल्ले रोकायचे असतील तर प्रत्येकाने वनसंपत्ती जपली पाहिजे. जंगलावरील अतिक्रमण थांबवली पाहिजेत. तेव्हाच या घटणांना आळा बसणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
-- साईकडे गावात बिबट्याने सलग हल्ला करून चार कुत्री पळवली आहेत. दिवसाढवळ्या बिबट्या लोकवस्तीत  घुसत असल्याने गावात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात बिबट्याकडून मणूष्यावर हल्ला होणार असल्याने त्याचा वनखात्याने आत्ताच बंदोबस्त करावा .
सचिन यादव (अध्यक्ष- शंभूराज युवा संघटणा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...