शुक्रवार, १४ मे, २०२१

*सातारा : मे व जून महिन्याचे अन्नधान्य वितरण आदेश निघाले ; ई पॉस प्रणाली द्वारे होणार वितरण*

*सातारा : मे व जून महिन्याचे अन्नधान्य वितरण  आदेश निघाले ; ई पॉस प्रणाली द्वारे होणार वितरण*

  सातारा दि. 14  : राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम 2013 तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना माहे मे व जुन 2021 मध्ये वितरीत करण्यात येणारे अन्नधान्य पुढील प्रमाणे.
 माहे मे  2021 मध्ये अंत्योदय अन्न योजना  (प्रती कार्ड 25 कि. गहू व 10 कि. तांदुळ )  व प्राधान्य कुटुंब लाभर्थी (प्रती माणसी 3 कि. गहू व 2 कि. तांदुळ  मोफत वितरीत करण्यात येणार आहे. 
  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्न्धान्याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना प्रतिसदस्य 3 कि. गहू व 2 कि. तांदुळ याप्रमाणे   वितरीत करण्यात येणार आहे. 
 माहे जून 2021 मध्ये अंत्योदय अन्न योजना (प्रती कार्ड 25 कि. गहू व 10 कि. तांदुळ ) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी  (प्रती माणसी 3 कि. गहु व 2 कि. तांदुळ गहू रु. 2/- प्रति किलो व तांदुळ रु. 3/- प्रति किलो या दराने वितरीत करण्यात येणार आहे. प्रधनमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्ष  योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेलया अन्नधान्याव्यतिरिक्त  प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय अन्न योजना कुटुंबातील सदस्यांना प्रतिसदस्य  3 कि. गहू व 2 कि. तांदुळ याप्रमाणे   वितरीत करण्यात येणार आहे. 
 सातारा जिल्ह्यातील 28210 अंत्योदय कार्डधारकांना व 1676616 प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण रास्त भाव दुकानातून ई पॉस प्रणाली द्वारे करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी कळविले आहे. 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...