शुक्रवार, १४ मे, २०२१

काळगाव :चिमुकल्या राजवीरने दिला निराधारांना आधार

काळगाव :चिमुकल्या राजवीरने दिला निराधारांना आधार
          फोटो : अनिल देसाई (कुंभारगाव)

तळमावले/वार्ताहर
सामाजिक चळवळीत नेहमी अग्रेसर असलेल्या पाटण तालुक्यातील मस्करवाडी (काळगांव) येथील सुनील आनंदा मस्कर यांनी आपल्या चिरंजीवाच्या वाढदिवसानिमित्त निराधारांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करुन आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रसंगी सौ.विद्याताई कारंडे, डाॅ.संदीप डाकवे, काळगांव ग्रामपंचायतीचे सदस्य महादेव पाटिल, विकास कार्यकारी सोसायटीचे सल्लागार आनंदा मस्कर ज्येष्ठ नागरिक बाळकृष्ण मस्कर, प्रकाश मस्कर, अनिल देसाई, लालासोा मस्कर, सुनिल मस्कर, शिवाजी मस्कर, किसन मस्कर, प्रताप मस्कर, संतोष डाकवे, सागर पाटील, अशोक मस्कर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सौ.जयश्री आणि सुनील यांच्या राजवीर या मुलाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी राजवीरचा वाढदिवस साधेपणाने साजरा करत समाजापुढे एक आदर्श पायंडा पाडला आहे. वाढदिवसाचा इतर खर्च टाळून त्यांनी मस्करवाडी गावातील गरजू व निराधार महिलांना जीवनावश्यक कीट दिले आहे. तसेच उपस्थित सर्वांना मास्कचे वाटप केले आहे.
सुनील मस्कर हे कामानिमित्त मुंबईला असतात. परंतू आपल्या जन्मभूमीतील लोकांसाठी काहीतरी केले पाहीजे ही जाणीव त्यांना नेहमी होत असते. यामुळेच त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. यापूर्वीही त्यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त गावातील ज्येष्ठ नागरिकांना स्वेटर, शाळेतील मुलांना खाऊ तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करुन समाजाशी असणारी बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.जयश्री मस्कर, सुनिल मस्कर, आनंदा मस्कर परिवार व ग्रामस्थ मंडळ मस्करवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

चैकटीत:
माणुसकीच्या नात्याने आपण देखील समाजाचे देणे लागतो मी देखील सामान्य कुटूंबातील तरुण आहे  कोरोना सारख्या महामारीत एकमेकांना मदत करणे खूप गरजेचे आहे गरजूंना संसारोपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करून राजवीर चा वाढदिवस साजरा केला यांचेच समाधान मला वाटत आहे अषी बोलकी प्रतिक्रीया राजवीरचे वडील सुनील मस्कर यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...