गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

तळमावले : न्यायासाठी गुढ्यातील कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

तळमावले : न्यायासाठी गुढ्यातील कुटुंबाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

तळमावले : गुढे, ता. पाटण येथील श्री व सौ.सीमा सुरेश कदम यांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून त्यांचा मुक्काम आंदोलनस्थळी झाला होता. तरीही प्रशासनाने विचारपुस'सुद्धा केली नसल्याने त्यांची हेळसांड मात्र झाली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, लाच खाऊ मंडलाधिकारी प्रविण शिंदे (ढेबेवाडी-कुठरे) व २०१८'चे भ्रष्ट व लाच खाऊ तहसीलदार रामहारी भोसले यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून नार्को चाचणी शासनाने करावी अशी मागणी करण्यात आली आहे.मंडलाधिकारी प्रवीण शिंदे यांनी जेसीबी क्र. एम.एक्सह.०९.क्यू ८६५१ या वाहनावर बेकायदेशीर कारवाई करून रु.२० हजार प्रकरण मिटविण्याच्या नावावर लाच घेतलेली असून अजूनही रु.५० हजाराची मागणी केलेली होती. तत्कालीन तहसीलदार रामहरी भोसले यांना सांगून जेसीबी वाहनावर रु.७ लाख ५० हजार एवढा दंड केल्याने रामहरी भोसले यांना विचारणा केली असता त्यांच्या प्रवीण शिंदे यांच्याकडे चेंडू टोलावला.शिंदे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की,भोसले यांना रु.१ लाख ५० हजार एवढी रक्कम दिली तर प्रकरण संपेल.सध्या जेसीबी ढेबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आहे. ३ वर्षांपासून महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी संपर्क साधला असता ते म्हणतात,"दंड भरा व वाहन घेऊन जा". यावर कदम कुटुंब म्हणत आहे की आम्ही गुन्हाच केला नाही. मग दंड भरायचा प्रश्नच नाही. जेसीबी नसल्याने रोजगार ठप्प झाला आहे. बँकेचे हफ्ते थकलेले आहेत. कुटूंबावर उपासमार आलेली आहे. तेव्हा उच्चस्तरीय चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी कदम परिवाराने केली आहे. आंदोलनस्थळी श्री व सौ. सीमा सुरेश कदम यांच्यासह श्री व सौ.शोभा सतीश सोमदे तसेच सागर कदम उपस्थित होते.

निवेदनाच्या प्रति संबंधितासह वरिष्ठ पातळीवर ते राष्ट्रपतीपर्यंत पाठविलेल्या आहेत मात्र अद्याप न्याय मिळत नसल्याची खंत कदम कुटुंबीय व्यक्त आहे. आमरण उपोषणातून न्याय मिळत नसेल तर वेळप्रसंगी आत्मदहनही करणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...