सातारा : जिल्ह्यातील ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-१९ लसीकरणाची मोहिम मोफत ग्रामीण रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामार्फत सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांची नोंदणी व लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत जिल्ह्यात एकूण २ लाख ५६ हजार ४३४ एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहिम थांबवावी लागत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे.
१ एप्रिल पासून जिल्ह्यामध्ये ४५ वर्षावरील सरसकट व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले असून जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्यावतीने प्रभावी नियोजन करुन नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केल्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
लसीची मागणी शासनस्तरावर नोंदविण्यात आली आहे. लस उपलब्ध होताच पुन्हा वेगाने लसीकरणाची मोहिम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामार्फत पुढे सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.
लसीच्या संदर्भात काही गैरसमज नागरिकांमध्ये होते ते आत्ता दूर झाले आहेत त्यामुळेच प्रत्येक गावात 100 टक्के लसीकरण होत आहे चांगला प्रतिसाद मिळत आहे - डॉ. उमेश गौजारी ( वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले )
नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे आले पाहिजे लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत लस घेतल्याने कोरोना बरोबरच्या लढाईत आपण नक्की विजयी होऊ - डॉ.मंगेश खबाले (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा