बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

कुंभारगाव ; ऊसाचा कोयता हातात धरलेल्यांनी केले दिनदर्शिकेचे प्रकाशन

कुंभारगाव ; ऊसाचा कोयता हातात धरलेल्यांनी केले दिनदर्शिकेचे प्रकाशन
तळमावले/वार्ताहर
कुंभारगाव ; दि.29 सकाळच्या बोचरी थंडीपासून हातातील कोयता आणि ऊस यात चाललेली लढाई, त्यातून सपासप येणारे आवाज, काम लवकर पूर्ण करण्याचा इरादा, उन्हाने कोमेजलेले चेहरे, न्याहारीच्या वेळी थोडीशी घेतलेली विश्रांती. अशा क्षणी त्यांना नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करायला सांगितल्यावर त्यांच्या चेहÚयावर फुललेले अभिमानाचे हसू आणि डोळयातून आलेले आनंदाश्रू..! हे घडले स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशनावेळी...
त्याचे असे झाले पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने यंदा नवीन माहितीपूर्ण दिनदर्शिका तयार करण्यात आली होती. या दिनदर्शिकचे प्रकाशन ‘हटके’ करण्याचा निश्चय स्पंदन परिवाराने केला. आणि या संकल्पनेतून कुंभारगांव -कळंत्रेवाडी येथील मळीच्या शिवारात ऊसाच्या फडात दिनदर्शिकेचे अनोखे प्रकाशन केले. या अभूतपूर्व प्रसंगामुळे कष्टकरी ऊसमजूर भारावून गेले. सकाळपासून केलेल्या कष्टाचा त्यांना क्षणात विसर पडला आणि त्यांच्या डोळयातून आनंदाश्रू आले.
ऊसतोड करताना जीवतोड मेहनत करणारे, उन्हाने रापलेले चेहरे, कष्टाने घटलेले हात नेहमी दुर्लक्षित राहतात. त्यांना मानसन्मान देण्यासाठी, त्यांच्या कष्टाला सलाम करण्यासाठी हा आगळावेगळा प्रकाशन सोहळा केला असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले.
या अनोख्या प्रकाशनप्रसंगी जितेंद्र लोंढे, नवनाथ लोंढे, संजू लोंढे, लताबाई लोंढे, विजय लोंढे, विजय साळुंखे, ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, दैनिक लोकमतचे पत्रकार पोपट माने, सा.कुमजाई पर्व चे संपादक प्रदीप माने व अन्य मान्यवर उपस्थित होते. ऊसाच्या फडातील प्रकाशनामुळे फडातील वातावरण काही काळ चैतन्याने भारावून गेले.
विशेष म्हणजे या दिनदर्शिकेला मिळालेल्या जाहिरातीतून काही रक्कम सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू रुग्णाला देण्यात येणार आहे. नवीन वर्षानिमित्त सर्वजण दिनदर्शिका करतात. परंतू दिनदर्शिकेतून गरजूंना मदत हे वेगळेपण नेहमीप्रमाणे स्पंदन ट्रस्ट ने जपले आहे.


सायेब आमचा पण फुटू पेपरात छापा:
‘‘सायेब, वाइच आधी आला असता तर आमी काम करतानाचा फुटू तरी काढला असतासा, आणि त्यो पेपरात छापला असता.’’ अशी एक बोलकी प्रतिक्रिया महिला मजूराने व्यक्त केली होती. आपल्या हस्ते नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन करुन तो फोटो पेपरात छापून येणार आहे, असे त्यांना कळल्यावर त्यांचे चेहरे आनंदाने हरखून गेले.

ग्रामपंचायत निवडणुक ; नामनिर्देशनपत्र दाखल होणार पारंपारिक पद्धतीने, (offline mode) राज्य निवडणूक आयोगाचे परिपत्रक

ग्रामपंचायत निवडणुक ; नामनिर्देशनपत्र दाखल होणार पारंपारिक पद्धतीने, (offline mode) राज्य निवडणूक आयोगाचे परिपत्रक

सातारा दि.30 : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करताना 28 डिसेंबरपासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इत्यादी तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी विचारात घेऊन इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्रपासून वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पारंपारिक पद्धतीने (offline mode) स्वीकारण्याचे तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ देखील 30 डिसेंबरच्या सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

खुशखबर ; नवीन वर्षात एक लाखापेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार सरकारी नोकरी

खुशखबर ; नवीन वर्षात एक लाखापेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार सरकारी नोकरी
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष 2021 पासून, शासकीय सेवेत सध्या 1 लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी, तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे.विधानसभा अध्यक्ष, श्री. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांना नूतन वर्ष 2021 साठी शुभेच्छा दिल्या असून पत्रात म्हटले आहे की, आपल्या कुशल नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकटकाळाचा यशस्वीपणे मुकाबला करीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.

आपणास विदित आहेच की, महाराष्ट्रातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सुशिक्षित आणि होतकरू तरूण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-1, वर्ग-2 आणि वर्ग-3 विभागातील सेवाभरतीच्या प्रतिक्षेत आहे. या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

कोविड-19 महामारी संदर्भात परिस्थिती आता बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याने नवीन वर्ष 2021 पासून ही भरती प्रक्रिया सुधारित महापोर्टलद्वारे तातडीने सुरु करण्यात यावी, त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वयोमर्यादा अट शिथिल करण्यात यावी. अशी सूचनाही विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांनी मांडल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक ; जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज उद्या ऑनलाईनसोबत ऑफलाईन पद्धतीने स्वीकाण्याचे निर्देश

ग्रामपंचायत निवडणूक ; जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज उद्या ऑनलाईनसोबत ऑफलाईन पद्धतीने  स्वीकाण्याचे निर्देश


मुंबई, दि. 29 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजीही  राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.श्री. मुंडे यांच्या निर्देशानुसार ‘बार्टी’मार्फत याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असल्याने ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत याबाबत राज्यभरातून विनंती करण्यात येत असल्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.

उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोहोच पावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता ३० डिसेंबर रोजीही अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत तसेच ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती दि. ०१ जानेवारीपर्यंत ‘बार्टी’कडे लेखी स्वरूपात कळवावी असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत.

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

उरण ; खाजगीकरणाची पहिला बळी जेएनपीटी !

मुंबई : सुमारे दीड हजार कर्मचारी असलेली जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ही सर्वात जुनी पोर्ट ट्रस्ट आणि देशातील नंबर वन बंदर आता खासगीकरण होण्याच्या प्रक्रियेवर अखेर शिक्कामोर्तब झाले. जेएनपीटी (JNPT) च्या संचालक मंडळ बेठकीत या खासगीकरणाच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. यावेळी आठ विरुद्ध दोन मतांनी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यामुळे येथे असलेल्या या दीड हजार कर्मचा-यांना आता विशेष व्हीआरएस देऊन कायमस्वरूपी घरी बसविण्याची तयारी सुरू आहे.

केंद्रातील मोदी सरकारने सध्या एका पाठोपाठ एक सरकारच्या ताब्यातील जुन्या कंपन्या, संस्था, विमानतळ, रेल्वे आदी खासगीकरण करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.देशातील ठराविक धनाढ्य उद्योगपतींच्या घशात या सर्व कंपन्या, विमानतळ तसेच बंदरे घालण्यात येत असल्याचा सार्वत्रिक आरोप सध्या विरोधी पक्षाकडून तसेच समाजमाध्यमातून सातत्याने करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जेएनपीटी कडे पाहिले जाते.

या खासगीकरण प्रस्तावावर सार्वत्रिक मतदान घेण्याची मागणी कामगार संस्थेचे दिनेश पाटील आणि भूषण पाटील यांनी केली होती. पण संचालक मंडळाने बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केल्याने सार्वत्रिक मतदान आवश्यक नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे कामगार वर्गात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे भूषण पाटील यांनी सांगितले.

केंद्र सरकारने जेएनपीटी बरोबर विशाखा पट्टणम , चेन्नई, कोलकाता, न्यू मंगलोर, कोचीन , मोरमुगाव, मुंबई आदी 11 बंदराचे सुद्धा खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे या कामगारांनी सांगितले. वाहतुकीच्या दृष्टीने जेएनपीटी हे सर्वात महत्वाचे आणि मोठे बंदर मानले जाते. पण तेच आता उद्योगपतींना आंदण देण्यात येत असून या विराधात देशभरात तीव्र लढा उभारण्याचा इशारा या कामगार संघटनेने दिला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक ;निवडणुकीतील प्रचाराच्या खर्चाचा हिशोब दाखविण्यासाठी आत्ता सहकारी बँकेच्या खात्याचा समावेश

सातारा दि.28: ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचाराच्या खर्चाचा हिशोब दाखविण्यासाठी बॅंकांमध्ये नवीन खाते उघडणे बंधनकारक आहे.यापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रीयीकृत बॅंक व शेड्युल बॅंकांमध्ये खाते उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, या बॅंकांमध्ये खाते उघडण्याबाबत सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्याने सहकारी बॅंकेतही खाते उघडण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराचा खर्च दाखविण्यासाठी बॅंकांमध्ये खाते उघडून पासबुकची झेरॉक्‍स नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे बंधनकारक असते.त्यामध्ये निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ता. 30 डिसेंबरपर्यंत आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बॅंका व शेड्युल बॅंकांमध्ये नवीन खाते उघडून त्याचे पासबुक मिळेपर्यंत किमान आठवडा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांना मुदतीत अर्ज दाखल करताना अडचणी येण्याची शक्‍यता आहे. तसेच सहकारी बॅंकांमध्ये पूर्वीपासून खाते असल्यास एक ते दोन दिवसांत पासबुक मिळत असून नवीन खाते काढावयाचे असल्यास दोन ते तीन दिवसांत पासबुक मिळते. त्यामुळे उमेदवारांना अर्ज दाखल करणे सोईचे होणार आहे.याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडण्यासाठी सहकारी बॅंकांचाही समावेश करत निवडणूक उमेदवारांना सहकार्य करण्याचे आदेश बॅंकांना दिले आहेत.

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

कुंभारगाव : 100 गुंठ्यांतील ऊसाला लागली आग : लाखोरुपयांचे नुकसान

कुंभारगाव : 100 गुंठ्यांतील ऊसाला लागली आग : लाखोरुपयांचे नुकसान
तळमावले / वार्ताहर
दि.24 : मोरेवाडी,कुंभारगाव, ता.पाटण येथील शेतकरी विशाल विजय मोरे यांच्या मालकीच्या शेतातील उसाच्या फडला अचानक आग लागल्याने सुमारे शंभर गुंठ्यांतील ऊस जळल्याने मोठे नुकसान झाले आहे.आगीचे कारण समजू शकले नाही.ही घटना गुरुवारी दि.24 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली
गावातील युवकांनी वेळीच आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला.
मोरेवाडी येथील उसउत्पादक शेतकरी श्री. विशाल मोरे यांच्या मालकीचे सोनाराची पट्टी नावाच्या शेतात पन्नास गुंठे आणि तेथुन जवळच असलेल्या कुंभारकी नावाच्या शेतातील पन्नास गुंठे असे मिळून शंभर गुंठे शेत आहे.या दोन्ही शेतातील उसाला अचानक आग लागल्याने या दोन्ही शेतातील शंभर गुंठे क्षेत्रातील ऊस जळाला आहे.आणि शेतीत ठिबक सिचनचे साहित्यही जळाल्याने मोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ऊसाच्या फडला आग लागलेली समजताच कुंभारगाव व मोरेवाडी येथील ग्रामस्थ व युवक धावत येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला कारण आजूबाजूला मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र असल्याने ते क्षेत्र आगीपासून वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले.
सुमारे 50 ते 60 युवकानीं ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.


शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

ग्रामपंचायत निवडणूक ; सदस्यांपासून ते सरपंचप होण्यासाठी ही आहे नवी अट

ग्रामपंचायत निवडणूक ; सदस्यांपासून ते सरपंचप होण्यासाठी ही आहे नवी अट

मुबई दि.२५ : निवडणूक आयोगाने नुकतंच राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र सरपंच आरक्षण  सोडतीपासून ते अर्ज भरण्यापर्यंत गोंधळ सुरु असल्याचं दिसतंय.त्यातच नव्या जीआरमुळे गोंधळ आणि वाद वाढण्याची चिन्हं आहेत. कारण सदस्यांपासून ते सरपंचपदापर्यंत किमान सातवी पास ही अट ठेवण्यात आली आहे.

जो उमेदवार 1995 नंतर जन्मलेला असेल, आणि ज्याला सदस्य किंवा सरपंच म्हणून नियुक्त करायचं असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे. 24 डिसेंबरला हा जीआर जारी करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारने भाजप काळातील थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करत, सदस्यातून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. तसंच यावेळी सरपंच आरक्षण सोडत ही निवडणुकीपूर्वी न होता, ती निवडणुकीनंतर होणार आहे. या सर्व प्रकारावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

अशा परिस्थितीत राज्य निवडणूक आयोगाचा नवा आदेश समोर आला आहे. या निवडणुकीमध्ये सदस्य आणि सरपंच उमेदवाराबाबतचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने सरपंचपदाबाबत नेमकं काय म्हटलंय?

1) निवडणूक आयोगाने 24 डिसेंबरला अध्यादेश जारी केला आहे. यामध्ये निवडणूक अर्ज भरताना अर्जदार 21 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा, उमेदवाराचं नाव मतदार यादीत असावं.

2) उमेदवार जर 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असेल आणि ज्यांना कोणत्याही कायद्याने बाद ठरवलं नसेल, त्यांना सातवी पास असल्याशिवाय सरपंच म्हणून निवडून दिलं जाऊ शकणार नाही.

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

कौटुंबिक हिंसाचार कायद्याबाबत स्वराज्य प्रतिष्ठानत कडून जनजागृती

कौटुंबिक हिंसाचार कायद्याबाबत स्वराज्य प्रतिष्ठानत कडून जनजागृती
सातारा ; रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून "कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा २००६" साठी जनजागृती करण्याचा आम्ही आमच्या परीने छोटा प्रयत्न करत आहोत. या संदर्भात एक  निवेदन देण्यासाठी आणि या विषयी आणखी चर्चा करण्यासाठी आम्ही तत्कालीन मा. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांची भेट घेतली. प्रतिष्ठान याबद्दल नक्की काय करतेय हे सांगताना महिलेवर कोणत्याही पद्धतीचा दबाव, शारीरिक त्रास, मानसिक त्रास होत असल्यास त्यांचे समोपदेशन (Counselling) कुटुंबातील दोन्ही बाजू समजून घेऊन समजूतदारपणे मिटवून मार्गी लावणे, कायद्याच्या काही बाजू समजून देण्यासाठी महिलांना मदत, त्यांच्या रोजगारासाठी मदत अशा सर्व गोष्टी करत आहोत हे जाणून त्यांना आनंद झाला. आणि त्यांनी पटकन मला दि. ९ मार्च २०२० रोजी त्यांच्याच  मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय सातारा आवारात स्थानिक गुन्हे शाखा सातारा अंतर्गत "भरोसा सेवा संकुल" उभारण्यात आले आहे हे सांगितले. थोडक्यात आम्हा दोघांची कामे समान होती आणि ती एकमेकांच्या साहाय्याने आणखी सोप्पी करून लोकांना मदत करायची असेच होते ते.  
    भरोसा सेल बद्दल API मा. माधुरी जाधव मॅडम यांनी माहीती दिली. आणि पुढे कधीही मदतीची गरज भासल्यास त्या वेळ देतातच.  
   तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडित व्यक्तीची तक्रार ऐकणे, तक्रारीच्या अनुषंगाने कुटुंबातील व्यक्तीना बोलावून समुपदेशन करणे, कायदेशीर मार्गदर्शन करणे, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे, आवश्यक असल्यास पीडित व्यक्तीच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणे, महिला व बालकांना मार्गदर्शन करून पुनर्वसन करणे, तक्रारदाऱ्याचे तक्रारींचे निरसन झाल्यावरही त्यांना पुनःश्च संपर्क करणे, मानसोपचार तज्ञ यांची गरज असल्यास मदत घेणे व वैद्यकीय सेवा देणे इ. एक न अनेक कामे " भरोसा सेल'' करत आहे. 
हेल्पलाईन नंबर -
    माहिती सहायता कक्ष - १०९१
    जेष्ठ नागरिक - १०९०
    बालक - १०९८

 आताचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल सर आणि  API मा. माधुरी जाधव मॅडम प्रत्येक गोष्ट समजून सांगत आहेत याचा आनंद आहे. 
    आम्ही वर्दीतला माणूस आणि माणसातला देव पाहत आहोत.

प्रकाश काळे यांचे निधन

प्रकाश काळे यांचे निधन
तळमावले/वार्ताहर
मालदन (ता.पाटण) येथील प्रकाश प्रल्हाद काळे यांचे बुधवार दि. 23 डिसेंबर, 2020 रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी पत्नी, तीन मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी शुक्रवार दि. 25 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 9 वाजता मालदन, ता.पाटण, जि.सातारा येथे घेण्यात येणार आहे. मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

‘‘काळे काका तुम्ही खरे हिरो आहात’’,वरील उद्गार आहेत सुप्रसिध्द अभिनेते जगन्नाथ निवंगुणे यांचे......

‘‘काळे काका तुम्ही खरे हिरो आहात’’,

वरील उद्गार आहेत सुप्रसिध्द अभिनेते जगन्नाथ निवंगुणे यांचे......
तळमावले : दि शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटीच्या सणबूर येथील एका कार्यक्रमासाठी सुप्रसिध्द अभिनेते जगन्नाथ निवंगुणे आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मी काळे काकांची ओळख करुन दिली. त्यावेळी ते काळे काकांना म्हणाले, ‘‘आम्ही तर पडद्यावरील हिरो आहोत, स्क्रिप्ट नुसार काम करतो, परंतू आपण अनेकांचे जीव अॅम्ब्युलन्सच्या माध्यामातून वाचवण्याचे काम करता, त्यामुळे काळे काका तुम्ही खरे हिरो आहात, मला तुमच्या आणि तुमच्या अॅब्युलन्स सोबत फोटो काढायचा आहे. असे म्हणून त्यानी फोटो काढला.’’ काळे काकांच्या कार्याला मिळालेली ही सर्वात मोठी दाद आहे असे मला वाटते.
 
चेहरा नेहमी स्मित हास्य असलेला, हाफ शर्ट, खांद्यावर टर्कीशचा छोटा टाॅवेल, रुबाबदार चालणे, बिनदास्त बोलणे असे व्यक्तिमत्त्व असणारी व्यक्ती म्हणजे प्रकाश प्रल्हाद काळे. सर्वजण त्यांना प्रेमाने ‘काळे काका’, ‘बटू आप्पा’ म्हणायचे. काही काळ त्यांनी वडाप लाईनला काम केले. वडाप लाईनला काम करत असताना एक ‘प्रामाणिक ड्रायव्हर’ म्हणून आजही सर्वजण त्यांचा आवर्जून उल्लेख करतात.
शिवसमर्थ परिवाराचे शिल्पकार अॅड. जनार्दन बोत्रेसाहेब यांनी विविध मान्यवरांच्या हस्ते रविवार 29 डिसेंबर, 2013 रोजी शिवसमर्थ अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण केले. साहेबांच्या मार्गदर्शनानुसार 1 जानेवारी 2014 पासून काळे काकांनी ‘शिवसमर्थ’ च्या अॅम्ब्युलन्सवर काम करण्याची जबाबदारी स्वीकारली व ती अखंडपणे चोख पार पाडली.  विभागातील सर्व डांेगर वाडी वस्त्यांवर अॅम्ब्युलन्स म्हटले की काकांचे नाव पुढे यायचे. रात्री अपरात्री केव्हाही फोन आला तरी ते कंटाळत नसत. उत्साहाने ते हे काम करत असायचे. कित्येक पेशंटचा जीव त्यांनी वाचवला आहे. कित्येक पेशंटना कर्नाटकमधील नागरमुनोळी या ठिकाणी नेणे, त्यांना त्या ठिकाणी योग्य सेवा दिली जात आहे का नाही? याची विचारपूस ते नेहमी करत असत.

कोरोना काळात देखील त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करण्याचा नेहमी प्रयत्न केला. अगदी सणबूरचा पहिला कोरोनाचा पेशंट दवाखान्यात पोहोचवण्यात ते
आघाडीवर होते. काही दिवसांनी त्यांना शासकीय नियमानुसार पाटण येथे काॅरन्टाईन व्हावे लागले होते. त्यानंतर ते पुन्हा अॅम्ब्युलन्स वर रुजू झाले होते. अॅम्ब्युलन्स मध्ये त्यांनी छोटा गगनगिरी महाराजांचा फोटो ठेवला होता. त्याची ते नित्यनेमाने पुजा करत असत. त्या छोटया फोटोला हार, गजरा नियमित आणत असत.
हसरा चेहरा असलेल्या व्यक्तिमत्त्वाची प्राणज्योत काल दुपारी 22 डिसेंबर रोजी आकस्मित मालवली. संपूर्ण मानवजातीला स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिवशीच त्यांना अखेरचा श्वास घ्यावा लागला हे भाग्य म्हणावे की दुर्देव हेच समजेनासे झाले आहे.

अनेक लोकांच्या जीवनात शिवसमर्थ अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून जीवनाचा ‘प्रकाश’ फुलवणारे ‘काळे काकांची’ अकाली ‘एक्झिट’ दुःखदायक अशीच आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने काळे परिवारावर मोठा डांेगर कोसळला आहे. काळे कुटूंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वराने शक्ती देवो हीच प्रार्थना...
काळे काकांना शिवसमर्थ परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली..!


शब्दांकन: डाॅ.संदीप डाकवे, मो. 97640 61633

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, ; - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, ; - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे   

मुंबई, दि. 22 : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला.कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, राज्य टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होतेमुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे. आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

 

स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्कफोर्सने अभ्यास करावा, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

 

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कोमॉरबिड) असलेल्या लोकांचा राज्यभरातील डेटा (माहिती) आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

 

आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनावश्यक रहदारी टाळावी, असे आवाहन करतानाच  आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले प्रवासी देशांतर्गत प्रवास करुन महाराष्ट्रात येतात. विविध राज्यातून येणाऱ्या अशा प्रवाशांकडे लक्ष द्यावे. त्यांच्याबाबतीत जागरूकता ठेवावी. त्यासाठी दिल्लीसह इतर राज्यांशी, प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

 

उन्हाळा-पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकलो. आता हिवाळ्यात सर्दी-पडसे, ताप-खोकला असे साथीचे आजार वाढले आहेत. हे लक्षात घेऊन कोरोना चाचण्यांवर अधिक भर द्यावा. त्यासाठी राज्यात असलेल्या कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावाही घेतला. यात लसीकरण करणारी यंत्रणा, पहिल्या टप्प्यात ज्यांना लस द्यावयाची आहे त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा संकलित करून तो पाठवणे, शीतगृहांची व्यवस्था, प्रशिक्षण आदी गोष्टींचा त्यांनी आढावा घेतला. जिल्हा टास्कफोर्सने लसीकरणासंदर्भात बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले..कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देतानाच नॉन कोविड रुग्णांकडेही लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

मास्क वापरल्याने कोरोना विषाणूचा मग तो जुना असो त्याच्या प्रसाराला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिबंध होतो. त्यामुळे राज्यातील जनतेला मास्क वापरण्यासाठी बंधनकारक करावे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. मास्क लावा, हात धुवा आणि शारीरिक अंतर ठेवा ही त्रिसुत्री अंमलात आणणे कसे गरजेचे आहे याबाबत लोकांमध्ये नव्याने जागृती करावी. त्यांना धोक्याची जाणीव करून द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, नवीन विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सर्व्हिलन्स अधिक वाढवावा. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवतानाच ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विभागीय आयुक्तांनी कोरोना उपाययोजना आणि लसीकरण कार्यक्रम तयारीची माहिती यावेळी दिली.

वन मजूर व वन रक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठीच्या प्रक्रियेस गती दयावी -राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

वन मजूर व वन रक्षकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठीच्या प्रक्रियेस गती दयावी -राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 22 : वन मजूर व वन रक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कल्याणकारी मंडळ तयार करावे. न्यायप्रविष्ट खटले मागे घेतलेल्या पात्र वन मजूर, वन रक्षक यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात यावे. जे वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतील त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ द्यावेत, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

 

मंत्रालयात महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात बैठक झाली. बैठकीस आमदार हिरामण खोसकर, वनविकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक श्रीनिवास राव, वने विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे आणि राज्यस्तरीय वनकामगार, वनमजूर, वनरक्षक, वनपाल कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, जे वन मजूर १९९४ पासून काम करीत आहेत, अशा मजुरांना नियमाप्रमाणे कायम सेवेत रूजू करून घेण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. ज्या वनमजुरांची वयोमानानुसार सेवा संपुष्टात येत आहे त्यांनाही नियमाप्रमाणे सेवानिवृत्तीसाठी असलेले लाभ द्यावेत. वनमजुरांसाठी कल्याणकारी मंडळ तयार करण्यात यावे जेणेकरून त्यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध होतील. या वनमजुरांवर अन्याय होऊ नये त्यांना सहकार्य कसे करता येईल यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात यावे. ज्या वनअधिकाऱ्यांवर गैरकारभाराचे आरोप झाले आहेत. त्यांची चौकशी करण्यासंदर्भात समिती गठित करून चौकशी करण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्री. भरणे यांनी यावेळी दिले.

 

पात्र असलेल्या वनमजुरांनी शर्तीनुसार न्यायालयातील प्रकरणे मागे घ्यावीत जेणेकरून त्यांना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल असेही वनमजूर संघटनेच्या प्रतिनिधींना राज्यमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले.

सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

*सातारा ; जिल्ह्यातील 70 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; जिल्ह्यातील 70 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यु*

  सातारा दि.21: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील, सातारा 5,शुक्रवार पेठ 4, शाहुपुरी 1, गंरुवार पेठ 2, सदरबाजार 1, गेंडामाळ 1,गुलमोहर कॉलनी 1, केसरकर पेठ 1, विकासनगर 1,तामजाईनगर 1,धनगरवाडी 1, शनिवार पेठ 1,  मल्हारपेठ 1, व्यंकटपूरा पेठ 1,
*कराड तालुक्यातील*शनिवार पेठ 1,  
*पाटण तालुक्यातील* 00
*फलटण तालुक्यातील* फलटण 5, दत्तनगर 1, पद्मवतीनगर 1, शुक्रवार पेठ 2,शेंडे वस्ती 1, निरगुडी 1, 
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, पुसेसावळी  3, निमसोड 1, कटाळगेवाडी 1,सिद्धेश्वर कुरोली 2, मायणी 4,

*माण  तालुक्यातील* गोंदवले 1, मलवडी 1,
 *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2,रहिमतपूर 1, 
*वाई तालुक्यातील* वाई 2,जांब 1,सह्याद्रीनगर 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 8,
*महाबळेश्वर तालुक्यातील*
 इतर:5, वेलेवाडी गावठाण 1,पिंगळी 1,
बाहेरील जिल्ह्यातील: सोलापूर 1,
*2 बाधितांचा मृत्यु*
, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पाचवड ता. वाई येथील 62 वर्षीय महिला, म्हसवड ता.माण येथील 65 अशा एकूण 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -275850*
*एकूण बाधित -54158*  
*घरी सोडण्यात आलेले -51005*  
*मृत्यू -1793* 
*उपचारार्थ रुग्ण-1360*

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांना 54 चित्रांची भेट

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांना 54 चित्रांची भेट

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई (गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल 54 विविध भावमुद्रा रेखाटल्या होत्या. या चित्रांची फ्रेम ना. देसाई यांना तळमावले येथील एका कार्यक्रमादरम्यान नुकतीच भेट दिली. डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेली 54 चित्रे स्कॅन करुन त्याची प्रिंट काढून सदर फ्रेम तयार करण्यात आली होती. विशेष म्हणजे या फ्रेमची साईज 54 बाय 54 इंच अशी होती. मूळ रेखाटलेले प्रत्येक चित्र 21 सेमी बाय 28 सेमी या आकाराचे आहे. या अनोख्या भेटीने ना.देसाई भारावून गेले.
‘‘सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हाॅटसअपवर आपण रेखाटलेली ही चित्रे मी बारकाईने पाहीली असून ती छान आहेत’’ असे म्हणत ना.देसाई यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक केले. ‘‘सदर चित्रे काढताना किती वेळ लागला?’’ याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली. सदर फ्रेम ना.देसाई यांना देताना त्यांच्यासमवेत चंद्रकांत चव्हाण, संजय लोहार, तुषार देशमुख, जीवन काटेकर, चि.स्पंदन डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणार असल्याचा मानस डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केला आहे. याची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’ कडे होण्यासाठी डाॅ.डाकवे यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.
केवळ चित्र न रेखाटता डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून आतापर्यंत नाम फाऊंडेशनला रु.35,000/-, केरळ पुरग्रस्तांना रु.21,000/- , आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज ला रु.5,000/-, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5,000/-, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला रु.4,000/-, मुख्यमंत्री सहाय्यता निधी पुरग्रस्तांना रु.3,000/-, भारत के वीर या खात्यात रु.1,000/- चा निधी देवून कलेतून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यापूर्वी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांना वाढदिवसानिमित्त ठिपक्यातून चित्र, अक्षरगणेशा, पोटेªट,  रांगोळीतून व्यक्तिचित्र साकारत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी ‘हटके’ शुभेच्छा देण्याचा प्रयत्न डाॅ.डाकवे यांचेकडून होत असतो.
डाॅ.संदीप डाकवे यांनी चित्रांची फ्रेम दिल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांच्या मध्ये त्या चित्रांची चर्चा बराच काळ रंगली होती.

सरपंचपदाची सोडत निवडणूकीनंतर ;पॅनलचा खर्च कुणी करायचा ?

सरपंचपदाची सोडत निवडणूकीनंतर ;पॅनलचा खर्च कुणी करायचा ? 
पाटण दि.21; पाटण तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यामुळं गावाचं सरपंचपदावर विराजमान होण्याची इच्छा मनी असलेल्या अनेकांनी आपापल्या गावात मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र या आनंदावर राज्य सरकारच्या एका आदेशाने पाणी फिरवलंय.कारण सरपंचपदाचे आरक्षण हे ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे गावातील पॅनलचा खर्च कुणी करायचा असा प्रश्न गावपुढाऱ्यांसमोर आहे.गावागावात सरपंचपदावर डोळा ठेवून पॅनल प्रमुखांकडून किंवा सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना, निवडणूक रिंगणात उतरवले जातात.स्वतःबरोबर या उमेदवाराचा खर्च संबंधित पॅनल प्रमुख उचलत असतात. यंदा मात्र सरपंच कोण होणार हे गुलदस्त्यात आहे. सरपंचपदाची आरक्षणाची सोडत ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर होणार आहे. त्यामुळे नको ती आफत म्हणण्याची वेळ पॅनलप्रमुख आणि सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या लोकांसमोर आली आहे. कारण खर्च केला आणि आरक्षणात भलतंच आलं तर अशी भीती या पुढाऱ्यांसमोर आहे.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमाने गावागावातला नूर पालटला आहे. यापूर्वी प्रत्येक वेळेस निवडणुकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सगळी यंत्रणा राबविली जाते. उमेदवारांच्या उमेदवारी खर्चापासून ते प्रचारयंत्रणेपर्यंतचा खर्च उचलला जातो. मात्र यंदा सरपंचपद कोणाकडे जाणार हे निवडणुकीनंतर कळणार आहे. त्यामुळे खर्च कुणी आणि कोणासाठी करायचा हा मुद्दा उपस्थित झाला आहे. एकीकडे खर्च कुणी करायचा हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे, गावागावात निवडणुकाच्या दरम्यान लोकशाहीच्या उत्सावाप्रमाणे जो माहोल असतो तो सध्या तरी पाहायला मिळत नाही. गावकारभार पाहणारी सुज्ञ राजकारणी यातून आता कसे मार्ग काढतात आणि सरपंच पदी विराजमान होतात हे पाहावे लागेल.

रविवार, २० डिसेंबर, २०२०

*सातारा ; जिल्ह्यातील 82 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; जिल्ह्यातील 82 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु*

  सातारा दि.20 : जिल्ह्यात काल  शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 82 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील, सातारा 3,आरफळ 3,प्रतापगंज पेठ 1, क्षेत्र माहुली 1, खेड 3,करंजे पेठ 1,भोसलेवाडी 1, वेणेगाव 1,  देगांव 1, कडेपूर 1,कृष्णानगर 1,शाहुनगर 1,महागाव 4 सदरबाजार 1, नागठोण 2,नेले 1, लिंब 1,

*कराड तालुक्यातील* कराड 1,वडगाव हवेली  1,मसूर 1, उब्रंज 1,

*पाटण तालुक्यातील* 00

*फलटण तालुक्यातील* शुक्रवार पेठ 4,लोणंद 1,मिरेवाडी फलटण 2,फरतडवाडी 1, 

*खटाव तालुक्यातील* खटाव 3,डिस्कळ 1, खातगुण 3, करोली 1, कलेढोण 1,करंडेवाडी  1,वडूज 2,

*माण  तालुक्यातील* माण 3,धामणी 1, म्हसवड 3, दहिवडी 3,

 *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, वाठार 1,
*वाई तालुक्यातील* सोनगिरवाडी 2,सह्याद्रीनगर 1,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1, बोरी 2,  येवलेवाडी 3,

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, 
इतर: फरतडवाडी 3,सुतारवाडी 1,वीरकरवाडी 1,वाकी 1, कडेगाव 2,
बाहेरील जिल्ह्यातील: पुणे 1, 

*1 बाधितांचा मृत्यु*

, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये मर्ढे ता. सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण 1 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -275088*
*एकूण बाधित -54088*  
*घरी सोडण्यात आलेले -50965*  
*मृत्यू -1791* 
*उपचारार्थ रुग्ण-1332* 

पाटण ; तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे ची उडी

पाटण ; तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसे ची उडी 

पाटण दि.१९ ; पाटण तालुक्‍यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार उभे करून निवडणूक लढवणार असल्याची माहिती पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीस सातारा जिल्हाध्यक्ष ऍड. विकास पवार, उपाध्यक्ष अंकुश कापसे, संजय सत्रे, पाटण शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे, कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे, नेरळे शाखा अध्यक्ष राम माने, मोरणा विभाग अध्यक्ष जितेंद्र कवर, मरळी विभाग अध्यक्ष हणमंतराव पवार, चित्रपट सेना तालुकाध्यक्ष नितीन बाबर, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष राहुल संकपाळ, स्वयंरोजगार सेना तालुकाध्यक्ष संभाजी चव्हाण, सतीश यादव आदी उपस्थित होते.नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबतीत योग्य ती व्यूहरचना करून मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले उमेदवार उभे करून निवडणूक लढवणार आहे.

पाटण तालुक्‍यातील मनसैनिक व मुंबई, पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वेगवेगळ्या पदावर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. गावाकडे दुसऱ्या पक्षाचे काम करणाऱ्या प्रत्येक मनसैनिक व पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात सर्वांनी आपापल्या गावी जाऊन निवडणुकीचे काम पाहण्याचे आहे, असे कळवण्यात आले आहे. त्यामुळे पाटण तालुक्‍याच्या निवडणूक रिंगणात मनसे उतरली असल्याचे श्री. नारकर यांनी या बैठकीत सांगितले.

सातारा : उसाची एफआरपी देण्यास सहा साखर कारखान्यांचा नकार

सातारा : उसाची एफआरपी देण्यास सहा साखर कारखान्यांचा नकार 

सातारा दि.२० - उसाची एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याच्या शेतकरी संघटनांच्या मागणीला प्रतिसाद देताना बहुतांश साखर कारखान्यांनी फक्त एफआरपी देण्याचे मान्य केले आहे; परंतु कृष्णा, जयवंत शुगर, जरंडेश्वर, लोकनेते बाळासाहेब देसाई, शरयू, अजिंक्‍यतारा या साखर कारखान्यांनी एफआरपीही देण्यास नकार दिला आहे.

शेतकऱ्यांबरोबर झालेल्या करारानुसार त्यांना 85 टक्‍के रक्‍कम आधी व त्यानंतर उर्वरित रक्‍कम दोन टप्प्यांमध्ये देण्यात येणार असल्याचे या साखर कारखान्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे साखरसम्राटांनी बळीराजाला पुन्हा एकदा ठेंगा दाखवल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आल्यानंतर १४ दिवसांनी त्यांना बिल अदा करणे साखर कारखानदारांना कायद्याने बंधनकारक आहे; परंतु साखर कारखाने हे पैसे वेळेवर देत नाहीत.त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना व्याजासह बिले अदा केलीच पाहिजे. अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, साखर विभागाचे डोईफोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे व अन्य साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.

एफआरपीबाबत कोणाची तक्रार असेल किंवा दबावाखाली साखर कारखान्यांच्या संमतीपत्रावर सही केली असेल, तर अशा शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनाशी संपर्क साधावा. याबाबत आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निश्‍चित प्रयत्न करु. उसाच्या वजनाबाबत अनेकदा संभ्रम असतो.

याबाबत साखर कारखान्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. त्यावर, शेतकऱ्यांना शंका वाटत असल्यास त्यांनी कोणत्याही काट्यावर उसाचे वजन करून कारखान्यांच्या वजन काट्यावर आणावे. त्यांना कोणत्याही जाचक अटीचा सामना करावा लागणार नाही, असे साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

मुकादम किंवा चिटबॉयशी असलेल्या संगनमताने ऊसतोडणीसाठी पाच ते दहा हजार रुपये मागितले जातात. याबद्दल काय भूमिका घेणार, यावर साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, संबंधित साखर कारखान्याकडे तक्रार आल्यास त्याचे पैसे ऊस तोडणीदारांच्या रकमेतून वजा करून शेतकऱ्यांना देऊ; पण त्यासाठी  ऊसतोडीसाठी पैसे मागितल्याचे पुरावे शेतकऱ्यांनी द्यावेत.

जिल्ह्यात हंगाम सुरू असलेल्या साखर कारखान्यांपैकी जे साखर कारखाने एफआरपीची रक्कम वेळेत देणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध आयुक्तांकडे तक्रारी दाखल करणार असल्याचे शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. साखर कारखान्यांनी २०१७-१८ मध्ये दर जाहीर करूनही शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत.

याबाबतच्या तक्रारी एकत्र करून लवकरच आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले.

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

*सातारा ; जिल्ह्यातील 81 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; जिल्ह्यातील 81 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;  5 बाधितांचा मृत्यु*
  सातारा दि.19 : जिल्ह्यात काल  शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 81 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 4, विकास नगर 2, कंरजे पेठ 1,शनिवार पेठ 1,चिमणपुरा पेठ 1, शाहुपुरी 1,संभाजीनगर 1,शाहुनगर 2, निनाम 1,खेड1,

*कराड तालुक्यातील* कराड 1,

*पाटण तालुक्यातील* कोयना नगर 1,

*फलटण तालुक्यातील* अरडगाव 1,साखरवाडी 1,मलटण 1, 

 *खटाव तालुक्यातील* खटाव 5,कातर खटाव 1 राजाचे कुर्ले 1, वडूज 1, साठेवाडी 2, मायणी 3,पाचवड 1,कलेढोण 6,

*माण  तालुक्यातील* माण 2, म्हसवड 3,धामणी 1,दहिवडी 3, मलवडी 4,

*कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव 5, जळगाव 1,

 *जावली तालुक्यातील*जावली 1, कुडाळ 4,

*वाई तालुक्यातील* ओझर्डे 1

*खंडाळा तालुक्यातील*ख्ंडाळा 6,  शिरवळ 2,

*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 3,

इतर:3, सासवडे कडेगाव 1 वाठार 1,

बाहेरील जिल्ह्यातील 

*5 बाधितांचा मृत्यु*

जिल्हा रुग्णालय सातारा येथील वर्णे ता. सातारा 75 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये तासगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, नेले किडगांव ता. कोरेगाव येथील 68 वर्षीय पुरुष,आसले ता. वाई येथील 67 वर्षीय महिला बावडा ता. इंदापुर जि.पुणे.येथील 63 वर्षीय पुरुष, अशा एकूण 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -273756*
*एकूण बाधित -54006*  
*घरी सोडण्यात आलेले -50792*  
*मृत्यू -1790* 
*उपचारार्थ रुग्ण-1424* 

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

कुंभारगाव ; शेतकऱ्यांच्या हातात आला कोयता मजुरांच्या टंचाईमुळे खुद्दतोडीचा पर्याय

शेतकऱ्यांच्या हातात आला कोयता मजुरांच्या टंचाईमुळे खुद्दतोडीचा पर्याय
कुंभारगाव (ता.पाटण) दि.18 ;पश्चिम महाराष्ट्रात सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे. ऊसही मुबलक आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा ऊस तोड मजुरांच्या टोळ्या आलेल्या नाहीत . परिणामी यंदाचा हंगाम लांबणार गेला आहे. ऊसतोडणी यंत्र आणि खुद्दतोड हे पर्याय अवलंबून ऊसतोड मजुरांच्या टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यंकडून सुरू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हातात कोयता घ्यावा लागला आहे
कुंभारगाव मान्याचीवाडी येथील उसउत्पाद शेतकरी विष्णु माने,राजेंद्र माने,दादासो सुर्वे यांच्या प्रयत्नाने प्रगतशील शेतकरी सचिन सुर्वे यांनी गावातील तरूणांना बरोबर घेऊन टोळी तयार करून ऊस तोडणीला सुरुवात केली आहे त्यामध्ये तुकाराम माने,श्रीरंग माने,रामचंद्र बोरगे,
किरण बोरगे,रोहित बोरगे,ओंकार मोरे, हे सर्वजण मिळून रोज 10 टनाची तोड करून रयत कारखान्याला पाठवला जातो ह्यामुळे उसउत्पादक शेतकरी सुखावला आहे.

मजूर, मुकादमांकडून कोट्यवधींचा गंडा
 गेल्या काही वर्षांत विदर्भ, मराठवाड्यातील ऊसतोड
मजूर व मुकादमांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ऊसतोडीसाठी लाखो रुपयांची
उचल घ्यायची आणि ऐन हंगामात परागंदा व्हायचे, असे प्रकार सुरू
आहेत. काही कारखान्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारीही दिल्या आहेत.
जिल्ह्यात १३ साखर कारखान्यांकडे दरवर्षी प्रत्येकी ४०० ते ५०० टोळ्यांचे करार होतात. सुमारे ५ ते ६ हजार टोळ्या येतात. वाहतूकदार संघटनेकडे १ हजार ६०० ऊस वाहनांची नोंद आहे. प्रत्येक मजूर ७० ते ८० हजारांची उचल घेतो. सातारा जिल्ह्यात प्रत्येक कारखान्याकडे किमान तीनशे ते साडेतीनशे टोळ्या असतात. यावर्षी मात्र दुष्काळी भागातही चांगला पाऊस झाल्याने सुमारे तीस टक्के कमी टोळ्या आल्या आहेत. ऊस तोडणी यंत्रांवर बऱ्याच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे.

--------------------------------------
कोरोनाच्या काळात रोजगार नाही त्यामुळे ह्या तरुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर गावातील तरुणांनी सुद्धा ऊस तोडणीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करावा -राजेंद्र माने ,शेतकरी

कृषी योजनांचा लाभ घेण्यााासाठी या पोर्टलवर करा नोंदणी 31 डिसेंबर शेवटची तारीख

कृषी योजनांचा लाभ घेण्यााासाठी या पोर्टलवर करा नोंदणी 31 डिसेंबर शेवटची तारीख

मुंबई: राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज करण्याचं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. त्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील, असं कृषीमंत्री यांनी सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीकरता महा-डीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना" या सदराखाली सर्व योजनांचा लाभ "एकाच अर्जाद्वारे" दिला जाणार आहे. त्यात अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. त्याचबरोबार त्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबींकरिता या पोर्टलवर अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी अनेक पर्याय

या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडणं अनिवार्य आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर "शेतकरी योजना" हा पर्याय निवडावा. शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र अशा अनेक माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकणार आहेत.

आधार क्रमांक नसेल तर?

"वैयक्तिक लाभार्थी" म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. त्यानंतर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे, अशी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांनी दिनांक 31 डिसेंबर पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

*जिल्ह्यातील 93 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*

*सातारा ; जिल्ह्यातील 93 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु*

  सातारा दि.18 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 93 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 9, शनिवार पेठ 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 1, विलासपूर 1, संभाजीनगर 2,  काशिळ 1, देगाव 2, फडतरवाडी 1, नागठाणे 1, लावंघर 2, 

*कराड तालुक्यातील* कराड 1, कर्वे नाका 2,निमसोड 1, सुपने 1,  येळगाव 1,मसूर 1  
*फलटण तालुक्यातील* गिरवी रोड फलटण 1, लक्ष्मीनगर 1, सस्तेवाडी 1, तरडफ 1,कोळकी 1, मुरुम 1, सासवड 1, गोखळी 1, संकुडे वस्ती 1, निंभोरे 1, मोरवे 1, वडगाव निंबाळकर 1, आसू 1,    

*खटाव तालुक्यातील*  दारुज 1, पुसेसावळी 1, निमसोड 3, पुसेगाव 1, कातरखटाव 2, वडूज 1,    

*माण  तालुक्यातील* बिदाल 1, पळशी 1, म्हसवड 2, महाबळेश्वरवाडी 1, दिवड 10,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3, मुगाव 2, एकंबे 1, कोलवडी 1, 

  *जावली तालुक्यातील* कुडाळ 1,  

*वाई तालुक्यातील* कनुर 1, देगाव 1,  

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 5, खंडाळा 2, पिसाळवाडी 3, लोणंद 2, 

*महाबळेश्वर तालुक्यातील* 
इतर 2, रेनावळे 1, 

*3 बाधितांचा मृत्यु*

 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये जाखनगाव ता. खटाव येथील 73 वर्षीय महिला, सातारा रोड ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, मार्डी ता. माण येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -272613*
*एकूण बाधित -53925*  
*घरी सोडण्यात आलेले -50684*  
*मृत्यू -1785* 
*उपचारार्थ रुग्ण-1456* 

मुंबई ; धारावी, चेंबूर, अणुशक्तीनगर आणि सायन कोळीवाडा विधानसभेतील युवासेनेच्या युवक व युवतींच्या पदांकरिता मुलाखती

मुंबई दि.18 ; धारावी, चेंबूर, अणुशक्तीनगर आणि सायन कोळीवाडा विधानसभेतील युवासेनेच्या युवक व युवतींच्या पदांकरिता मुलाखती

मुंबई दि.18 ; धारावी, चेंबूर, अणुशक्तीनगर आणि सायन कोळीवाडा विधानसभेतील युवासेनेच्या युवक व युवतींच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येणार असून त्याकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचे पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचे सक्रिय सदस्य असणे अवश्यक आहे.

धारावी विधानसभेमध्ये शनिवार 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना शाखा क्र. 187, अभ्युदय बँकेसमोर, धारावी मेन रोड, धारावी येथे मुलाखती होणार आहेत.

चेंबूर विधानसभेमध्येही शनिवारी सायंकाळी 5 वाजता शिवसेना शाखा क्र. 154, चेंबूर पॅम्प भाजी मार्पेट, जनकल्याण बँकेजवळ, चेंबूर येथे मुलाखती होणार आहेत.

रविवार 20 डिसेंबर रोजी अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये सायंकाळी 5 वाजता शिवसेना शाखा क्र. 143, मानखुर्द रेल्वे स्थानकासमोर, यशवंतराव चव्हाण मार्ग, मानखुर्द (प.) येथे मुलाखती होणार आहेत.

सायनकोळीवाडा विधानसभेमध्ये रविवारी सायंकाळी 5 वाजता शिवसेना शाखा क्र. 175, लकडावाला इमारत, मुपुंदराव आंबेडकर मार्ग, कालीमाता मंदिरासमोर, सायन येथे मुलाखती होणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला एक तास आधी उपस्थित रहावे. तसेच येताना अपले छायाचित्र आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखतीच्या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यावर्ती कार्यालायातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

सहकारी संस्थांना लेखा परीक्षण 31 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे सहकार विभागाचे निर्देश

सहकारी संस्थांना लेखा परीक्षण डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे सहकार विभागाचे निर्देश

मुंबई दि.18 राज्यातील सहकारी संस्थांना आता आपल्या वार्षिक कारभाराचा लेखाजोखा म्हणजे लेखा परीक्षण अहवाल 31 डिसेंबरपर्यंत सहकार विभागाला सादर करावा लागणार आहे. सहकार कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर संबंधित संस्थेने तीन माहिन्यांत लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल सप्टेंबरअखेर निबंधकांना सादर करणे अवश्यक आहे. पण कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने संस्थांचा लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यास डिसेंबर अखेर मुदतवाढ दिली होती. ती आता संपत आल्याने ज्या संस्था आपला अहवाल सादर करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सहकार विभागाने दिला आहे.

                                         जाहिरात

राज्यात जवळपास अडीच लाख सहकारी संस्था कार्यरत आहेत.कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लॉकडाऊन असल्याने सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण करायचे कसे असा प्रश्न सहकारी संस्थांसमोर उभा राहिला होता. त्याची दखल घेत सरकारने लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यास डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार आता संबंधित संस्थांनी वेळेत आपला लेखा परीक्षण अहवाल सादर करावा, असे अवाहन जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या हितासाठी सुधारित कायद्याची गरज - सार्वजनिक बांधकाममंत्री :अशोक चव्हाण

महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या हितासाठी सुधारित कायद्याची गरज - सार्वजनिक बांधकाममंत्री :अशोक चव्हाण

मुंबई, दि. 17 : केंद्राचे नवे कृषी कायदे हमीभावाला हरताळ फासणारे व शेतकऱ्यांचे शोषण करणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राज्यात सुधारित कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

श्री. चव्हाण यांनी यासंदर्भात राज्याच्या कृषी कायदे सुधारणा विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आदी राज्यांनी चांगले कायदे केले आहेत. या कायद्यांमुळे तेथील शेतकरी व ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सुद्धा सुधारित कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका स्व‍िकारावी. .

इतर राज्यांच्या नवीन कायद्यांमध्ये खासगी खरेदीदारांना कृषीमालाच्या खरेदीचे करार व व्यवहार किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीने करण्यास प्रतिबंध घालणे, शेतमाल खरेदी-विक्रीबाबतचे करार व व्यवहारांसाठी शेतकऱ्याची संमती अनिवार्य करणे, फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा हक्क प्रदान करणे, शेतकऱ्यांची फसवणूक अथवा छळ केल्यास दीर्घ मुदतीचा कारावास तसेच मोठ्या रक्कमेच्या आर्थिक दंडाची तरतूद करणे, व्यापाऱ्यांना शेतमालाचा अमर्याद साठा करता येणार नाही यासाठी साठवण क्षमतेवर मर्यादा घालणे, कृषीमालाच्या व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफार्मच्या माध्यमातून पारदर्शक लिलाव व ऑनलाईन पेमेंटची सुविधा प्रदान करणे आदी तरतुदींचा समावेश आहे.त्यानुसार महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या हितास्तव सुधारित कायदे करावे, असे श्री. अशोक चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे.

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

सातारा ; ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय का?,

ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय का?

सातारा दि.17; पुढील महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक होऊ घातल्या आहेत. त्यामुळं पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ज्याप्रमाणे एकत्र आले होते त्याप्रमाणे त ग्रामपंचायत निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील याांनी साताऱ्यात समाज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय का?, असा प्रश्न त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्याला जयंत पाटलांनी उत्तर दिलंय.

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष चिन्हावर, एबी फॉर्मवर निवडणूक लढवत नाही.प्रत्येक गावातील वेगवेगळे प्रश्न घेऊन गट उभे राहत असतात, यामुळे ग्रामपंचायती निवडणुकांत पक्षाचे राजकारणाव्यतिरिक्त गावातील स्थानिक राजकारणावर निवडणूक चालत असतात, असंही ते म्हणाले.विशेष म्हणजे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला 'एकीचे बळ' लक्षात आलेले दिसत आहे. कारण भाजपला रोखण्यासाठी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरू करण्यात आली आहे. गावागावात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचंच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याशिवाय शिवसेनेला शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबाबत जयंत पाटलांना विचारले असता ते म्हणाले, विधानसभेची ही निवडणूक एकत्र लढून महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये काही ठिकाणी यश मिळाले. तर काही ठिकाणी अपयश मिळाले. कुणाला काय मिळाले ही परिस्थिती त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवर अवलंबून असते, असे सांगून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असले तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

सरपंचांची सोडत निवडणुकीनंतर! का घेतला असा निर्णय ?

आतापर्यंत महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत जाहीर होत होती. पण सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढल्यामुळेच नवा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच 14 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

सातारा ; जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;  3 बाधितांचा मृत्यु

  सातारा दि.17 : जिल्ह्यात काल  बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 1, शनिवार पेठ 2, संभाजीनगर 1, नवीन विकास नगर 1,  गोडोली 1, शाहुपुरी 3, गडकर आळी 1, पाटखळ 1,अंगापूर 1, महागाव 1, हुमगाव 1, तासगाव 1, 
कराड तालुक्यातील कराड 2, गोवारे 1, आगाशिवनगर 1, विंग 1, 
पाटण तालुक्यातील मल्हार पेठ 1, गुंजळी 1, मोरगिरी 1,   
फलटण तालुक्यातील फलटण 1, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1,  शिंणगारे वस्ती 1, कोळकी 2, चौधरवाडी 1, बरड 1, तडवळे 1, सांगवी 1, चांभारवाडी 1, पाडेगाव 1, वाखरी 2,  
खटाव तालुक्यातील पुसेगाव 1, कातर खटाव 1, वडूज 1, निमसोड 2, खातगुण 1, येनकुळ 1, कलेढोण 3,  
माण  तालुक्यातील म्हसवड 1, दिवड 4, काळचौंडी 1, पळशी 2, कासारवाडी 2, राऊतवाडी 1, जांभुळणी 1, मलवडी 1, गोंदवले खु 2, किरकसाल 1,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, रहिमतपूर 1, पिंपरी 1, जळगाव 1, वाठार किरोली 4, जळगाव 1, 
 जावली तालुक्यातील तापोळा 1, कुडाळ 1, बामणोली 3, म्हसवे 1,  
वाई तालुक्यातील ओझर्डे 1, पाचवड 1, रेनावळे 1,  
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1, 
महाबळेश्वर तालुक्यातील 
इतर 1, शिवाजीनगर 1, पापर्डे खु 2, 
बाहेरील जिल्ह्यातील 
3 बाधितांचा मृत्यु
 जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये नेले किडगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, खडकी ता. वाई येथील 77 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
एकूण नमुने -271263
एकूण बाधित -53832  
घरी सोडण्यात आलेले -50611  
मृत्यू -1782 
उपचारार्थ रुग्ण-1439 

बुधवार, १६ डिसेंबर, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 100 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 100  संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु

  सातारा दि.16 : जिल्ह्यात काल  मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  100 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 2, शुक्रवार पेठ 1, तामजाईनगर 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, जगतापवाडी 1,  अतित 2, अंगापूर 1, कोंडवे 1, नेले 1, फडतरवाडी 1, शिवथर 2, नरवडे 1, लावंगर 1,  
कराड तालुक्यातील कराड 2, मंगळवार पेठ 2, उंब्रज 1, रेठरे बु 1, अटके 1, सैदापूर 1, पोटळे 1, नंदलापूर 1, पाडळी 1, मसूर 4,  
पाटण तालुक्यातील सोनाचीवाडी 2, तारळे 1, मल्हार पेठ 1,  
फलटण तालुक्यातील पवारवाडी 1, मलटण 1, उपळवे 1, ताथवडा 2, वाखरे 1, वाठार निंबाळकर 1,  होळ 2,
खटाव तालुक्यातील निमसोड 2, वडूज 1, पुसेगाव 2,   
माण  तालुक्यातील गोंदवले 1, कुकुडवाड 1, किरकसाल 3, राणंद 1, दहिवडी 3, बालवडी 1,   
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, फडतरवाडी 1,  कटापूर 1, भाडळे 1, पळशी 1, 
 जावली तालुक्यातील सायगाव 1, बहीवडी 1, सरताळे 6,  
वाई तालुक्यातील दत्तनगर वाई 1, हातेघर 1, 
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, शिरवळ 3, पाडळी 1, बावडा 5,  
महाबळेश्वर तालुक्यातील माचतुर 2, मेटगुटाड 1, पाचगणी 1, देवळाली 1, 
इतर 4, एकंबे 1, तडवळे 3, सैदापूर 1,
बाहेरील जिल्ह्यातील 
4 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथील करंजे पेठ येथील 65 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कृष्णानगर ता. सातारा येथील 81 वर्षीय पुरुष, खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, बोरखळ ता. सातारा येथील 77 वर्षीय पुरुष  अशा एकूण 4  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -269840
एकूण बाधित -53744  
घरी सोडण्यात आलेले -50506  
मृत्यू -1779 
उपचारार्थ रुग्ण-1459 

वीज बिल : सरासरी वीज बिल देण्याची पद्धत बंद करण्याचे आदेश

वीज बिल : सरासरी वीज बिल देण्याची पद्धत बंद करण्याचे आदेश 

मुंबई दि.15 महाराष्ट्रात सरासरी वीज बिल देण्याची अनेक वर्षांची पद्धत आहे, पण ही पद्धत बंद करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले. हा कोणाचा राजकीय विषय नाही. पण पद्धत बदलली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिलांच्या मुद्दय़ावर सभागृहाचे लक्ष वेधले. वाढीव वीज बिले पाठवली जात आहेत. कोल्हापूरमधील पुरामध्ये घर वाहून गेलेल्या व्यक्तीला विजेचे बिल पाठवल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरासरी वीज बिलाची पद्धत बंद करण्याचे आदेश दिले.

सरासरी वीज बिल पाठवण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा या सरकारने आणली नाही. हा कोणाचा राजकीय विषय नाही, पण ही पद्धत बदलली पाहिजे, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात : आत्ता फक्त 700 रु. मध्ये होणार कोरोना चाचणी

कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात करत आत्ता फक्त 700 रु. मध्ये होणार कोरोना चाचणी


मुंबई, दि. 15 : कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 700 रु. हा दर निश्चित केल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे बोलत होते. श्री. टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून. केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात असून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 4500 रुपयांवरुन आता 700 रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. राज्य शासनाने कोरोना उपाययोजनांसंदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेतले. चाचण्यांचे दर कमी करतानाच खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवल्या. ‘एचआरसीटी’ चाचण्यांचे दर निश्चित केले. प्लाझ्मा बॅगचे दरदेखील निश्चित करण्यात आले. मास्कच्या किमतीवरही नियंत्रण आणले गेले. या सर्व उपाययोजना करतानाच नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सारख्या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणीसोबतच जाणीव जागृतीदेखील करण्यात आली.

राज्यात कोरोना काळात सर्व नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू केली. त्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत रक्त देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी सुरू असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे बूथ करुन लसीकरण करण्यात येणार आहे.

राज्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळाली असून त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

काढणे गावात कोरोना तपासणी शिबीर सर्वाचे अहवाल निगेटिव्ह

काढणे गावात कोरोना तपासणी शिबीर सर्वाचे अहवाल निगेटिव्ह 

काढणे दि.15 : पाटण तालुक्यातील काढणे गावात एक दिवसीय कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले अंतर्गत उपकेंद्र  काढणे ता पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये येथील परिसरातील 36 नागरिकांचे स्वॅब घेऊन तपासणी केली असता यामध्ये सर्व म्हणजे 36 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

यावेळी प्रमुख उपस्थिती  वैद्यकीय अधिकारी तळमावले डॉ.उमेश गौजारी सर वैद्यकीय अधिकारी तळमावले  डॉ.मंगेश खबाले आरोग्य  सहाय्यक पावरा तसेच आरोग्य  सहाय्यिका कांबळे सिस्टर तसेच  आरोग्य सेवक  रोहित भोकरे आरोग्य  सेविका  सोनाली परिट सिस्टर तसेच Cho धैर्यशील सपकाळ, Cho प्रवीण माने तसेच आरोग्य  सेवक  स्वप्निल  कांबळे,मयूर पाटील  आशा स्वयंसेविका वैशाली पाटील, योगिता तुपे, जे.आर. खैरमोडे सिस्टर.उपस्थित होते   
तसेच कृष्ठरोग  व क्षयरोग संयुक्त  रूग्ण  शोध मोहिम अंतर्गत  नागरिकांची तपासणी  करण्यात  आली

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 67 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 67 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु
  सातारा दि.15 : जिल्ह्यात काल  सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील  सातारा 5, गुरुवार पेठ 1, सदरबझार 3, प्रतापसिंहनगर 1, सैदापूर 1, भोसे 1, मार्डे 1, लिंब 1, नेले 2, मरडे 1, शिवथर 1,

कराड तालुक्यातील रविवार पेठ 1, बुधवार पेठ 1, कोयना वसाहत 1, कपील 1, येळगाव 1, मलकापूर 1, आटके 1,  
 
फलटण तालुक्यातील फलटण 2, फडतरवाडी 1, साखरवाडी 1,निंभोरे 1, धुळदेव 1, वाखरी 1, सासवड 2, अलगुडेवाडी 4,     
खटाव तालुक्यातील वडूज 3, खटाव 1, 
माण  तालुक्यातील धामणी 1, पर्यंतीर 1, गोंदवले 1, म्हसवड 4, दहिवडी 2,  
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, भाडळे 4, आर्वी 1, वाठार किरोली 1, 
 जावली तालुक्यातील सोनगाव 1, 
वाई तालुक्यातील वाई 1, बावधन 1, 
खंडाळा तालुक्यातील 
महाबळेश्वर तालुक्यातील 
इतर 1,  तांबवे 1, देवली मुरा 1, सरताळे 1, 
बाहेरील जिल्ह्यातील 

4 बाधितांचा मृत्यु

 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथील साखरवाडी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये गोटे ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष 4  अशा एकूण  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -268544
एकूण बाधित -53644  
घरी सोडण्यात आलेले -50305  
मृत्यू -1775 
उपचारार्थ रुग्ण-1564

राज्यातील १५ हजार प्राध्यापक आठ महिन्यापासून विना वेतन सीएचबी प्राध्यापकांची तातडीने भरती कराभाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील १५ हजार प्राध्यापक आठ महिन्यापासून विना वेतन 

सीएचबी प्राध्यापकांची तातडीने भरती करा

भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांची  मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सातारा दि.15 मागील मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद असून शैक्षणिक वर्षातील तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा करार संपुष्टात आला आहे. यामुळे तुटपुंजे मिळणारे मानधनसुद्धा बंद असून राज्यातील जवळपास १५ ते २० हजार प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ आली असून तातडीने प्राध्यापकांची भरती करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी आज शासनाकडे केली आहे
याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. 
 राज्यात तासिका पद्धतीने काम करणारे प्राध्यापक नेट, सेट, एमफिल, पीएचडी पात्रताधारक असून यातील अनेकजण रोजगार  नसल्याने  पडेल ते काम करीत आहेत. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना इतर राज्यात २५ ते ३० हजार रुपये मानधन मिळते परंतु महाराष्ट्रात मात्र तासिकेनुसार मानधन मिळते जे अत्यंत तुटपुंजे आहे. एप्रिल व मे महिन्यात सदर मानधन मिळत नाही. मागील सरकारमध्ये प्राध्यापक भरतीचा निर्णय झाला होता त्याबाबतची पुढील कार्यवाही करणे सरकारने अपेक्षित असतांना भरतीही होत नाही व मानधन वाढही होत नाही त्यातच तासिका तत्वावरचा करार संपुष्टात आल्याने आता या प्राध्यापकांनी जगावे कसे असा प्रश्नही अनिल बोरनारे यांनी शासनाला विचारला आहे
सध्या महाविद्यालये बंद असली तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्यात तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा अतिरिक्त ताण नियमित प्राध्यापकांवर पडत आहे. त्यामुळे तात्काळ प्राध्यापकांची भरती करावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली आहे

ग्रामपंचायत निवडणूक ; जाहीर झालेले सरपंच आरक्षण सुद्धा केले रद्द निवडणुकीनंतर निघणार सोडत

ग्रामपंचायत निवडणूक  ;  जाहीर झालेले सरपंच आरक्षण सुद्धा  केले रद्द निवडणुकीनंतर निघणार सोडत 

मुंबई, 15 डिसेंबर : लॉकडाउनमुळे लांबलेल्या निवडणुका आता पुन्हा घेण्यात येत आहे. विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीनंतर  ग्रामपंचायत निवडणुकीचा  कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, राज्य सरकारने एक महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम होणार आहे.

सरपंचपदाची आरक्षण सोडत ही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पूर्ण केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत 8 जिल्ह्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. पण, आता राज्य सरकारने आरक्षण सोडत निर्णयाबद्दल केल्यामुळे सरपंच निवडीचा निर्णयही रद्द झाला आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाची सोडत ही आधी होत असते. पण यात घोडेबाजार होणार, खोटी जातप्रमाणपत्र दाखवण्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे या गोष्टींना आळा घालण्यासाठी जानेवारी महिन्यात सोडत काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत निवडणूक ; जात वैधता प्रमानपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक


ग्रामपंचायत निवडणूक ; जात वैधता प्रमानपत्रासाठीच्या अर्जाची पोचपावती आवश्यक 
मुंबई, दि. 14 : राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल.

सोमवार, १४ डिसेंबर, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 86 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 86 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
  सातारा दि.14 : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 86 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  3  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील  रविवार पेठ 2, संभाजीनगर 1, शाहुपुरी 1, शुक्रवार पेठ 1, करंजे पेठ 2, मोळाचा ओढा 1, सोनगिरवाडी 1, कृष्णानगर 2, किडगाव 1, देगाव 1, निनाम पाडळी 1, जळगाव 1, कारंडवाडी 6, जांभे 2 
कराड तालुक्यातील  कराड 1, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 3, 
पाटण तालुक्यातील तारळे 2,   
फलटण तालुक्यातील फलटण 1, पवारवाडी 1, जिंती नाका 1, साखरवाडी 2, गुणवरे 1, होळ 2, मलटण 1, मुरुम 2,धुळदेव 1, सांगवी 1, वाठार निंबाळकर 1,    
खटाव तालुक्यातील खटाव 1, पुसेगाव 4, कातरखटाव 2, भुरकरवाडी 1, वडूज 2, विसापूर 1,    
माण  तालुक्यातील मलवडी 1, शेवरी 1, दहिवडी 1, गोंदवले बु 1, म्हसवड 1, दिवड 1, गाटेवाडी 1, ढाकणी 1,  
कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन 1,   
 जावली तालुक्यातील सोनगाव 1, ओझरे 1,  
वाई तालुक्यातील वाई 1, जांभ 1,भुईंज 1, बावधन 1,  
खंडाळा तालुक्यातील भादे 1, लोणंद 1, शिरवळ 1, बावडा 2,    
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, मेटगुटाड 1, पागचणी 1,  
इतर 3, कारंडेवाडी 1, पापर्डे खु 2, 
बाहेरील जिल्ह्यातील ठाणे 1, 
3 बाधितांचा मृत्यु
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात कोरेगाव येथील चिमणगाव ता. कोरेगाव येथील 74 वर्षीय महिला, शिरढोण ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये वारोशी ता. जावली येथील 77 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
एकूण नमुने -267462
एकूण बाधित -53577  
घरी सोडण्यात आलेले -50177  
मृत्यू -1771 
उपचारार्थ रुग्ण-1629 

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 84 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु

सातारा ; जिल्ह्यातील 84 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु
 
 सातारा दि.12 : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 84 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील  सातारा 7,  भवानी पेठ 1, करंजे 2, शाहुनगर 1, कृष्णानगर 1, सदरबझार 1, गोडोली 1, वर्ये 1, अंगापूर 1, खंडोबाचीवाडी 1, कारंडी 1, मांडवे 1, मत्यापूर 1, कोपर्डे 2, वळसे.

कराड तालुक्यातील कराड 3, रविवार पेठ 1, नांदगाव 1,  आगाशिवनगर 1, ओगलेवाडी 1, चिखली 1.

          फलटण तालुक्यातील मलठण 1, बोरावकेवस्ती 1, फरांदवाडी 1, राजाळे 2, कुरवली 1, जिंती 1, दुधेबावी 1, अलगुडेवाडी 1, बिबी 3.

          खटाव तालुक्यातील खटाव 1,  हिंगणे 1, बनपुरी 2, डिस्कळ 2, बुध 2. 

          माण  तालुक्यातील पळशी 1, म्हसवड 2, बिदाल 1. 

           कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, आसरे 1,  काळोशी 1, जळगाव 1, निमसोड 1. 

 पाटण तालुक्यातील तारळे 2, आवंडे 1, 
          जावली तालुक्यातील ओझरे 1, 

कुडाळ 1, भिवडी 1, भोगावली 2. 
वाई तालुक्यातील आसवले 1, सुरुर 2. 
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1. 
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, लोणंद 3, नायगाव 1, बावडा 1, 
बाहेरील जिल्ह्यातील कडेपूर (सांगली) 1, भाळवणी (सोलापूर) 1
इतर 1,
  * 7 बाधितांचा मृत्यु*
               क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात म्हसवड ता. माण येथील 65 वर्षीय महिला, मल्हार पेठ ता. सातारा येथील 92 वर्षीय पुरुष, वळई ता. माण येथील 50 वर्षीय महिला, ईकसाळ  ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खजगी हॉस्पिटलमध्ये खटाव येथील 56 वर्षीय पुरुष, आर्वी ता. कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, महाडा कॉलनी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 एकूण नमुने -265289
एकूण बाधित -53403  
घरी सोडण्यात आलेले -50174  
मृत्यू -1767 
उपचारार्थ रुग्ण-1462 

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०

सातारा ; महाआवास अभियान-ग्रामीण कार्यशाळापात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्टे पूर्ण करु या - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा ; महाआवास अभियान-ग्रामीण कार्यशाळा
पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे  100 टक्के उद्दिष्टे पूर्ण करु या
      - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा दि.11 :  महा आवास अभियान- ग्रामीण हे  28 फेब्रुवारी 2021 अखेर राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेंतर्गत गरजुंना  गुणवत्तापूर्ण व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यासाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे  100 टक्के उद्दिष्टे पूर्ण करण्याचे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.
येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात आज महा आवास अभियान-ग्रामीण जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे आदी उपस्थित होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आवास योजनांची कामे रखडली आहेत, या कामांना महा आवास अभियानांतर्गत गती द्यावी, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, शहर जवळ असलेल्या गावांमध्ये घरकुल योजनेंतर्गत जमिनी खरेदी करण्यास अडचणी येत आहेत. यावर मार्ग काढला पाहिजे. घरकुल योजना राबविण्यास अडचणी येत असतील तर त्या सर्व विभागांनी एकत्र बसून सोडविल्या पाहिजेत. घरकुल योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन करा. यामध्ये सरपंच, पंचायत सभापती, सदस्य यांचा समावेश करावा. मंजुर व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्य व केंद्र पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यासाठी राज्य शासन पाठीशी आहे.  महा आवास अभियान-ग्रामीण जिल्ह्यात यशस्वी राबवा, असेही आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी कार्यशाळेत केले.
ज्यांना घरकुले नाहीत अशांना 2022 पर्यंत घरकुले देण्याचा शासनाचा मानस असून या कामाला प्राधान्य द्यावे. महा आवास अभियान-ग्रामीण मध्ये प्रत्येक गावच्या सरपंचांचा सहभाग घ्यावा. गरीब व गरजुला स्वत:चे घर झाले तर वेगळचे समाधान असते. यात अंमलबजावणी अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग असला पाहिजे. सातारा जिल्हा परिषद विविध योजना राबविण्यात नेहमीच राज्यात आघाडीवर राहिली आहे. महा आवास अभियान सुद्धा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जाईल, असा विश्वास व्यक्त करुन जिल्हा परिषद राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना शासन पाठबळ देईल, असे आश्वास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज झालेल्या कार्यशाळेत दिले.
अन्न, वस्त्र व निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा असून घरकुलांबरोबर रोजगार निर्मितीवर भर द्यावा. तसेच महा आवास अभियान-ग्रामीण राबविण्याबात योग्य नियोजन करावे, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकाय यंत्रणेमार्फत गरीबांना घरकुले देण्यात येत असून शासनाने दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी कार्यशाळेत सांगितले.
या कार्यशाळेत जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, सर्वांसाठी घर खूप महत्वाचे आहे. घरकुलांसाठी जमिनीबाबत‍ तहसीलदारांसोबत गटविकास अधिकारी यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल तसेच घरकुलांना लागणाऱ्या वाळूबाबत नियोजन करण्यात येईल.   शासकीय योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांना गृह कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांनीही पुढाकार घ्यावा.  तसेच महा आवास अभियान ग्रामीण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून जिल्हा प्रथम राहिल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महा आवास अभियानांतर्गत गुणवत्ता व दर्जेदार घरकुले उपलब्ध करुन देण्यात येणार असून हे अभियान लोकचळवळ झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कार्यशाळेत सांगितले.
प्रास्ताविकात ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांनी अभियान कालावधीत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.
या कार्यशाळेत सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी अन्य यंत्रणाचे प्रमुख आदी उपस्थित होते.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...