सातारा ; रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून "कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा २००६" साठी जनजागृती करण्याचा आम्ही आमच्या परीने छोटा प्रयत्न करत आहोत. या संदर्भात एक निवेदन देण्यासाठी आणि या विषयी आणखी चर्चा करण्यासाठी आम्ही तत्कालीन मा. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांची भेट घेतली. प्रतिष्ठान याबद्दल नक्की काय करतेय हे सांगताना महिलेवर कोणत्याही पद्धतीचा दबाव, शारीरिक त्रास, मानसिक त्रास होत असल्यास त्यांचे समोपदेशन (Counselling) कुटुंबातील दोन्ही बाजू समजून घेऊन समजूतदारपणे मिटवून मार्गी लावणे, कायद्याच्या काही बाजू समजून देण्यासाठी महिलांना मदत, त्यांच्या रोजगारासाठी मदत अशा सर्व गोष्टी करत आहोत हे जाणून त्यांना आनंद झाला. आणि त्यांनी पटकन मला दि. ९ मार्च २०२० रोजी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय सातारा आवारात स्थानिक गुन्हे शाखा सातारा अंतर्गत "भरोसा सेवा संकुल" उभारण्यात आले आहे हे सांगितले. थोडक्यात आम्हा दोघांची कामे समान होती आणि ती एकमेकांच्या साहाय्याने आणखी सोप्पी करून लोकांना मदत करायची असेच होते ते.
भरोसा सेल बद्दल API मा. माधुरी जाधव मॅडम यांनी माहीती दिली. आणि पुढे कधीही मदतीची गरज भासल्यास त्या वेळ देतातच.
तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडित व्यक्तीची तक्रार ऐकणे, तक्रारीच्या अनुषंगाने कुटुंबातील व्यक्तीना बोलावून समुपदेशन करणे, कायदेशीर मार्गदर्शन करणे, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे, आवश्यक असल्यास पीडित व्यक्तीच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणे, महिला व बालकांना मार्गदर्शन करून पुनर्वसन करणे, तक्रारदाऱ्याचे तक्रारींचे निरसन झाल्यावरही त्यांना पुनःश्च संपर्क करणे, मानसोपचार तज्ञ यांची गरज असल्यास मदत घेणे व वैद्यकीय सेवा देणे इ. एक न अनेक कामे " भरोसा सेल'' करत आहे.
हेल्पलाईन नंबर -
माहिती सहायता कक्ष - १०९१
जेष्ठ नागरिक - १०९०
बालक - १०९८
आताचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल सर आणि API मा. माधुरी जाधव मॅडम प्रत्येक गोष्ट समजून सांगत आहेत याचा आनंद आहे.
आम्ही वर्दीतला माणूस आणि माणसातला देव पाहत आहोत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा