शेतकऱ्यांच्या हातात आला कोयता मजुरांच्या टंचाईमुळे खुद्दतोडीचा पर्याय
कुंभारगाव (ता.पाटण) दि.18 ;पश्चिम महाराष्ट्रात सध्या गळीत हंगाम जोरात सुरू आहे. ऊसही मुबलक आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा ऊस तोड मजुरांच्या टोळ्या आलेल्या नाहीत . परिणामी यंदाचा हंगाम लांबणार गेला आहे. ऊसतोडणी यंत्र आणि खुद्दतोड हे पर्याय अवलंबून ऊसतोड मजुरांच्या टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यंकडून सुरू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना हातात कोयता घ्यावा लागला आहेकुंभारगाव मान्याचीवाडी येथील उसउत्पाद शेतकरी विष्णु माने,राजेंद्र माने,दादासो सुर्वे यांच्या प्रयत्नाने प्रगतशील शेतकरी सचिन सुर्वे यांनी गावातील तरूणांना बरोबर घेऊन टोळी तयार करून ऊस तोडणीला सुरुवात केली आहे त्यामध्ये तुकाराम माने,श्रीरंग माने,रामचंद्र बोरगे,
किरण बोरगे,रोहित बोरगे,ओंकार मोरे, हे सर्वजण मिळून रोज 10 टनाची तोड करून रयत कारखान्याला पाठवला जातो ह्यामुळे उसउत्पादक शेतकरी सुखावला आहे.
मजूर, मुकादमांकडून कोट्यवधींचा गंडा
गेल्या काही वर्षांत विदर्भ, मराठवाड्यातील ऊसतोड
मजूर व मुकादमांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. ऊसतोडीसाठी लाखो रुपयांची
उचल घ्यायची आणि ऐन हंगामात परागंदा व्हायचे, असे प्रकार सुरू
आहेत. काही कारखान्यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारीही दिल्या आहेत.
जिल्ह्यात १३ साखर कारखान्यांकडे दरवर्षी प्रत्येकी ४०० ते ५०० टोळ्यांचे करार होतात. सुमारे ५ ते ६ हजार टोळ्या येतात. वाहतूकदार संघटनेकडे १ हजार ६०० ऊस वाहनांची नोंद आहे. प्रत्येक मजूर ७० ते ८० हजारांची उचल घेतो. सातारा जिल्ह्यात प्रत्येक कारखान्याकडे किमान तीनशे ते साडेतीनशे टोळ्या असतात. यावर्षी मात्र दुष्काळी भागातही चांगला पाऊस झाल्याने सुमारे तीस टक्के कमी टोळ्या आल्या आहेत. ऊस तोडणी यंत्रांवर बऱ्याच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे.

--------------------------------------
कोरोनाच्या काळात रोजगार नाही त्यामुळे ह्या तरुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर गावातील तरुणांनी सुद्धा ऊस तोडणीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करावा -राजेंद्र माने ,शेतकरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा