काढणे दि.15 : पाटण तालुक्यातील काढणे गावात एक दिवसीय कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले अंतर्गत उपकेंद्र काढणे ता पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये येथील परिसरातील 36 नागरिकांचे स्वॅब घेऊन तपासणी केली असता यामध्ये सर्व म्हणजे 36 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
यावेळी प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी तळमावले डॉ.उमेश गौजारी सर वैद्यकीय अधिकारी तळमावले डॉ.मंगेश खबाले आरोग्य सहाय्यक पावरा तसेच आरोग्य सहाय्यिका कांबळे सिस्टर तसेच आरोग्य सेवक रोहित भोकरे आरोग्य सेविका सोनाली परिट सिस्टर तसेच Cho धैर्यशील सपकाळ, Cho प्रवीण माने तसेच आरोग्य सेवक स्वप्निल कांबळे,मयूर पाटील आशा स्वयंसेविका वैशाली पाटील, योगिता तुपे, जे.आर. खैरमोडे सिस्टर.उपस्थित होते
तसेच कृष्ठरोग व क्षयरोग संयुक्त रूग्ण शोध मोहिम अंतर्गत नागरिकांची तपासणी करण्यात आली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा