रविवार, ३१ मे, २०२०

जिल्ह्यात 31 जणांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्हतांबवे ता. फलटण येथील 94 वर्षीय रुग्णाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 31 जणांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह
तांबवे ता. फलटण येथील 94 वर्षीय  रुग्णाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
सातारा दि. 30  : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उप जिल्हा रुग्णालयामध्ये अनुमानित म्हणून दाखल असलेल्या 31 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  तांबवे  ता. फलटण येथील 94 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. मृत्यू पश्चात स्त्राव तपासणी घेतले होता . तो  आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
 या बाधित रुग्णांमध्ये. 
जावळी तालुक्यातील बेलावडे येथील  2 पुरुष व 2 महिला. निपाणी येथील 1 पुरुष व 1 महिला. काटवली येथील 1 पुरुष. गवडी येथील 1 महिला. रांजणी येथील 1 महिला. 
सातारा तालुक्यातील वावदरे येथील 1 पुरुष. खडगाव येथील 1 महिला. कुसवडे येथील 1 पुरुष. 
खटाव तालुक्यातील बनपूरी येथील 4 पुरुष व 1 महिला. वांझोली येथील 2 पुरुष व 3 महिला. पाचवड येथील 1 पुरुष.
कोरेगांव तालुक्यातील  कटापूर येथील 1 पुरुष. शिरंबे येथील 1 पुरुष. 
कराड तालुक्यातील खराडे येथील 1 पुरुष 2 महिला.
पाटण तालुक्यातील तामिणे येथील  2 पुरुष. 

शनिवार, ३० मे, २०२०

सातारा ; 27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट आला कोविड बाधित; 27 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह मृत्यू पश्चात एका रुग्णासह 216 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

27 वर्षीय युवकाचा रिपोर्ट आला कोविड बाधित; 27 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह 
मृत्यू पश्चात एका रुग्णासह 216 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
       रायगाव आणि खावली कोरोना केअर सेंटर मधून आज 11  जणांना डिस्चार्ज

सातारा दि. 30 : कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे साकुर्डी येथील 27 वर्षीय युवकाचा 
रिपोर्ट कोविड बाधित आला असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
27 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
 जिल्ह्यातील 27 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
मृत्यू पश्चात एका रुग्णासह 216 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 3, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 38, उपजिल्हा  रुग्णालय, फलटण येथील 5 ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 77, ग्रामीण रुगणालय, खंडाहा येथील 60, ग्रामीण रुगणालय, कोरेगाव येथील 9 व रायगाव येथील 24 असे एकूण 216 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामीण रुगणालय, वाई येथे वाई तालुक्यातील आंबेदरे आसरे येथील 43 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर कोविड संशयित म्हणून नमूना तपासणीकरीता पुणे येथे पाठविण्यात आला असल्याचेही  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
रायगाव येथील 3 आणि 8 खावली येथील कोरोना केअर सेंटर मधून एकूण 11  जणांना डिस्चार्ज

आज रायगाव आणि खावली येथील कोरोना केअर सेंटरमधून 11 जणांचे 14 दिवसानंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये ता. खटाव मधील मायणी येथील 1, डिस्कळ येथील 1,ता. कोरेगाव मधील न्हावी बुद्रुक येथील 1, वारणानगर येथील 3, शेंद्रे येथील 1, ता. खंडाळा मधील  कवठे जवळे येथील  1, अजनुज येथील 2,ता. वाई मधील  आसरे येथील 1  रुग्ण.
आज दिवसभरात एकूण 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता जिल्ह्यात कोरोनातून 158 रुग्ण बरे झाले आहेत.

चित्रांना मिळालेला मोबदला थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीत संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम

चित्रांना मिळालेला मोबदला थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीत
संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम

तळमावले/वार्ताहर
संकटातही संधी शोधा असे म्हटले जाते, त्या अनुषंगाने सध्याच्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आपणही काहीतरी योगदान द्यावे या भावनेतून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड होल्डर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी कुंचल्याच्या माध्यमातून मदत केली आहे. लाॅकडाऊनच्या काळात घरबसल्या चित्रे रेखाटत त्यातून मिळालेला रु.4,000/- चा संपूर्ण मोबदला मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड 19 मध्ये जमा केला आहे.
डाॅ.डाकवे हे नेहमी विविध समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात. लाॅकडाऊनच्या काळात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी ‘एक रेखाचित्र कोरोना विरुध्दच्या योद्यांसाठी’ हा अभिनव उपक्रम सुरु केला होता. यामध्ये डाकवे यांचेकडून रेखाचित्र करुन घेवून त्याचे मुल्य स्वीकारण्यात येत होते. या माध्यमातून जमा झालेली रक्कम नुकतीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे.
दरम्यान, कोरोना परिस्थितीच्या कालावधीत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पोलीसांना मास्क वाटप, कृतज्ञता सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहेत. कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांच्या या उपक्रमाचे ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे, ट्रस्टचे पदाधिकारी व परिसरातील लोकांनी कौतुक केले आहे.

कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून दिलेले योगदान:
नाम फाऊंडेशनला रु.35,000/- ची मदत
केरळ पुरग्रस्तांना रु.21,000/- चा निधी
आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5,000/- ची मदत
माजी सैनिक हणमंतराव पाटील रु.5,000/- ची मदत
पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु.3,000/- ची मदत
स्पर्धेचे प्रवेश मुल्य ‘भारत के वीर’ या खात्यात रु.1,000/- जमा

कराड तालुक्यातील 4 बाधित बरे झाल्यामुळे आज डिस्चार्ज

कराड तालुक्यातील 4 बाधित बरे झाल्यामुळे आज डिस्चार्ज

सातारा दि. 30 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या कराड तालुक्यातील विविध गावांमधील 4 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 म्हासोली ता. कराड येथील 32 व 33 वर्षीय पुरुष, नंदगाव येथील 22 वर्षीय युवक, शामगाव येथील 22 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.  
        आत्तापर्यंत जिल्ह्यात 147  जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

विंग येथील कोविड बाधित पुरुषाचा मृत्यू , दोन मृत व्यक्तींसह 43 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर 167 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

विंग येथील कोविड बाधित पुरुषाचा मृत्यू 
दोन मृत व्यक्तींसह 43 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर 167 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह

 सातारा दि. 30: कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथे विंग येथील  कोविड बाधित तसेच किडनीचा आजार असलेला  50 वर्षीय पुरुष रुग्णाचा  रात्री दि. 29 मे रोजी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 कराड  तालुक्यातील पाठरवाडी येथील 33 वर्षीय पुरुष व सातारा शहरातील बुधवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुष यांचा काल दि.29 मे रोजी मृत्यु झाला आहे. या दोघांचा कोविड संशयित म्हणून घशातील स्त्रावांचा नमुने तपासणीकरिता, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
167 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
एन.सी.सी.एस.पुणे यांनी 132 नागरिकांचे अहवाल व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड यांनी  35  नागरिकांचे अहवाल असे एकूण 167  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
43 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 43 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली. 

शुक्रवार, २९ मे, २०२०

जिल्ह्यात 24 कोरोना पॉझिटिव्ह; होळ ता. फलटण येथील वृध्द महिला मृत्यु पश्चात कोरोना बाधित

जिल्ह्यात 24 कोरोना पॉझिटिव्ह; 
होळ ता. फलटण येथील वृध्द महिला मृत्यु पश्चात कोरोना बाधित

सातारा दि. 29   : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 24 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. फलटण तालुक्यातील होळ येथील 85 वर्षीय वृध्द महिला हि ‘सारी’ ने  आजारी होती.  काल दिनांक 28 मे रोजी तिचा मृत्यु  झाला होता. मृत्यू पुर्वी तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते ते तपासणीमध्ये तो रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
या 24 बाधित रुग्णांची  तालुकानिहाय गावे आणि संख्या पुढीलप्रमाणे..
 *फलटण तालुक्यातील* वडले येथील 1, जोरगाव येथील 1, होळ येथील 1 (मृत वृध्द महिला), साखरवाडी येथील 1.
*माण तालुक्यातील* म्हसवड येथील 1, दहीवडी येथील 1, राणंद येथील 1.
*पाटण तालुक्यातील* नवारस्ता येथील 1, जांभेकरवाडी (मरळोशी) येथील 2, आडदेव येथील  1.
*खटाव तालुक्यातील* अंभेरी येथील 5, निमसोड येथील 1, कलेढोण येथील 2.
*सातारा तालुक्यातील* निगुडमळा (ग्रामपंचायत परळी) येथील 1,
*वाई तालुक्यातील* मुंगसेवाडी येथील 2.
*जावळी तालुक्यातील* आंबेघर येथील 2
आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 484 इतकी झाली आहे.

कारी येथील 54 वर्षीय बाधिताचा मृत्यु; आठ जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह86 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 257 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

कारी येथील 54 वर्षीय बाधिताचा मृत्यु; आठ जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
86 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 257 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 

सातारा दि. 29  : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारे चिंचणी ता. खटाव येथील 5 व पळशी ता. खंडाळा येथील 1 तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणाऱ्या  पाटण तालुक्यातील नवसरवाडी  येथील 53 वर्षीय महिला, ताम्हीणे येथील 25 वर्षीय महिला असे एकूण 8 जणांचे रिपोर्ट कोविड बाधित आले आहेत. तसेच कारी ता. सातारा येथील  54 वर्षीय बाधित पुरुषाचा आज मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
86 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
 जिल्ह्यातील 86 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
257 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 

 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 24, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 26, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 93, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 42, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 30 व शिरवळ येथील 42 असे एकूण 257 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असेही  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात 460 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 143 रुग्ण बरे झाले आहेत. तर 300 रुग्णांवर उपचार सुरु असून 17 जणांचा मृत्यु झालेला आहे.

जिल्ह्यात 26 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; केळघर (तेटली) येथील रुग्णाच्या मृत्यु पश्चात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

जिल्ह्यात 26 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; केळघर (तेटली) येथील रुग्णाच्या मृत्यु पश्चात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
सातारा दि. 28 : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 26 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जावळी तालुक्यातील केळघर ( तेटली ) येथील मुंबई वरून आलेल्या चार वर्षे आजारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू 26 मे रोजी झाला होता, मृत्यू पश्चात त्याचे स्त्राव तपासणीसाठी घेतले होते ते आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
या बाधित रुग्णांमध्ये *पाटण तालुक्यातील* सळवे येथील 1, सदूवरपेवाडी येथील 1, करपेवाडी येथील  1,  गलमेवाडी येथील 1,  घनबी येथील 1. 
 *कराड तालुक्यातील* म्हासोली येथील 8, वानरवाडी येथील3, भरेवाडी येथील 1.
*फलटण तालुक्यातील* सस्तेवाडी येथील 1.
*वाई तालुक्यातील* जांभळी येथील 6 
*जावळी तालुक्यातील* आपटी येथील 1 , व केळघर (तेटली )येथील 1 (मृत)
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 452 इतकी झाली आहे.

गुरुवार, २८ मे, २०२०

कराड तालुक्यात 2 व सातारा तालुक्यात 2 नवे रुग्ण;54 वर्षीय मृत व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 214 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

कराड तालुक्यात 2 व सातारा तालुक्यात 2 नवे रुग्ण;
54 वर्षीय मृत व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह तर 214 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 

सातारा दि. 28 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारा कराड तालुक्यातील विंग येथील 50 वर्षीय पुरुष व तामिणी ता. पाटण येथील 7 वर्षीय मुलगी  कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला आहे. तसेच सातारा येथील खासगी प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आलेल्या परळी ता. सातारा येथील 21 व 48 वर्षीय पुरुषांचे रिपोर्टही बाधित आले असून असे आज एकूण 4 बाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
दि. 26 मे रोजी जिल्हा रुग्णालय, सातारा येथे मृत्यु झालेल्या 54 वर्षीय पुरुषाचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे एन.सी.सी.एस. पुणे यांनी कळविले आहे.  
214 जणांच्या घातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 13, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 64, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 16, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 61, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 24, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 6 व शिरवळ येथे कोविड केअर सेंटरमधील 30 असे एकूण 214 जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
आजपासुन क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे Truenat Machine द्वारे  कोविड-19 ची चाचणी करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
आत्तापर्यंत जिल्ह्यात 426 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 134 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 277 रुग्णांवर उपचार सुरु असून 15  जणांचा मृत्यु झालेला आहे.

कराड तालुक्यातील म्हासोली येथील आठ बाधित कोरोनामुक्त;आज सोडले घरी

कराड तालुक्यातील म्हासोली येथील आठ बाधित कोरोनामुक्त;
आज सोडले घरी

सातारा दि. 28 :   कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या कराड तालुक्यातील म्हासोली येथील 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  म्हासोली ता. कराड येथील 16, 17 व 18 वर्षीय युवक, 45, 50 व 62 वर्षीय पुरुष तसेच 35 व 48 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. या आठ रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या आठ  जणांना आज घरी  सोडण्यात आले.  
आत्तापर्यंत जिल्ह्यात 134  जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे

मलकापूर ता. कराड येथील 47 वर्षीय बाधिताचा मृत्यु;230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 27 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

मलकापूर ता. कराड येथील  47 वर्षीय बाधिताचा मृत्यु;
230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 27 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 सातारा दि. 28 : पनवेल येथून प्रवास करुन आलेला मलकापूर ता. कराड येथे स्वत:च्या मालकीच्या घरात राहत असणारा (मुळ गाव बाचोली ता. पाटण) येथील 47 वर्षीय पुरुषाला अस्वस्थ वाटत असल्याने 21 मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती हा कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला होता. या बाधित रुग्णाचा आज पहाटे मृत्यु झाला आहे. या रुग्णाला सुरुवातीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 
 एन.सी.सी.एस. पुणे यांनी 191 तर कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 39 असे एकूण 230 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे कळविले आहे, असेही  शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
27 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27 जणांच्या घशातील स्त्रवांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 422 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 281 रुग्णांवर उपचार सुरु असून 15  जणांचा मृत्यु झालेला आहे.

जिल्ह्यात पुन्हा 28 नागरिकांचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह; दिवसभरात 80 बाधित आणि 5 मृत्यू

जिल्ह्यात पुन्हा 28 नागरिकांचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह;
बेलवडी (ता. जावळी) येथील 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह
सातारा दि. 27  : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 28 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  जावळी तालुक्यातील बेलवडी येथील अर्धांगवायू आणि मधुमेह असलेला 68 वर्षीय पुरुष 19 में रोजी मुंबई वरून आलेला  होता.  घरात विलगीकरणात होता, तिथेच चक्कर येऊन पडला, तिथेच मृत्यू झाला. त्याचा स्त्राव घेतला घेण्यात आला होता. मृत्यू पश्चात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
या बाधित रुग्णांमध्ये *वाई* तालुक्यातील आसले येथील 26 वर्षीय महिला व 3 वर्षाची बालीका, जांभळी येथील 48 वर्षीय महिला, वेरुळी येथील 41 वर्षीय पुरुष, कोंढावळे येथील 47 वर्षीय पुरुष, किरुंडे येथील 25 वर्षीय पुरुष, वडवली येथील 30 वर्षीय महिला, वाई ग्रामीण रुग्णालय येथील 33 वर्षीय आरोग्य कर्मचारी.
*महाबळेश्वर तालुक्यातील देवळी येथील 15 वर्षीय युवती, व 28 वर्षीय महिला, पारुट येथील  वय 21 व 22 वर्षीय 2 युवती व 50 वर्षीय पुरुष, गोरोशी येथील 43 वर्षीय पुरुष.
*जावळी* तालुक्यातील  तोरणेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, बेलवडी येथील मृत 65 वर्षीय पुरुष.
*खटाव* तालुक्यातील बनपुरी येथील 20  वर्षीय  युवक, वांझोळी येथील 24 वर्षीय युवक, डांभेवाडी येथील 15 वर्षीय युवती व 39 वर्षीय महिला.
*सातारा* तालुक्यातील वावदरे येथील 56 वर्षीय पुरुष
*कराड* तालुक्यातील शेणोली येथील 4 पुरुष (वय 24, 28,35 व  34), 2 बालीका (वय 7  व 13) आणि 26 वर्षीय महिला.
कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत एकूण 422 इतकी झाली आहे.

बुधवार, २७ मे, २०२०

सातारा; अंभेरी येथील एका बाधिताचा मृत्यु तर भाटकी येथील मृत व्यक्तीचे नमुने पाठविले तपासणीला

अंभेरी येथील एका  बाधिताचा मृत्यु तर भाटकी येथील मृत व्यक्तीचे नमुने पाठविले तपासणीला   सातारा दि. 27  :  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारा मुंबई येथून प्रवास करुन  अंभेरी ता. खटाव येथील  53 वर्षीय  कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु झाला आहे. या   पुरुषाला तीव्र श्वसनदाह आजार होता.  तसेच मुंबई येथून प्रवास करुन आलेला भाटकी ता. माण येथील 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला आहे.  या 54 वर्षीय पुरुषाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
172 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 27, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 68, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 7 असे एकूण 172 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 394 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 255 रुग्णांवर उपचार सुरु असून 13 जणांचा मृत्यु झालेला आहे.

सातारा ; बारा तासात 58 नवे कोरोनाग्रस्त

सातारा जिल्ह्यात तब्बल 52 जणांचा अहवाल आज सकाळी (27 मे) पॉझिटिव्ह आल्याने धाकधूक वाढली आहे. तर दोघा कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले. गेल्या बारा तासात सापडलेल्या नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 झाली आहे
*आज आलेल्या रिपोर्टनुसार तालुकानिहाय कोरोना बाधित* 


*माण तालुका*- म्हसवड-1, तोंडले-1, भालवडी-1 व लोधवडे-2
*सातारा तालुका*- जिमनवाडी 2,  खडगाव-1, कुस बुद्रुक 1
*वाई तालुका*- आकोशी-1,  आसले-1, मालदपूर 1, देगाव-1 सिद्धनाथवाडी-1 व धयाट-1
*पाटण तालुका* -धामणी-4, गलमेवाडी 1, मन्याचीवाडी 1, मोरगिरी 2, आडदेव 1, नवारस्ता 1, सदुवरपेवाडी 2,  
 जांभेकरवाडी 1 (मृत्यु)
*खंडाळा तालुका*- अंधोरी  2, घाटदरे 1 व पारगाव 7
जावळी - सावरी 3, केळघर 2
*महाबळेश्वर तालुका*- कासरुड 2, देवळी 3 गोळेवाडी 1
*कराड तालुका*- खराडे  2, म्हासोली 1
*फलटण तालुका*  सस्तेवाडी 1
*खटाव तालुका*- वांझोळी 1 वरची अंभेरी 1

मंगळवार, २६ मे, २०२०

कृष्णा मेडिकल कॉलेज येथील रिपोर्टनुसार आणखी 5 पॉझिटिव्ह

कृष्णा मेडिकल कॉलेज येथील रिपोर्टनुसार आणखी 5 पॉझिटिव्ह
सातारा दि.26  नवारस्ता ( पाटण ) येथील 12 वर्षीय सारी रुग्ण, वानरवाडी (ता.कराड) येथील प्रतिबंधित क्षेत्रातून 25 वर्षीय गरोदर महिला, मुंबई येथून आलेली पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 30 वर्षीय महिला, मुंबईवरून आलेली उंब्रज ता. कराड येथील 29 वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक कोरोना बाधित;20 अहवाल निगेटिव्ह

कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक कोरोना बाधित;20 अहवाल निगेटिव्ह
 सातारा दि. 26 :  कराड कृष्णा मेडीमल कॉलेज येथे उपचार घेणाऱ्या कराड तालुक्यातील वानरवाडी  येथील 25 वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना बाधित आला असून 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*240 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला*
  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 38 व कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 41, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 81, वेणताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय कराड येथील 69, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 11 असे एकूण 240 नागरिकांच्या  घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली  आहे.

कराड तालुक्यातील चार बाधित कोरोनामुक्त; आज सोडले घरी

कराड तालुक्यातील चार बाधित कोरोनामुक्त; आज सोडले घरी
सातारा दि. 26 :   कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या  म्हासोली ता. कराड येथील 60   वर्षीय पुरुष,  मलकापूर येथील 9 वर्षांची मुलगी,  उंब्रज येथील 22 वर्षीय युवक आणि  53 वर्षीय पुरुष असे एकूण चार कारोना बाधित रुग्ण आज कोरोना मुक्त झाले असून त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. 
या चार रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या चार जणांना आज  सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्ह्यात 336 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 जण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे

सातारा ; 91 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

91 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला 

सातारा दि. 26  :  एन.सी.सी.एस पुणे यांच्याकडील अहवलानुसार  91 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला
काल रात्री 25 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 14 व कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 33 असे एकूण 47 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली  आहे. 

सातारा ; जिल्ह्यात 27 कोरोना बाधित; जांभळी येथे मृत्यू झालेल्या 52 वर्षीय पुरुषाचाही त्यात समावेश*

*सातारा जिल्ह्यात 27 कोरोना बाधित; जांभळी येथे मृत्यू झालेल्या 52 वर्षीय पुरुषाचाही त्यात समावेश*

सातारा दि. 25 :  सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून 27 जण कोरोना ( कोविड 19 ) बाधित असून यात मुंबई येथून आलेल्या वाई तालुक्यातील जांभळी येथील मृत्यू झालेल्या 52 वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्णांमध्ये समावेश असलेल्या रुगणांची तालुका निहाय व गाव निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 2, जावळी तालुक्यातील सायगाव येथील 1, मोरघर येथील 4, सावरी (ग्रामपंचायत कसबे बामणोली) येथील 1, वाई तालुक्यातील परतवाडी येथील 3, दह्याट येथील 4, अकोशी येथील 1, धावडी येथील 2, जांभळी येथील 1 (मृत्यू),  खंडाळा तालुक्यातील आंधोरी येथील 1,  सातारा तालुक्यातील रायघर येथील 1, शेळकेवाडी येथील 2,  खटाव तालुक्यातील डांभेवाडी येथील 1, कराड तालुक्यातील म्हासोली येथील 1, आणि पाटण तालुक्यातील खळे (सध्या मलकापूर)  येथील 1 व काळेवाडी(आडूळ)येथील 1 अशा 27 कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.

सोमवार, २५ मे, २०२०

सातारा ; 24 में अखेर ई-पास घेवून 1 लाखापेक्षा अधिक नागरिक सातारा जिल्ह्यात दाखल

24 में अखेर ई-पास घेवून 1 लाखापेक्षा अधिक नागरिक सातारा जिल्ह्यात दाखल
सातारा दि. 25 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशामधून तसेच महाराष्ट्र राज्याच्या इतर जिल्ह्यातून 24 मे अखेर ई-पास घेवून 1,09,604 नागरिकांनी चेक पोस्टवरुन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे.  
यामध्ये देशातील  आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश,उत्तराखंड, ओडिसा, कर्नाटक, केरळ, गुजरात, गोवा, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, दादरा आणि नगर हवेली, पंजाब, पश्चिमबंगाल, बिहार,मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हरियाना मधून 2,184 नागरिकांनी प्रवेश घेतला आहे. तर 1,07,420 हे राज्यातील इतर जिल्ह्यातून आले आहेत.
सातारा जिल्ह्यात प्रवेश करुन विविध तालुक्यात गेलेल्यांची संख्या तालुका निहाय पुढीलप्रमाणे- कराड-12671, कोरेगाव-6113, खंडाळा-4804, खटाव-11676, जावळी-8192, पाटण-12463, फलटण-7457, महाबळेश्वर- 6588, माण-10341, वाई-8985 व सातारा तालुका-20314 अशा एकूण 1,09,604 नागरिकांनी विविध तालुक्यात प्रवेश केला आहे.

सातारा : मुंबईवरून प्रवास करून आलेल्या एक कोरोना बाधित आणि एक अनुमानिताचा मृत्यू

मुंबईवरून प्रवास करून आलेल्या एक कोरोना बाधित आणि एक अनुमानिताचा मृत्यू

सातारा दि. 25 : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आज वाई तालुक्यातील आसले येथील 70 वर्षीय मधुमेह असलेल्या कालच  कोरोनाबाधित म्हणून आढळून आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाई तालुक्यातील जांबळी  येथील 52 वर्षीय मधुमेह असलेल्या  पुरुषाचा मृत्यू झाला असून कोरोना अनुमानित म्हणून त्याचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
   मृत्यू झालेले दोघेही मुंबईवरुन प्रवास करुन आलेले होते. त्यांना मधुमेह व श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
184 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला 
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 64, वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुगणालय कराड येथील 55, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 48  व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 5 अशा एकूण 184 अनुमानित नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.

कराडमधील दोन बाधित कोरोनामुक्त; आज सोडले घरी

कराडमधील दोन बाधित कोरोनामुक्त; आज सोडले घरी

सातारा दि. 25 :   कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला व 24 वर्षीय युवक हे दोन कारोना बाधित रुग्ण आज कोरोना मुक्त झाले असून त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. 
या दोन रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे  बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या दोन जणांना आज  सोडण्यात आले. कृष्णा चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश  भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 309 कोरोना बाधित आढळले असून त्यापैकी 122 जण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे

सातारा ; 171 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह; बाधित महिलेसह अन्य एका महिलेची शस्त्रक्रीयेद्वारे सुरक्षीत प्रसुती तर 54 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

171 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह; बाधित महिलेसह अन्य एका महिलेची शस्त्रक्रीयेद्वारे सुरक्षीत प्रसुती तर 54 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला 
 
सातारा दि. 25  :  एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्या प्राप्त अहवालानुसार एकूण 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित महिलेस अन्य एका महिलेची शस्त्रक्रीयेद्वारे सुरक्षीत प्रसुती
काल दि. 24 मे रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित 24 वर्षीय महिलेचे सिझेरियन ऑपरेशनद्वारे सुरक्षीत प्रसुती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत.  तसेच आज पहाटे 3.30 वाजता कंटेन्मेंट झोन  भिमनगर, कोरेगाव येथील 22 वर्षीय महिलेची सिझेरियन ऑपरेशनद्वारे सुरक्षीत प्रसुती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुरक्षित असून आईच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
54 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला 
काल दि. 24 मे रोजी रात्री उशिरा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 46 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथे 8 असे एकूण 54 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुना एन.सी.सी.एस, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

रविवार, २४ मे, २०२०

सातारा जिल्ह्यातील कोरोना भूकंपाची मालिका सुरूच,31 रुग्ण पॉझिटीव्ह ;एकूण 309 बाधित

सातारा जिल्ह्यात 31 रुग्ण कोरोना बाधित 
              ::सविस्तर वृत्त::
सातारा दि. 24 : सातारा जिल्ह्यात आज रात्री आलेल्या रिपोर्टनुसार 31 रुग्ण कोरोना बाधित  असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अमोद गडीकर यांनी सांगितले. 
     कराड तालुक्यातील म्हासोली येथील निकट सहवासीत 30, 50 व 55 वर्षीय महिला, वर्षीय महिला, 65 व 25 वर्षीय पुरुष 9 वर्षाचे बालक.  शमगाव येथील  निकट सहवासीत 42 वर्षीय पुरुष. इंदोली येथील निकट सहवासीत 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय तरुण , 14 वर्षीय तरुणी व 12 वर्षाची मुलगी असे एकूण 11. 
  पाटण तालुक्यातील गोकुळ तर्फ पाटण येथील 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला व 2 वर्षाचे बालक असे एकूण 3. 
सातारा तालुक्यातील कारी येथील 24 वर्षीय तरुण 57 वर्षीय पुरुष. चाळकेवाडी येथील मुंबई येथून आलेली 35 वर्षीय महिला. मुंबई येथून आलेला माळ्याचीवाडी (कन्हेर) ता. सातारा येथील 27 वर्षीय युवक असे एकूण 4.
जावली तालुक्यातील केळघर येथील 12 वर्षीय बालक,53 वर्षीय पुरुष,16 वर्षीय तरुण व52वर्षीय महिला असे एकूण 4.
वाई तालुक्यातील आसले येथील निकट सहवासीत 49 वर्षीय महिला. वासोळे येथील निकट सहवासीत 8 वर्षीय बालक व 43 वर्षीय महिला. आसरे येथील 70 वर्षीय सारीचा रुग्ण व मुंबई येथून आलेला 67 वर्षीय पुरुषअसे एकूण 5.
महाबळेश्वर तालुक्यातील कासरुड येथील निकट सहवासीत 85 व 40 वर्षीय महिला असे एकूण 2
खटाव तालुक्यातील निमसोड  येथील मुंबई येथून आलेला 35 वर्षीय पुरुष एक.  
कोरेगांव तालुक्यातील वाघोली येथील निकट सहवासीत 56 वर्षीय महिला एक. 
असे एकूण 31 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 309 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 182  इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 120 आहे तर मृत्यु झालेले 7 रुग्ण आहेत.
 

सातारा : 6 बाधित कैदी रुग्ण पूर्णपणे बरे; आज दिला डिस्चार्ज67 जण विलगिकरण कक्षात दाखल

6 बाधित कैदी रुग्ण पूर्णपणे बरे; आज दिला डिस्चार्ज
67 जण विलगिकरण कक्षात दाखल
 
सातारा दि. 24 : क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे जिल्हा कारागृहातील सहा  कैदी कोविड बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
67 जण विलगिकरण कक्षात दाखल
 
तसेच क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे 29, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 38 असे एकूण  67 जणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही  डॉ. आमोद  गडीकर यांनी कळविले आहे. 
  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 278 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 151  इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 120 आहे तर मृत्यु झालेले 7 रुग्ण आहेत.
 

सातारा ; 26 जण विलगिकरण कक्षात दाखल

26 जण विलगिकरण कक्षात दाखल
 
सातारा दि. 24  : काल दि. 23 मे राजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे 26 जणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस. पुणेा यांच्याकडे तपासणी पाठविण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद  गडीकर यांनी कळविले आहे. 
 गावाच्या नावात दुरुस्ती
काल रात्री 31 पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती पाठविण्यात आली होती. सदरच्या बातमीमध्ये खटाव तालुक्यातील मुंबई येथून आलेली खतगूण येथील महिला या ऐवजी सातारा तालुक्यातील खडगांव परळी येथील महिला असे वाचण्यात यावे, असा खुलासाही डॉ. गडीकर यांनी केला आहे.  

सातारा जिल्ह्यात नवे 31 कोरोना बाधित;दिवसभरात 77 बाधित,पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही त्यात समावेश

सातारा जिल्ह्यात नवे 31 कोरोना बाधित;दिवसभरात 77 बाधित पाचगणी येथे मृत्यू झालेल्या 70 वर्षीय महिलेचाही त्यात समावेश 
 
सातारा दि. 23 : सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून 31 जण कोरोना ( कोविड 19 ) बाधित असून यात  मुंबई येथून आलेली आणि पाचगणी येथे मृत्यू झालेल्या  70 वर्षीय महिलेचाही समावेश असून 80 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीवर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये कराड तालुक्यातील वानरवाडी येथील निकट सहवासित 40 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय मुलगा, वय 11, 34 19 वर्षीय 3 महिला, शेणाली येथील मुंबईवरुन आलेले 60 व 50 वर्षीय 2 पुरुष व 35 वर्षीय महिला.
जावली तालुक्यातील गवडी येथील निकटवासित 32 वर्षीय पुरुष, ठाणे येथून आलेले कसबे बामणोली येथील 23 व 14 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली सायगाव येथील 58 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 29 वर्षीय महिला, 10 वर्षाचे बालक व  50 वर्षीय पुरुष, अंधोरी येथील सारीचा 43 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील मुंबई येथून आलेली पाचगणी येथील 70 वर्षीय महिला (मृत).
वाई तालुक्यातील मुंबई येथून आलेली वाई येथील 48 वर्षीय महिला, मुंबई येथुन आलेला  देगाव येथील 60 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील चिंचणेर-लिंब येथील निकटसहवासित 43 वर्षीय पुरुष, कुस खुर्द येथील 76 व 43 वर्षीय 2 महिला व 17 वर्षीय युवती.
खटाव तालुक्यातील गादेवाडी येथील 28 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष आणि 55 वर्षीय महिला, मांजरवाडी येथील  47 वर्षीय महिला,  मुंबई येथून आलेला  चिंचणी येथील 21 वर्षीय युवक, मुंबई येथून आलेली खतगूण येथील 20 वर्षीय महिला.
कोरेगाव तालुक्यातील मुंबई येथून आलेला वाघोली येथील सारीचा 53 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय  महिला.असे जिल्ह्यातील एकूणरुग्णांची संख्या 278 इतकी झाली आहे 

शनिवार, २३ मे, २०२०

धक्कादायक सातारा; 26 नवे कोरोना रुग्ण आज दिवसभरात 72 कोरोना बाधित

सातारा ; दि.23 पुण्यावरून आताच आलेल्या रिपोर्टनुसार 26 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले असून यात परवा पाचगणी येथे मृत्यू पावलेल्या महिलेलाचाही समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी सातारा जिल्ह्यात ४० कोरोनाग्रस्त सापडले होते. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा ६ रुग्ण सापडले. आता रात्री पुन्हा २६ नवीन कोरोना बाधित सापडल्याने आज दिवसभरत जिल्ह्याती एकूण ७२ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर जिल्ह्यात सापडलेली हि सर्वाधिक आकडेवारी आहे.

6 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह; 14 जण निगेटिव्ह तर 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला

6 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह; 
14 जण निगेटिव्ह तर 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला 
सातारा दि. 23 : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 6 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये म्हासोली ता. कराड येथील 1 मुलगी (वय 15), 1 पुरुष (वय 71 ), ढेबेवाडी फाटा ता. कराड येथील 1 मुलगी (वय 18) 1 युवक (वय 23) 1 महिला (वय 44), गलमेवाडी कुंभारगाव ता. पाटण येथील 1 युवती (वय 24) असे एकूण 6 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
 
139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविले  
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 20, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 44, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 11, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 54,  उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 8 असे एकूण 139 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 247 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 127 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.
0000

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय11 लाख शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी 8 हजार कोटी- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील

राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11 लाख शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी 8 हजार कोटी
- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील  

सातारा दि. 23 : राज्यातील सुमारे 11 लाख शेतकऱ्यांसाठी 8 हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.
 ज्या  शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे कर्ज घेतले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना जाहीर केली होती. याची कार्यवाही सुरू असतानाच दुर्देवाने कोरोनाचे महासंकट आले. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने   राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. 
प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. कर्जमाफीची जी अंतिम यादी राहिलेली आहे, त्या यादीमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांमध्ये कर्ज आहे या बँकांनी अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे गृहित धरुन या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे. 
 यामध्ये राज्य सहकारी बँकेच्यावतीने आणि काही बँका स्वत:च्या फंडातून रक्कम उपलब्ध करतील. ही रक्कम कर्ज खात्यातमध्ये गेल्यानंतर ते कर्ज खात्यामध्ये गेलेली रक्कम आणि त्यावरील व्याज देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. त्याप्रमाणे राज्यभर कार्यवाही सुरू झाली आहे. जवळजवळ साधारणपणे 11 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि साधारणपणे 8 हजार कोटींची रक्कम आहे. याचा निश्चित शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना याचा निश्चित दिलासा मिळेल असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

सातारा ; जिल्ह्यातील 40 नागरिकांचा अहवाल आला पॉझिटिव्ह;त्यातला एक मृत्यू पश्चात बाधित

जिल्ह्यातील 40 नागरिकांचा अहवाल आला पॉझिटिव्ह;त्यातला एक मृत्यू पश्चात  बाधित 
 
सातारा दि. 23  : सातारा जिल्ह्यातील 40 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातला एक लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथून आलेला कराड तालुक्यातील बाचोली येथील 47 वर्षीय पुरुष, जळगाव येथून आलेला उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गवेवाडी ता. पाटण येथील 27 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय युवक, मुंबई येथून प्रवास करुन आलेला बहुलेकरवाडी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली कोरेगाव येथील 40 वर्षीय महिला, शिरताव ता. माण येथील 25 वर्षीय पुरुष, लोधवडे ता. माण येथील 67 वर्षीय पुरुष (मृत), शिरताव ता. माण येथील 28 वर्षीय पुरुष, कोळकी ता. फलटण येथील निकट सहवासित 34 व 60 वर्षीय महिला, 9 वर्षाचे दोन बालके, जकातवाडी ता. सातारा येथील 27 वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा येथील 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, धनवडेवाडी ता. सातारा येथील निकट सहावासित 36 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, घारदरे ता. खंडाळा येथील 51 वर्षीय पुरुष, येळेवाडी ता. खंडाळा येथील 70 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला वासोली ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे  ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील 44 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली ता. कराड येथील 37 वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 10 व 8 वर्षांचे बालक, 46 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 44 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, असे एकूण 40 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मलकापूर ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष  पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
     जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 241 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 121  इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.

शुक्रवार, २२ मे, २०२०

सातारा ; सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 7 व सातारा येथील 1 असे 8 बाधित आज कोरोना मुक्त

सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 7 व सातारा येथील 1 असे  8 बाधित आज कोरोना मुक्त

सातारा दि. 22 :  सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे 7 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  दाखल असणारा  1 असे एकूण 8  कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे मलकापूर ता. कराड येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची ता. कराड येथील 40 व 60 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर   येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचारी, कराड येथील मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला, मलकापूर ता. कराड येथील 49 पुरुष  व 45  वर्षीय महिला तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दहिवडी ता.माण येथील 25 वर्षीय युवक असे एकूण 8 जणं करोना मुक्त झाले आहेत. 
  आत्तापर्यंत जिल्ह्यातील 114 नागरिक कोराना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.

सातारा : नोकरी इच्छुक उमेदवारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन

नोकरी इच्छुक उमेदवारांनी  नावनोंदणी करण्याचे आवाहन
 सातारा दि.22 : सातारा जिल्ह्यात नोकरी इच्छुक उमेदवारांना नावनोंदणी करण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत www.mahaswyam.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलमार्फत नोकरीइच्छुक उमेदवार नावनोंदणी विनामूल्य व घर बसल्या करु शकतात. त्यासाठी उमेदवारांनी या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तरी जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी www.rojgar.mahaswyam.gov.in या वेबपोर्टलवर करावी. विशेषत: परराज्यातून, परजिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात परतलेल्या व नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी या वेबपोर्टलद्वारे आपली नाव नोंदणी, नुतनीकरण, आपल्या प्रोफाईलमधील आवश्यक ते बदल करुन घ्यावेत, असे आवाहजन सहाय आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सातारा सचिन जाधव यांनी केले आहे. 

सातारा ; 58 वर्षीय कोविड बाधितासह 3 अनुमानितांचा मृत्यु;146 जणांना अहवाल आले निगेटिव्ह तर 109 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

सातारा ; 58 वर्षीय कोविड बाधितासह 3 अनुमानितांचा मृत्यु;
146 जणांना अहवाल आले निगेटिव्ह तर 109 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

सातारा दि. 22 : जावली तालुक्यातील एक पुरुष 58 वर्षीय कोविड बाधित रुग्णाचा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज सकाळी मृत्यु झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व श्वसन संस्थेच्या तीव्र आजार झाला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
वरळी, मुंबई येथून प्रवास करुन आलेली पाचगणी येथील 64 वर्षीय महिला गृह विलगीकरणात होती. या महिलेचा दम्याच्या आजाराने व ह्दयविकाराने मृत्यु झाला असून संशियत म्हणून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगिता चौगुले यांनी दिली आहे.
घाटकोपर, मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या 2 महिन्याचे बाळ  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे श्वास घेण्याचा त्रास होत होता   म्हणून  दाखल करण्यात आले होते. या 2 महिन्याच्या बाळाचा मृत्यु झाला असून संशयित म्हणून घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच नांदलापूर ता. कराड येथील 60 वर्षीय महिला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे संशियत म्हणून दाखल करण्यात आली होती. या महिलेचा मृत्यु झाला असून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.

146 जणांना अहवाल आले निगेटिव्ह 
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 53, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 9, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 15 असे एकूण 111 जणांचे अहवाल निगेटिव्ह. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 35 जणांचे असे एकूण  146 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
109 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल 
दि. 21 रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 22, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 87 असे एकूण 109 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 201 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 90 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 106 आहे तर मृत्यु झालेले 5 रुग्ण आहेत.

सातारा ; दिवसभरात 20 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

सातारा दिवसभरात 20 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

‍ 
सातारा दि. 21 :  कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असलेले कलेढोण ता. खटाव येथील एक 45 वर्षीय महिला, कुंभारगाव ता. पाटण येथील  70 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 45 वर्षीय पुरुष व ऊंब्रज ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष संस्थात्मक अलगीकरणात दाखल असलेला  मुंबई येथून आलेला भीमनगर ता. कोरेगांव येथील 27 वर्षीय युवक, संस्थात्मक अलगीकरणात असलेला मायणी ता. खटाव येथील 64 वर्षीय पुरुष,‍ इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला ‍धामणी ता. पाटण येथील निकट सहवासीत 72 वर्षीय पुरुष, इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला शामगाव, कराड येथील निकट सहवासीत 24 वर्षीय पुरुष, वरोशी ता. जावली येथील निकट सहवासीत 52  वर्षीय ‍ महिला, ‍ क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे दाखल असलेले मोजावाडी ता. खटाव येथील 53 वर्षीय पुरुष सारीचा रुग्ण,  मुंबई येथून आलेला आसेर ता. वाई येथील 50 वर्षीय पुरुष, गारवाडी ता. खटाव येथील निकट सहवासीत 21 वर्षीय महिला,  मुंबई येथून आलेला फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली फलटण येथील 58 वर्षीय  महिला,  रायघर ता.सातारा येथील निकट सहवासीत  26 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला कासखुर्द येथील 24 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील निकट सहवासीत 36 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला ‍निमसोड ता. खटाव येथील 20 वर्षीय व 48 वर्षीय पुरुष, खापर खैरणे मंबई येथून आलेला गावडी ता. जावली येथील 19 वर्षीय पुरुष असे एकूण 20 जणांचा अहवाल  कोरोना बाधीत आला असल्याची  माहितीजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 
 

गुरुवार, २१ मे, २०२०

सातारा : 4 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

4 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह
सातारा दि. 19 :  कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असलेले कलेढोण ता. खटाव येथील एक 45 वर्षीय पुरुष, कुंभारगाव ता. पाटण येथील  70 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 45 वर्षीय पुरुष व ऊंब्रज ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे एकूण 4 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 

सातारा; खरीप हंगामासाठी जिल्ह्याची तयारी पूर्ण ; व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतला आढावा

खरीप हंगामासाठी सातारा जिल्ह्याची तयारी पूर्ण ; व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतला आढावा
सातारा दि. 21  :  राज्यस्तरीय खरीप हंगाम 2020 आढावा बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज पार पडली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 चे नियोजन आणि जिल्ह्या जिल्यातील  संभाव्य अडचणी जाणून त्यावर मार्ग काढण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या.
या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडलेल्या खरीप हंगाम बैठकीस राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री  (ग्रामीण) तथा वाशीमचे पालकमंत्री  शंभूराज देसाई,  जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर आदी उपस्थित होते. 
व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठकारे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी  संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,  या बैठकीत  पालकमंत्र्यांनी  सूचना केल्या, या सूचना चांगल्या असून यावर कृषी व सहकार विभागाला उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले आपल्या सरकारला ६ महिने पूर्ण होत आहेत. राज्य शासनाकडून एक चांगला अर्थसंकल्प मांडण्यात आला पण आज कोरोनाच्या संकटामुळे आज देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. 
  अन्न धान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन राज्यात पुढील काळात काय करू शकतो ते पाहण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, कोरोना नंतर जग बदलणार आहे, त्यात कृषी क्षेत्राची महत्वाची भूमिका राहणार आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या दर्जेदार पिकांची बाहेरच्या देशात निर्यात कशी होईल यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 मध्ये पिक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 चे नियोजन पूर्ण झाले असून खरीप हंगाम 2020 साठी 102923 मे. टन एवढ्या खतांचे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यापैकी माहे मे 2020 अखेर 30300 मे. टन इतका पुरवठा झालेला आहे. मागील शिल्लक मिळून एकूण 65250 मे. टन खत उपलब्ध आहे. 
 जिल्ह्याची 47804 क्विंटल बियाण्यांची मागणी  असून प्रमुख पिक सोयाबीनची मागणी  17063 क्विंटल इतकी आहे. त्यापैकी आजअखेर महाबीज कडून 1909.8 क्विंटल व खासगी कंपन्यांकडून 5119.73 क्विंटल असे एकूण 7029.53 क्विंटल इतकी बियाणे उपलब्ध झालेले आहेत. त्यापैकी 522 क्विंटल बियाण्यांची विक्री झालेली असून 6507.13 क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात  आली आहे.
 भात पिकाचे बियाण्यांची मागणी 13000 क्विंटल इतकी आहे. यापैकी महाबीजकडून 961, एनएससी-110 क्विंटल, खासगी 3812.99 क्विंटल असे एकूण 4883.99 क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे.  तसेच कृषी विभागामार्फत बांधावर खत व बियाणे वाटप मोहिमेंतर्गत सातारा जिल्ह्यात 812 शेतकरी गटांमार्फत आजअखेर 917.42 मे. टन खते व 888.16 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले आहेत.

सातारा : अकरा जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह, त्यात 18 तारखेला मुंबई वरून आल्यानंतर मृत्यू पावलेल्या व्यक्तींचाही समावेश

अकरा जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह, त्यात 18 तारखेला मुंबई वरून आल्यानंतर मृत्यू पावलेल्या व्यक्तींचाही समावेश
सातारा दि. 20 :  रात्री प्राप्त अहवालानुसार क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 4 (  चिंचनेर लिंब ता.सातारा येथील मुंबई वरून आलेला 30 वर्षीय युवक, गादेवाडी ता. खटाव येथील 30 व 32 वर्षीय पुरुष तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाईकाच्या निकट सहवासातील 9 वर्षाची मुलगी)  , वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 3 ( म्हासोली ता. कराड येथील 22 वर्षीय युवती  व 28 वर्षीय पुरुष तसेच मेरुएवाडी येथील 33 वर्षीय पुरुष), उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 2 (कोळकी येथील 74 वर्षीय पुरुष व फरडवाडी, ता. माण येथील 50 वर्षीय पुरुष), ग्रामीण रुग्णालय, वाई येथे कवठे ता. खंडाळा येथील 33 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल म्हासोली ता. कराड येथील  50 वर्षीय निकट सहवासित अशा  एकूण 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यापैकी फलटण येथील 74 वर्षीय पुरुषाचा 18 रोजी मुंबई वरून प्रवास करून आल्यानंतर  मृत्यू झाला होता त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. 
  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 181 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 79 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 4 रुग्ण आहेत.
 00000

चेौगुलेवाडी-मुट्टलवाडी : सरपंचांना शिवीगाळ कारवाईची मागणी


तळमावले/वार्ताहर
चेौगुलेवाडी-मुट्टलवाडी ता.पाटण येथील ग्रामस्थांची ऐन उन्हाळयात लाॅकडाऊनच्या काळात पाण्यासाठी भटकंती सुरु होती. त्यामुळे शासनाकडील टॅंकर ने पाणी पुरवठा सुरु झाला होता. टॅंकर मधील 80 टक्के पाणी गावच्या विहीरीत तर 20 टक्के पाणी कात्रे-जाधव वस्तीला देण्याचा ठराव झाला होता. मात्र गावातील काही ग्रामस्थांनी कात्रे-जाधव वस्तीला पाणी द्यायचं नाही असा विरोध करत सरपंचांना शिवीगाळ, धक्काबुक्की करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप चैगुलेवाडी-मुठ्ठलवाडी सरपंच सौ.जयश्री रविंद्र मुटल यांनी निवेदनाव्दारे केला आहे.
निवेदनात सरपंच सौ.जयश्री रविंद्र मुटल यांनी म्हटले आहे, ‘‘चेौगुलेवाडी येथे ग्रामस्थांची पाण्यासाठी गैरसोय होवू नये यासाठी शासनाने टॅंकर ने पाणी पुरवठा करावा. तशी मागणी ग्रामपंचायतीने शासनाकडे केली होती. गावातील विहीरीत 80 टक्के पाणी व 20 टक्के पाणी नजीक असलेल्या जाधव-कात्रे वस्त्यांना देण्याचा ठराव घेण्यात आला होता. गुरुवार दि.’’14 मे, 2020 रोजी सकाळी आठ वाजता शासनाकडून पाठवण्यात आलेला पाण्याचा टॅंकर गावातील विहीरीत खाली करत असताना गावातील काही नागरिकांनी गर्दी करत जाधव-कात्रे वस्तीला पाणी देण्यास विरोध केला व माझ्या घरासमोर गर्दी करत शिवीगाळ करुन मला जीवे मारण्याची धमकी दिली असून याची चैकशी करुन संबंधितांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी सरपंच सौ.जयश्री रविंद्र मुटल यांनी केली आहे.

बुधवार, २० मे, २०२०

कराड : आज कृष्णा हॉस्पिटलचे 20 जण कोरोनामुक्त; आज सोडणार घरी

आज कृष्णा हॉस्पिटलचे 20 जण कोरोनामुक्त; आज सोडणार घरी 

सातारा दि. 20  : आज कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेत असलेले, कराड तालुक्यातील  वनमासमाची येथील 7, साकुर्डी येथील 2, आगाशिवनगर येथील 4, उंब्रज येथील 1, गोटे येथील 1, बनवडी येथील 1, गमेवाडी येथील 1, तांबवे येथील 1, मलकापूर  येथील 1 व साताऱ्यातील शाहूपुरी येथील 1 असे एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
// कुमजाई पर्व //

सातारा : एकाच दिवशी 28 नवे कोरोनाबाधित

कराड : सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीत असे 20 जणांचे अहवाल आज मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील बनपुरी येथील क्वारंटाईनमध्ये अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात आज मंगळवारी एकाच दिवशी तब्बल 28 कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 166 झाली असून कराड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढून 107 झाली आहे.जिल्ह्यात आज मंगळवारी कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. कराड तालुक्यातील म्हासोली येथील आणखी चार रुग्णांना तर शामगाव आणि चरेगाव जवळील खालकरवाडी येथील प्रत्येकी एक तर पाटण तालुक्यातील बनपुरी येथील काल मृत्यू झालेल्या महिलेचा आणि कोयना विभागातील शिरळ येथील अहमदाबादवरून प्रवास करून आलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान म्हासोली येथील नव्या साखळीने डोके वर काढले असून कराड तालुक्याची चिंता वाढवली आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधित संख्या वाढून (मंगळवारी) रात्री ती 107 झाली आहे.

कऱ्हाड तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण चार दिवसांपासून वाढु लागले आहे. तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील कोरोनाची बाधितांची संख्या कमी येत असतानाच उंडाळे विभागातील म्हासोली येथील कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. चार दिवसांपूर्वी पुण्याहून आलेल्या म्हासोलीतील एकाला कोरोनाची लागण झाली. यानंतर त्याच बाधिताच्या कुटुंबाला कोरोनाने ग्रासले आहे. तर यापूर्वी तीन रुग्ण सापडले होते आज सकाळीत्यात आणखी पाच रुग्ण सापडले.

रात्री पुन्हा त्यात चार रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे म्हासोली येथे नवी साखळी निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे म्हासोली गावाने तालुक्याची चिंता आणखीच वाढवली आहे. संबंधित ठिकाणची साखळी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने तालुक्याच्या काळजीत आणखीच भर पडली आहे.

दरम्यान तालुक्यातील शामगाव येथील एका व चरेगाव जवळील खालकरवाडी येथील एका रुग्णाला बाधा झाली आहे. दरम्यान पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील बनपुरी येथील एका महिलेचा काल विलगीकरण कक्षात असताना मृत्यू झाला होता. संबंधित महिलेचा रिपोर्ट आज आरोग्य विभागाच्या तपासणी पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर कोयना विभागातील शिरळ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित व्यक्ती हा अहमदाबाद वरून प्रवास करून आल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित ठिकाणी पोलिसांनी सूक्ष्म कंटेनमेंट झोनअंतर्गत कार्यवाही करून रस्ते सील केले आहेत.सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीतांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले.

सोमवार, १८ मे, २०२०

पाटण ; अनेक ग्रामपंचायती कोरोनाचा निधी वापरण्यासंदर्भात उदासीन

सातारा जिल्ह्यात कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने पाटण व कराड तालुक्यातील ग्रामपंचायतींना कोरोनाविषयी जनजागृतीसह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगअंतर्गत आरोग्य विषयक योजनेतून पंचायत समिती मार्फत मुबलक निधी उपलब्ध करून तात्काळ खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. मात्र त्याची संबंधित ग्रामपंचायतीकडून कितपत अंमलबजावणी केली जात आहे ? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

याबाबतचे आदेश पाटण व कराड तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींना दिले आहेत.या निधीतून गावात सॅनिटायझर बॉटल्स, सुरक्षा मास्कचे वाटप, औषध फवारणी, रस्ते, नाले साफसफाई, पाणीपुरवठा, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस, आरोग्य सेविका यांना प्रोत्साहनपर भत्ता यासाठी हा निधी तात्काळ खर्च करावयाचा आहे. आपल्या गावचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्य सदरच्या निधीचा वापर योग्य ठिकाणी करतात की नाही ? यावर गावातील सुज्ञ नागरिकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आजमितीस दोन्ही तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचे कोरोना निधी वापरा संदर्भातील धोरण उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा संबंधितांवर ग्रामप्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाई करावी, अशीही मागणी संबंधित गावातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

काही गावांमध्ये सॅनिटायझर तसेच सुरक्षा मास्क वाटपामध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा महामारीच्या काळात काही मंडळींकडून राजकीय श्रेय लाटण्याचेही प्रकार घडत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. एकंदरीतच संबंधित ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने सावळा गोंधळ उडत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने सॅनिटायझर तसेच मास्कचे वाटप करताना गावची लोकसंख्या लक्षात घेणे आवश्यक असून त्याप्रमाणे मास्क वाटप करणे गरजेचे आहे. परंतु बहुतांश ठिकाणी तसे होताना दिसत नाही. याउलट प्रत्येक कुटूंबाला दोनच मास्क देण्याचा अलिखीत फतवा काही ग्रामपंचायतींनी काढल्याने अनेक कुटुंबियांना मास्क पासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची? ते काही गावचे नागरिक नाहीत का ? भविष्यात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार का? असे एक ना अनेक प्रश्‍न नागरिकांना भेडसावू लागले आहेत.


बनपुरी ; येथे अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचाही घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवला ; विलगीकरण कक्षात असणाऱ्या 232 जणांचे घशातील स्त्राव पाठविले ;


काल बनपुरी येथे अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचाही घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवला ; सातारा जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात असणाऱ्या 232 जणांचे घशातील स्त्राव पाठविले ;
  सातारा दि. 18  : आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी विलगीकरणात असलेल्या 232 जणांचे आणि   बनपुरी येथे क्वारंटाईन कक्षामध्ये असलेल्या मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 43 वर्षीय महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने तीचाही  कोविड संशयित म्हणून नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
 आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 20, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 105, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 67, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 11, ग्रामीण रुणालय कोरेगांव येथे 17 व ग्रामीण रुणालय वाई येथे 12 असे एकूण 232 जणांच्या घशातील स्त्रावांचे  नमुने एन. सी. सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
 00000

काळगाव : कोरोनाविरुध्द लढणाऱ्या डाकेवाडीतील रणरागिणींचा गौरव


तळमावले/वार्ताहर
गावांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव होवू नये याकरिता ग्रामपंचायत, दक्षता समितीचे सदस्य, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस प्रत्येक गावात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अंगणवाडी सेविका सौ.कल्पना आनंदा घाडगे, मदतनीस सौ.मीना तुकाराम चव्हाण या दोन महिला रणरागिणीही काळजीपूर्वक काम करत आहेत. त्यांचा स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने गौरव करण्यात आला. या दोन रणरागिणींचा गौरव स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव सौ.रेश्मा डाकवे, सौ.शोभा डाकवे, सौ.आशा मुटल, सौ.वनिता डाकवे, सौ.सुनिता डाकवे, सौ.गयाबाई डाकवे श्रीमती हिराबाई डाकवे व अन्य महिला यांनी केला.
सद्याच्या संकटकाळात दोन हात करताना कर्तव्य म्हणून प्रत्येक घरात जावून सव्र्हे करण्याचे काम सौ.कल्पना घाडगे व सौ.मीना चव्हाण यांनी नियमितपणे सुरु ठेवले आहे. . उन्हातान्हात प्रत्येक ‘घर टू घर’ जावून माहिती संकलित करुन ती प्रशासकीय यंत्रणेला पोहोचवण्याचे जोखमीचे काम या ताई करत आहेत. या ताईंना घरोघरी सव्र्हे करत असताना अनेक बरेवाईट अनुभवही येत आहेत. ग्रामीण भागात त्या आपापल्या परीने महत्त्वाचे योगदान पार पाडताना दिसून येत आहेत. त्यांच्या कर्तव्याला, कष्टाला सलाम करण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने त्यांचा छोटेखानी सत्कार केला. या सत्काराने त्या भारावून गेल्या. त्यांचा सत्कार करताना त्यांना मास्क, कृतज्ञता सन्मानपत्र, पुस्तक व शाल देण्यात आली. या अनोख्या सत्काराने व प्रेमाने त्या भारावून गेल्या. त्यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले.  

रविवार, १७ मे, २०२०

; जवाहर कस्टम हाऊस कडे कोणी लक्ष देईल का ?

उरण JNPT 
: एक तर कोरोनाच भय आणि त्यात जीव मुठीत घेऊन कामावर आल्यावर कमिशनर ऑफिसला कामा निम्मित वरती जाण्यासाठी गर्दी कधी कधी दोन दोन तास केवळ वरती जाण्या साठी जातात. अस येथे काम करण्या साठी येणारे कामगार म्हणत आहेत.त्यातूनच मग गर्दी वाढते हे तेथील अधिकाऱ्यांना दिसत नाही का ? डिजिटल इंडिया करणार होते. पेपरलेस कारभार करणार होते काय झालं ? .E संचित वर आवश्यक असणारे सर्व पेपर अपलोड केले असता कशाला हवा यांना ओरिजनल co crtifiket हे ही जरा समजेल का बर तुम्हला शंका असेल तर सरकारी पगार घेऊन जे अधिकारी बसले आहेत त्यांना पोस्ट ऑडिट मध्ये ते शोधून चुकीचे असेल तर आयात दार अथवा सीमाशुल्क एजंट्स ला नोटीस पाठवता येत नाही का ?

मग डिजिटल इंडिया आणि पेपर लेस कामकाजाच्या घोषणा फक्त घोषणा होत्या की त्या जवाहर सीमा शुल्क ला लागू होत नाहीत का ?.

आज जी गर्दी त्या ठिकाणी होते ती तेथील चुकीच्या कारभारामूळे कशाला हवे पेपर तुमच्या अधिकारी वर्गा कडे डिजिटल प्रणाली कार्यान्वित असताना आऊट ऑफ चार्ज का होत नाहीत. तेथून ते पेपर उचलताना अनेकांना कोरोनाची बाधा होऊ शकते ह्याचा साधा तर्क ही ह्या अधिकारी वर्गाला असू नये. कुणीच बोलणार नाही जे आवाज उठवतील त्या सीमा शुल्क एजंट ला त्रास देणं सुरू होईल त्या मूळे कुणीच आवाज उठवत नाही पण
आजच्या कोरोनाच्या संकट काळात ही अस चालू असेल तर सरकार आणि राज्य सरकारच्या प्रशासकीय यंत्रणांना हे दिसत नाही का ? योग्य समनव्यातुन समस्या सुटू शकते आणि कोरोनाचा प्रादुर्भावही.


शनिवार, १६ मे, २०२०

कराड : येथील एक प्रवासी कोरोना बाधित;74 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 104 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

 
सातारा दि. 16 : वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे पुणे येथून प्रवास करुन आलेला एका प्रवाशाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
74 जणांचा अहवाल निगेटिव्ह
तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व ग्रामीण रुग्णालय वाई येथील 9 असे एकूण 64 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे  बी. जे. वैद्य'कीय महाविद्यालय , पुणे यांनी कळविले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या 10 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, असे एकूण 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 
104 जण विलगीकरण कक्षात दाखल
काल दि. 15 मे रोजी रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 40, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 64 असे एकूण 104 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. गडीकर यांनी दिली.
आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 129 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्णांची संख्या 66 आहे. तर कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण 61 असून कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण आहेत.

तळमावले : पोलीस पाटलांवर ‘शिवसमर्थ’चा मायेचा हात

पोलीस पाटलांवर ‘शिवसमर्थ’चा मायेचा हात
तळमावले/संदीप डाकवे
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यापासून प्रशासनाबरोबर पोलीस, इतर अधिकारी सक्षमपणे उभे आहेत. त्यांच्याबरोबर सातत्याने एक व्यक्ती निर्भिडपणे उभी आहे. त्याचे नाव पोलीस पाटील. रात्रंदिवस पोलीस पाटील कोरोनाविरुध्दच्या संघर्षात ठामपणे उभे आहेत. अशा या पोलीस पाटलांना तळमावले येथील शिवसमर्थ परिवाराने मायेचा हात फिरवला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दैनंदिन जीवनात उपयुक्त असणारे जीवनावश्यक वस्तुंचे कीट देवून त्यांना सलाम केला आहे.
तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टी.को.आॅप.क्रे.सोसा.लि; व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने विभागातील सर्व पोलीस पाटलांना जीवनावश्यक कीटचे वाटप संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे व सहकारी यांनी केले.
यापूर्वी संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश दिला आहे. महिला बचत गटांकडून बनवलेले मास्क ग्रामीण भागातील वाडयावस्त्यांवर वाटले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी व्हिडीओ क्लिप, पत्रकारांसाठी जीवनावश्यक कीट इ. गोष्टींच्या माध्यमातून संस्थेने कोरोना विरुध्दच्या लढयात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शिवसमर्थ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24 तास सेवा देण्याचाही प्रयत्न केला आहे.
तळमावले, ढेबेवाडी, कुंभारगांव या विभागातील सर्व एटीएम बंद असताना संस्थेने आपल्या एटीएमच्या माध्यमातून लोकांची होणारी गैरसोय थांबवली आहे. संस्थेच्या या विविध उपक्रमांचे जनमानसांत कौतुक होत आहे.
लोकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस पाटलांसाठी संस्थेच्यावतीने कीटचे वाटप करण्यात आले आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या बहुतेक सर्व वस्तूंचा समावेश या कीटमध्ये करण्यात आला आहे. अमित शिंदे, संतोष पवार, विजय सुतार, प्रवीण मोरे, निलेश सुपनेकर, सौ.मनिषा पवार, सौ.अमृता चोरगे, सौ.वंदना चाळके, सौ.सविता सपकाळ, नितीन पाटील, विशाल कोळेकर, अजय राऊत, अश्विनी भोसले व विभागातील पोलीस पाटील यांना हे कीट देण्यात आले. शिवसमर्थच्या या आपुलकीच्या वागणुकीमुळे सर्व पोलीस पाटील भारावून गेले.

पोलीस आणि जनता यामधील दुवा पोलीस पाटील:
जनता आणि पोलीस यांच्यामधील दुवा बनण्याचे काम पोलीस पाटील करत आहेत. हे कौतुकास्पद आहे. त्यांनी अशाच पध्दतीने नेहमी काम करावे. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील पुढे यावे. पोलीस पाटलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी शिवसमर्थ संस्था आणि परिवार यांच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी म्हणून जीवनावश्यक कीट दिले आहे. असे मत शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांनी व्यक्त केले आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...