बुधवार, २० मे, २०२०

सातारा : एकाच दिवशी 28 नवे कोरोनाबाधित

कराड : सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव, पाटण, कराड आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीत असे 20 जणांचे अहवाल आज मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील बनपुरी येथील क्वारंटाईनमध्ये अचानक मृत्यू पावलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात आज मंगळवारी एकाच दिवशी तब्बल 28 कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 166 झाली असून कराड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढून 107 झाली आहे.जिल्ह्यात आज मंगळवारी कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. कराड तालुक्यातील म्हासोली येथील आणखी चार रुग्णांना तर शामगाव आणि चरेगाव जवळील खालकरवाडी येथील प्रत्येकी एक तर पाटण तालुक्यातील बनपुरी येथील काल मृत्यू झालेल्या महिलेचा आणि कोयना विभागातील शिरळ येथील अहमदाबादवरून प्रवास करून आलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान म्हासोली येथील नव्या साखळीने डोके वर काढले असून कराड तालुक्याची चिंता वाढवली आहे. कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधित संख्या वाढून (मंगळवारी) रात्री ती 107 झाली आहे.

कऱ्हाड तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण चार दिवसांपासून वाढु लागले आहे. तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील कोरोनाची बाधितांची संख्या कमी येत असतानाच उंडाळे विभागातील म्हासोली येथील कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. चार दिवसांपूर्वी पुण्याहून आलेल्या म्हासोलीतील एकाला कोरोनाची लागण झाली. यानंतर त्याच बाधिताच्या कुटुंबाला कोरोनाने ग्रासले आहे. तर यापूर्वी तीन रुग्ण सापडले होते आज सकाळीत्यात आणखी पाच रुग्ण सापडले.

रात्री पुन्हा त्यात चार रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे म्हासोली येथे नवी साखळी निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे म्हासोली गावाने तालुक्याची चिंता आणखीच वाढवली आहे. संबंधित ठिकाणची साखळी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने तालुक्याच्या काळजीत आणखीच भर पडली आहे.

दरम्यान तालुक्यातील शामगाव येथील एका व चरेगाव जवळील खालकरवाडी येथील एका रुग्णाला बाधा झाली आहे. दरम्यान पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील बनपुरी येथील एका महिलेचा काल विलगीकरण कक्षात असताना मृत्यू झाला होता. संबंधित महिलेचा रिपोर्ट आज आरोग्य विभागाच्या तपासणी पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर कोयना विभागातील शिरळ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित व्यक्ती हा अहमदाबाद वरून प्रवास करून आल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित ठिकाणी पोलिसांनी सूक्ष्म कंटेनमेंट झोनअंतर्गत कार्यवाही करून रस्ते सील केले आहेत.सातारा जिल्ह्यातील जावळी, खंडाळा, खटाव आणि सातारा या तालुक्यातील प्रवास करून आलेले आणि काही बाधितांचे निकट सहवासीतांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...