26 जण विलगिकरण कक्षात दाखल
सातारा दि. 24 : काल दि. 23 मे राजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे 26 जणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस. पुणेा यांच्याकडे तपासणी पाठविण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.
गावाच्या नावात दुरुस्ती
काल रात्री 31 पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती पाठविण्यात आली होती. सदरच्या बातमीमध्ये खटाव तालुक्यातील मुंबई येथून आलेली खतगूण येथील महिला या ऐवजी सातारा तालुक्यातील खडगांव परळी येथील महिला असे वाचण्यात यावे, असा खुलासाही डॉ. गडीकर यांनी केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा