सोमवार, १८ मे, २०२०

काळगाव : कोरोनाविरुध्द लढणाऱ्या डाकेवाडीतील रणरागिणींचा गौरव


तळमावले/वार्ताहर
गावांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव होवू नये याकरिता ग्रामपंचायत, दक्षता समितीचे सदस्य, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस प्रत्येक गावात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अंगणवाडी सेविका सौ.कल्पना आनंदा घाडगे, मदतनीस सौ.मीना तुकाराम चव्हाण या दोन महिला रणरागिणीही काळजीपूर्वक काम करत आहेत. त्यांचा स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने गौरव करण्यात आला. या दोन रणरागिणींचा गौरव स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव सौ.रेश्मा डाकवे, सौ.शोभा डाकवे, सौ.आशा मुटल, सौ.वनिता डाकवे, सौ.सुनिता डाकवे, सौ.गयाबाई डाकवे श्रीमती हिराबाई डाकवे व अन्य महिला यांनी केला.
सद्याच्या संकटकाळात दोन हात करताना कर्तव्य म्हणून प्रत्येक घरात जावून सव्र्हे करण्याचे काम सौ.कल्पना घाडगे व सौ.मीना चव्हाण यांनी नियमितपणे सुरु ठेवले आहे. . उन्हातान्हात प्रत्येक ‘घर टू घर’ जावून माहिती संकलित करुन ती प्रशासकीय यंत्रणेला पोहोचवण्याचे जोखमीचे काम या ताई करत आहेत. या ताईंना घरोघरी सव्र्हे करत असताना अनेक बरेवाईट अनुभवही येत आहेत. ग्रामीण भागात त्या आपापल्या परीने महत्त्वाचे योगदान पार पाडताना दिसून येत आहेत. त्यांच्या कर्तव्याला, कष्टाला सलाम करण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने त्यांचा छोटेखानी सत्कार केला. या सत्काराने त्या भारावून गेल्या. त्यांचा सत्कार करताना त्यांना मास्क, कृतज्ञता सन्मानपत्र, पुस्तक व शाल देण्यात आली. या अनोख्या सत्काराने व प्रेमाने त्या भारावून गेल्या. त्यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...