गुरुवार, ५ मार्च, २०२०

सातारा :- जिल्ह्यातील खासगी मान्य प्राथमिक शिक्षक-शिक्षकेत्तर राज्य कार्यकारिणी रविवारी बैठकीचे आयोजन

सातारा, ०५ मार्च,:-
 सातारा जिल्ह्यातील खासगी मान्य प्राथमिक शिक्षक-शिक्षकेत्तर महासंघाच्या वतीने रविवार 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता राज्य कार्यकारिणी बैठक अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय, सातारा येथे आयोजित केली आहे. या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव श्री. तुंगार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
बैठकीत जिल्हावार अहवाल घेतला जाणार असून प्रलंबित प्रश्नाबाबत विचारविनिमय तसेच राज्यव्यापी अधिवेशन घेण्याबाबत राज्य संघटनेचे पदाधिकारी या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुकास्तरीय कार्यकारिणी सदस्य, सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी उपस्थित रहावे.या कार्यकारिणी बैठकीस सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*

पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...