शुक्रवार, ६ मार्च, २०२०

'"मविआ'" तून शिवसेना बाहेर पडण्याची शक्यता नवोदित मतदारांची राष्ट्रवादीला पसंती?

नवी मुंबई :-

पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून राष्ट्रवादीत परतणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने त्यांना सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादीला जास्त जागेची अपेक्षा आहे. ही अपेक्षा शिवसेनेला पूर्ण करणे शक्य होणार नसल्याने 'मविआ'तून शिवसेना बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र, शहरात दोन दुर्बल पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र एकत्र लढण्याच्या मनस्थितीत आहेत. काँग्रेसने २७, तर राष्ट्रवादीने ४० जागांची मागणी केली आहे. त्यामुळे शिल्लक ४४ जागा घेऊन शिवसेना ही निवडणूक लढविणार नाही. कमीत कमी ८० जागांची शिवसेनेची मागणी आहे.

होळीनंतर निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे

त्यामुळे पुढील ४५ दिवसानंतर एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात निवडणुका होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी ही निवडणूक २२ एप्रिल रोजी झाली होती. त्यामुळे 'मविआ'च्या तीन पक्षांत जागा वाटपावरून चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी झालेल्या एका बैठकीत काँग्रेसने २७ जागा मागितल्या आहेत. काँग्रेसचे विद्यमान दहा नगरसेवक आहेत. त्यातील तीन नगरसेवक हे भाजपमध्ये गेले असले तरी त्या जागा काँग्रेस जागा मानत आहे. त्यामुळे विद्यमान दहा जागांसह मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ११ जागांवर काँग्रसेचा दावा आहे. त्यामुळे किमान २७ जागा मागितल्यावर २१ जागा काँग्रसेच्या पदरात पडणार आहेत. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या ४९ प्रभागांत राष्ट्रवादीचे मतदार आहेत.

नवोदित मतदारांची राष्ट्रवादीला पसंती

चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदार संघातील नवोदित उमेदवारांनी चांगली मते मिळविलेली आहेत. ४० प्रभागांत राष्ट्रवादीला चांगली मते मिळालेली आहेत. त्यावर पक्षाचा दावा आहे. केवळ दोन नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला प्रभाग संख्या वाढवावी लागणार असून पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी चिरंजीवाला निवडणूक उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतील आयारामांची संख्या वाढणार असल्याने त्यांची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रभाग वाटप झाल्यानंतर शिल्लक प्रभागात निवडणूक लढविण्याची शिवसेनेची इच्छा नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी ही निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. शिवसेनेची स्वबळावर चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेनेते प्रवेश घेणाऱ्या नगरसेवकांची संख्या वाढत असल्याने हा आत्मविश्वास वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*

पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...