सोमवार, ९ मार्च, २०२०

काळगाव,डाकेवाडी अवैध दारुच्या धंद्यावर छापा

ढेबेवाडी प्रतिनिधी :- 
पाटण तालुक्यातील डाकेवाडी,काळगाव परिसरात अवैधपणे दारूविक्री केली जात आहे .अशी माहिती खास खबऱ्याकडून ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांना समजताच त्यांच्या खास पथकाने या ठिकाणी छापा टाकला.

पोलिस पथकाची चाहूल लागल्यामुळे अवैध दारूविक्री करणारा वसंत डाकवे (राहणार डाकेवाडी, ता.पाटण) हा पळून गेला. पोलिसांनी यावेळी कारवाई करून मुद्देमाल जप्त केला रासायनिक परीक्षणासाठी सॅम्पल राखून ठेऊन. इतर सर्व साठा ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा करण्यात आला आहे.अवैध दारूविक्री प्रकरणी ढेबेवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हवालदार शेळके करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*

पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...