तळमावले ता.पाटण प्रतिनिधी दि.९ मार्च
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाटण तालुका मनसे वाहतूकसेना अध्यक्ष संदीप मोरे यांनी मनसेच्या वर्धापनदिन निमित्त आगळा वेगळा उपक्रम केला ढेबेवाडी ते कराड आणि कराड ते ढेबेवाडी मोफत प्रवासी वाहतूक केली
यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याचा ह्या उपक्रमाचे स्वागत केले. एकूण १०० च्या वर लोकांना ह्या संधीचा फायदा झाला मोफत प्रवास करायला भेटल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता
यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे, ,दत्ता चळके, काशिनाथ करपे, दादा माने, महेश ताईगडे, तात्या लाहिगडे, निनाद ताईगडे हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा