आरळा ता.शिराळा ;- महिला दिनी डोंगरावरील जंगलातील महिलाना मिळाला मदतीचा हात
आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन अनेक संस्थाच्या वतीने विवीध उपक्रमाने साजरा करण्यात आला. पुरस्कार वितरण, पाककला, रांगोळी , नृत्य ,वक्तृत्व,गायन इत्यादी स्पर्धा आरोग्य शिबिरे , स्वसंरक्षण शिबिरे इत्यादी सारख्या अनेक उपक्रमानी महिला दिन साजरा झाला. या सर्वं प्रचलित उपक्रमाना फाटा देत आरळा ( ता. शिराळा , जि. सांगली ) येथील गांधी सेवाधाम विद्यालय व डोंगरी ग्रंथालय , चांदोली यांनी वेगळ्याच पध्दतीने महिला दिन साजरा केला. या स्तुत्य, समाज उपयोगी उपक्रमाचा हा घेतलेलाआढावा.
सांगली जिल्हयातील शिराळा हा डोंगरी तालुका. या तालुक्यातील पश्चिम भाग सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यानी वेढलेला , चांदोलीच्या हिरव्यागार जंगलाचा परीसर याच तालुक्याच्या सिमेलगत सातारा जिल्ह्यात येणारा पाटण तालुका हा ही तालुका डोंगरीच. देशाला स्वातंत्र्य मिळुन सत्तर वर्ष झाली तरीही दुर्गम भागातील डोंगरावर जंगलात असणाऱ्या काही वाड्यां , वस्त्या ,धनगरवाडे व तेथील माणसे अजुनही उपेक्षित, वचिंत आहेत . ना दळण वळणाची सुविधा , ना शैक्षणिक सुविधा, ना उद्योगधंदे , ना आर्थिक सुबत्ता , शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण कसतरी सातवी , दहावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करायचे आणि माथाडी कामगार म्हणून मुंबईला जायचे. वाडयांवर मागे राहतात ती लहान मुले , महिला व वृद्ध स्त्री पुरुष, तुटपुंजी कोरडवाहु शेती करणं , लाकडाच्या मोळ्या गोळा करणं .मध गोळा करणं. जांभळ करवंद विकणं हेच इथले पांरपारिक व्यवसाय आधुनिक जगापासुन लांब असणाऱ्या या वाडया वस्त्यावरच्या महिला मुंबईला गेलेल्या पतीच्या आणि पोरांच्या माघारी शेती व घरदार सांभाळतात.
गव्या सारखे जंगली प्राणी शेतीचे नुकसान करतात . चार महिने मुसळदार पाऊस , जनावरांना फीरवताना जंगली प्राण्यांची भिती अशा भयावह परिस्थितीत निसर्गाशी, गरीबीशी संघर्ष करत, झगडत या महिला जगत आहेत व अशाच दुर्गम भागातील महिलांना नेहमीच मदतीचा हात देते ते शैक्षणिक सामाजिक काम करणारे डोंगरी ग्रंथालय . आजपर्यंत या संस्थेने इतर सामाजिक संस्थेच्या सहकार्यांतून धान्य वाटप , साडी वाटप , पुस्तके वाटप , शैक्षणिक साहित्य वाटप ,कराटे शिबिर , करिअर मार्गदर्शन शिबिरे ,दुर्गम भागातील महिला व मुलीसाठी असे अनेकवेळा उपक्रम राबविले आहेत.डोंगरातील , जंगलातील वंचित विद्यार्थ्यांना मदत करणारे गांधी विद्यालयातील शिक्षक सुधीर बंडगर यांनी पुढाकार घेत थोरल्या भावाप्रमाणे महिला दिनी डोंगरी वाड्या वस्त्यावरच्या भागिनीना मदतीचा हात दिला आणि माणुसकीचे दर्शन घडविले. काळगाव धनगरवाडा येथील आर्थिक सबल नसणाऱ्या महिलाना तसेच बारकाबाई लांबोर या आर्थिक सुबत्ता नसलेल्या महिलेला त्यांच्या चिमुकल्या मुलांना तांदुळ , गहु , चटणी , मिठ , मसाला ,पीठ , डाळी , साखर , चहा पावडर , आंघोळीचे व धुण्याचे साबण , कपडे , साडया, बिस्कीटपुडे , शेंगदाणे , शाबु अशासारख्या गृहउपयोगी वस्तु देत खऱ्या अर्थाने वचिंत , संकटात सापडलेल्या माहिलाना मदत करत जागतिक महिला दिन साजरा केला
.विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने तसेच सामाजिक कार्यकर्त्याच्या सहकार्यांने विवीध वस्तु , धान्य संकलित करून डोंगरातील भगिनीना मदत करण्यात आली. ढेबेवाडीचे माजी सरपंच यांनीही पन्नास किलो तांदुळ मदत म्हणुन दिली. यावेळी वितरण कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित असणाऱ्या महिला व बालकल्याण विभाग काळगाव विभागाच्या पर्यवेक्षिका निलम चौगुले म्हणाल्या डोंगरी भागात भौतिक सुविधाचा अभाव आहे. उत्पन्नाचे साधन नाही .त्यामुळे आर्थिक सुबत्ता नसल्याने महिलाना विवीध समस्याना तोंड दयावे लागत आहे. व अशा महिलाना महिला दिनाच्या निमित्ताने सुधीर बंडगर यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मदत आदर्शवत आहे. शासनाच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करते. माजी सरपंच निलोफर डांगे म्हणाल्या महिला बचतगट व ग्रामसंघाच्या माध्यमातुन महिलामध्ये आर्थिक सुबत्ता यावी . महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे व विवीध उपक्रम राबवणार आहे. व महिलाना स्वतःच्या पायावर उभे करणार आहोत. या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.एस. हसबनीस , प्र . पर्यवेक्षक श्री.ए.एस घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रम प्रसंगी आघक्रांतिवीर उमाजीराजे नाईक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव जाधव , माजी सरपंच तमीज डांगे , व्यसनमुक्ती चळवळीचे प्रमुख पोपटराव बनसोडे, आरळ्याच्या पोलिस पाटील निलम सुर्यवंशी , करुंगलीच्या पोलिस पाटील मनिषा कांबळे , जयश्री मस्कर ,देवबा लांबोर , दगडू लांबोर , बाबुराव डोईफोडे परीसरातील अंगणवाडी सेविका ,ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
दुर्गम , डोंगरात जंगलात राहणाऱ्या माता भगिनी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत नसल्याने गरीबीशी व निसर्गाशी झुंजत जिवन जगत आहे. शिक्षण प्रसार करून तसेच महिलाना मदत करुन शैक्षणिक , आर्थिक व सामाजिक मागासलेपणा दुर करून महिला सबलीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत
श्री सुधीर बंडगर
संस्थापक - डोंगरी ग्रंथालय , चांदोली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा