शनिवार, ७ मार्च, २०२०

सातारा पोलीस चार अधिकाऱ्यांची जिल्हाअंतर्गत बदल्या


सातारा प्रतिनिधी : 

जिल्हा पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत.वडूज, ता. खटाव येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांची जिल्हा विशेष शाखा, सातारा येथे बदली करण्यात आली तर जिल्हा विशेष शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांची वडूज पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची कराड शहर तर कराड शहरचे सहा. पो. निरीक्षक सतिश पवार यांची पाचगणी येथे बदली करण्यात आली. या अधिकाऱ्यांना आपापल्या पोलीस ठाण्यात तत्काळ हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*

पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...