मुंबई : कोयना धरण परिसरातील गावांसाठी दळणवळणाचा मार्ग खुला व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा, पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने कोयना धरण क्षेत्रात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात धरणाच्या सुरक्षेची काळजी घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोयना धरण जलवाहतूक संदर्भात विधान भवनात बैठक झाली.
कोयना धरणाच्या सुरक्षेला बाधा येणार नाही, याची काळजी घेऊन धरणात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात विचार व्हावा. यासाठी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गृह, जलसंपदा, वन विभागाच्या समन्वयाने अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा.जलवाहतुकीसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना; त्यासाठीचे अंतर ठरविताना प्रथम धरणाच्या सुरक्षेचा विचार करावा, सध्या असलेली जेटी पोलीस पेट्रोलिंगसाठी योग्य असून जलवाहतुकीसाठी नवीन जेटीबाबत प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्चित करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.
यावेळी वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार,कायदा सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मिलिंद भारंबे, साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*
पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा