बुधवार, ४ मार्च, २०२०

नरेंद्र पाटलांचा बॅंक अधिकाऱ्यांना दणका

संगमनेर प्रतिनिधी :-

 पूर्वसूचना देवूनही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या बॅंकांचे व्यवस्थापक व प्रतिनिधींना नोटीस बजावण्याची सूचना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी संगमनेर येथे आज दिल्या.

संगमनेर येथे आज बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस तहसीलदार अमोल निकम, निवासी नायब तहसिलदार सुभाष कदम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. दीपाली पानसरे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते आदींसह शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या प्रकरणांना प्राधान्यक्रमाने मंजुरी देण्याची सूचना दिल्या.पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या प्रस्तावांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा, प्रकल्प अहवाल सनदी लेखापालाकडून तयार करून घ्यावा, कागदपत्र व्यवस्थित तयार करावीत, राज्य शासनाने महामंडळाच्या कर्जाला हमी दिली असल्यामुळे बॅंकांनी कर्जासाठी हमी अथवा जामिनदार मागू नये, राष्ट्रीयीकृत बॅंकांनी याबाबत महामंडळाकडून आलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांची छाननी करून कर्ज प्रकरण मंजूर करावे, प्रस्तावात असलेल्या त्रुटी दुरुस्त करून घ्याव्यात, तसेच याबाबत अर्जदाराशी चर्चा करा, त्यांना वारंवार चकरा माराव्या लागू नये, यासाठी काळजी घ्या, अशा सूचना दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*

पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...