भारत सरकारकडून सूरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे चांगले असल्याने ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली आहे. एकीकडे यावर कर सवलत आहे, तर दुसरीकडे परतफेडीतून मिळणाऱ्या व्याजाचा दरही जास्त आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना आयकर कलम ८० सी अंतर्गत सवलत मिळते. सोबत मिळणारे व्याजदेखील टॅक्स फ्री आहे. या योजनेंतर्गत दरमहा किमान एक हजार रुपये आणि वर्षामध्ये जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येऊ शकतात.
या व्यतिरिक्त एखाद्या खातेधारकाला पैशाची गरज असल्यास वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे मुलगी दहावीत पोहोचल्यावर खातेधारकाला काही पैसे काढण्याची परवानगी आहे.
या योजनेंतर्गत कुटुंबात दोन मुलींच्या नावे जास्तीत जास्त दोन खाती उघडू शकतात. याशिवाय जर तुम्ही मूल दत्तक घेतले असेल तर वयाच्या दहाव्या वर्षाआधी तुम्ही तिच्या नावे या योजनेत गुंतवणूक करू शकता.
सुकन्या समृद्धी खाते कसे उघडावे?
सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. यात मुलीचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि इतर महत्वाची माहिती द्यावी लागेल. सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी काही कागदपत्रे देखील आवश्यक असतात यानंतरच खाते पडताळणी करून खाते उघडले जाते. यात ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि रेशन कार्ड. याशिवाय पॅन, आधार असे आयडी पुरावे द्यावे लागतात. मुलीचे जन्म प्रमाणपत्रही यात आवश्यक असणार आहे.
खाते चालू ठेवण्यासाठी वर्षामध्ये किमान २५० रुपये जमा करणे आवश्यक आहे. योजनेंतर्गत तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही ५० टक्के पैसे काढू शकता. ज्यावेळी २१ वर्षे पूर्ण होतील त्यावेळी सुकन्या समृद्धि खात्यास परिपक्वता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा