मंगळवार, ३ मार्च, २०२०

४५ वर्षानंतर लोकनेत्यांचे नातू मांडणार विधिमंडळात अर्थसंकल्प

पाटण : लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा करारी गृहमंत्री म्हणून नावलौकीक होता. त्यांच्यानंतर ३६ वर्षापासून हा राजकीय वारसा त्यांचे नातू उत्कृष्ट संसदपटू शंभूराज देसाई हे समर्थपणे चालवित आहेत.

१९७५ च्या दशकातले तत्कालीन अर्थमंत्री कै.यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्यानंतर तब्बल ४५ वर्षानी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडण्याचा बहूमान पाटणचे शंभूराज देसाई यांना मिळाला आहे.

आठवडयापुर्वी विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा महत्वाचा गाभा असणाऱ्या अर्थसंकल्पाला या अधिवेशनात अनन्य साधारण महत्व असते.राज्याची आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक वर्षातील राज्य शासनाचे नियोजन व करावयाची कार्यप्रणाली हे सर्व या अर्थसंकल्पावर अवलंबून असते.

राज्यामध्ये नव्याने स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकारचे काम राज्यामध्ये प्रभावीपणे सुरु झाले असून महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून मंत्री अजित पवार व राज्यमंत्री म्हणून शंभूराज देसाई हे दोन मातब्बर आणि अभ्यासू नेते विधीमंडळ सभागृहाला मिळाले आहेत.

विधानसभेत अर्थमंत्री म्हणून मंत्री अजित पवार तर विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री म्हणून मंत्री शंभूराज देसाई हे शुक्रवार (ता.६ मार्च) रोजी २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.अर्थमंत्री म्हणून मंत्री अजित पवार यांनी यापुर्वी आघाडी शासनाच्या काळात राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला आहे.

परंतू नव्याने राज्यमंत्री झालेले शंभूराज देसाई यांची अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्थसंकल्प मांडण्याची पहिलीच वेळ असली तरी देसाईंना महाराष्ट्र विधीमंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ असा अभ्यास आहे. तर विधानसभेचे चारवेळा तालिका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

विधानपरिषदेतील अर्थसंकल्पासंदर्भात सातारा जिल्हयातील व पाटण मतदारसंघातील जनतेच्या मनात उत्सुकता वाढली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...