डाकेवाडी(काळगाव) ता.पाटण
श्री वाल्मिक ऋषीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या,ह.भ.प.महादेव महाराज मिरुके यांच्या कृपाशीर्वादाने व जयसिंग महाराज फाळके यांच्या मार्गदर्शनाने श्री क्षेत्र डाकेवाडी(काळगाव) येथे दि.०५ मार्च पासून सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे
त्रिमूर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ व ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी यांच्या वतीने गेल्या ३४ वर्षांपासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह साजरा करण्यात येतो. याप्रसंगी गावात दरवर्षी उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. अध्यात्म, समाजप्रबोधन आणि एकोपा या उद्देशाने सुरू केलेल्या ग्रामोत्सवाचे हे ३५ वर्ष आहे
गुरुवार दि.०५ मार्च रोजी सुरवात होणाऱ्या ह्या सोहळ्यात आठ दिवस वारकरी संप्रदायातील विशेष नावलौकिक असलेले कीर्तनकरांच्या कीर्तनचा कार्यक्रम होणार आहे.रोज सकाळी ०४ ते ०६ काकडा,०८ ते ११ व दुपारी ०२ ते ०५ वाचन सायं.०५ते०६ हरिपाठ,०६ ते०७ प्रवचन, रात्रौ.०९ ते ११ कीर्तन सेवा अशी कार्यक्रमाची रोजची रूपरेषा असून दि.११ मार्च रोजी सकाळी ८ ते ११ गावात व पंचक्रोशीत दिंडीचे (पालखी) आयोजन करण्यात आले आहे १० ते १२ ह.भ.प.धोंडीराम महाराज सवादेकर यांचे काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद होईल आणि ह्या सोहळ्याची सांगता होईल.ह्या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन त्रिमूर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ व ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा