नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (२ फेब्रुवारी २०२० )ला रात्री एक मोठी घोषणा केली आणि त्यानंतर चर्चेला उधाण आले. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंट येत्या रविवारपासून बंद करण्याचा माझा विचार आहे, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते. यात फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि इंस्टाग्रामचा समावेश आहे.मात्र, पंतप्रधान मोदींच्या घोषणेमागील गुपित त्यांनीच उघड केले आहे. ८ मार्च हा देखील महिला दिन आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी '#Sheinspiresus' हॅशटॅग ही मोहीम राबवित आहेत.
पंतप्रधान मोदींच्या या ट्विटमुळे राजकीय चर्चाना उधाण आले होते. पंतप्रधानांनी सोशल मीडियाला निरोप द्यायचा निर्णय का घेतला या प्रश्नाची उत्तरे प्रत्येक जण शोधत होते. ८ मार्च हा जागतिक महिला दिन आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी #Sheinspiresus' हॅशटॅग ही मोहीम राबवित आहेत. म्हणजे, 'ती आम्हाला प्रेरणा देते.' पंतप्रधान मोदी नक्कीच आपले सोशल मीडिया सोडणार आहेत मात्र फक्त एक दिवस आणि त्या दिवशी त्यांचे सर्व सोशल मीडिया खाते महिला चालवतील. म्हणजेच, देशातील महिलांना पंतप्रधानांच्या सोशल मीडियाला एक दिवसासाठी हाताळण्याची संधी आहे. रविवारी पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया अकाउंट्स महिलांच्या मालकीची असतील.
पंतप्रधानांनी असा प्रश्न उपस्थित केला की, ज्या स्त्रियांचे जीवन आणि संघर्ष जगाला प्रेरणा देऊ शकतात ती महिला तुम्हीच आहात काय? किंवा आपण आपल्या सभोवतालच्या महिलांना ओळखा, ज्यांचे आयुष्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायक ठरू शकते? जर उत्तर होय असेल तर आपल्याला '#Sheinspiresus' या हॅशटॅगने त्या महिलांच्या कथा शेअर कराव्यात. हे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लागू होईल. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंट येत्या रविवारपासून बंद करण्याचा माझा विचार आहे, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा